इस्रोच्या आजपर्यंतच्या सर्वात वजनदार GSAT-29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने GSAT-29 या आतापर्यंतच्या सर्वात वजनदार भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. GSLV-MK-III D2 या प्रक्षेपक यानाद्वारे उपग्रह अवकाशात झेपावला.

या उपग्रहाचं वजन ३,४२३ कि. ग्रॅ. असून तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह आहे. हा उपग्रह प्रामुख्याने जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातल्या दळणवळण क्षेत्राचा विकास करण्यासाठी पुढील दहा वर्षांसाठी कार्यरत राहाणार आहे. इस्रोचा हा अत्याधुनिक आणि प्रभावी परिणाम देणारा दळणवळण उपग्रह आहे. अशाच प्रकारे आणखी दोन उपग्रह GSAT-11 आणि GSAT-20 प्रक्षेपित होण्याच्या मार्गावर आहेत. GSAT-11 डिसेंबरमध्ये तर GSAT-20 पुढील वर्षी प्रक्षेपित केला जाणार आहे.

हा उपग्रह पुढील १० वर्ष हा उपग्रह भारताच्या कम्युनिकेशन मधला महत्वाचा वाटा उचलेल. तसेच पुढील चार वर्षांत होऊ घातलेल्या चांद्रयान-२ आणि मानवी अंतराळ मोहिमांआधी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण इस्रोचं मनोबल उंचावणारं ठरणार आहे. कारण भारताच्या कम्युनिकेशन मधील महत्वाचा दुवा ठरणारा हा उपग्रह ज्या रॉकेट मधून प्रक्षेपित केला गेलाय ते रॉकेट येत्या काळात आपल्या सोबत भारताची चंद्रमोहीम घेऊन जाणार आहे.

ह्या उपग्रहावर केए आणि केयू ब्यांड ट्रान्सपोंडर असून भारताच्या जम्मू काश्मीर आणि पूर्वेकडील राज्यांन मधील लोकांच कम्युनिकेशन ह्यामुळे सुलभ होणार आहे. ह्या सोबत इस्रो ह्या वेळेस पहिल्यांदा क्यू आणि व्ही ब्यांड सोबत ओप्टीकल कम्युनिकेशन तंत्रज्ञान वापरत आहे.

GSLV-MK-3 प्रक्षेपक यानाविषयी :-
GSLV-MK-III उड्डाण करतानाच वजन जवळपास ६४० टन इतकं प्रचंड असते. पहिल्या स्टेज मध्ये दोन एस २०० बुस्टर आपल्यासोबत प्रत्येकी २०७ टन वजनाच इंधनाच १३० सेकंद प्रज्वलन करून तब्बल ५००० किलोन्यूटन बल निर्माण करतात. दुसऱ्या टप्प्यात एल ११० लिक्विड स्टेज विकास इंजिन प्रणाली वापरली जातात. (विकास इंजिन हे नाव भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम अंबालाल साराभाई ह्यांच्या नावावरून दिलेलं आहे). ह्यामुळे ११० किलोन्युटन बल निर्माण होते. ११३ सेकंदानंतर हि स्टेज सुरु होऊन २०० सेकंद चालते. तिसरी व सगळ्यात महत्वाची स्टेज म्हणजे क्रायोजेनिक अप्पर स्टेज. ह्याच स्टेज साठी लागणार तंत्रज्ञान आजवर भारताला देण्यात आल नव्हत. पण स्वतःच्या हिमतीवर भारतीय व स्पेशली इस्रो च्या अभियंत्यांनी हे इंजिन बनवून यशस्वी करून दाखवलं. ह्यात सी ई २० क्रायोजेनिक इंजिनांचा वापर केला जातो. २०० किलोन्युटन बल ह्या प्रक्रियेत निर्माण करून उपग्रहाला योग्य कक्षेत नेल जाते.

ह्या रॉकेट ची क्षमता ४००० किलोग्राम ( ४ टन ) वजनाचे उपग्रह जी.टी.ओ. कक्षेत प्रक्षेपित करण्याची असून पुढील काही काळात एस.सी.ई. २०० ही इंजिन वापरून ती ६००० किलोग्राम ( ६ टन ) पर्यंत नेली जाणार आहे. ह्यामुळे उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी भारताला आता कोणत्याही इतर देशाच्या रॉकेट वर अवलंबून राहवं लागणार नाही. हेच रॉकेट २०२२ पर्यंत भारतीयांना अवकाशात घेऊन जाणार आहे.

भारतीय अंतराळ उद्योग विश्वाला इसरो मुळे दिवसेंदिवस नवी झळाळी मिळत आहे. हि समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. GSLV-MK-III च्या यशस्वी उड्डाणासाठी इस्रो च्या वैज्ञानिक आणि संशोधक यांचे हार्दिक अभिनंदन…

उद्योजक मित्र

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!