ऐंशी नव्वद च्या दशकात रस्त्यावर धुमाकूळ घालणारी “जावा” मार्केटमधे पुन्हा उतरण्यास सज्ज


७० ते ९० च्या दशकात भारतभर धुमाकूळ घालणारी येझदी हि जावा कंपनीचीच गाडी होती. रस्त्यावर शान मध्ये चालणारी हि गाडी तरुणांची आवडती होती. दोन सायलेंसरमधून येणारा पेट्रोलचा वास गल्लीतल्या पोरींना बाहेर पडायला मजबूर करायचा. तेव्हा हॉर्न मारायची गरज पडायचीच नाही. गाडीचं फायरिंगच अस होतं की पाहीजे त्या माना अचूक वेळेत मागं वळायच्या.

आता त्या धुराचा इतिहास जन्मला आलाय.१९६० साली कर्नाटकमधील मैसूर येथून या कंपनीची सुरुवात झाली होती आणि १९६८ सालापासून कंपनीने आपल्या मोटोरसायकलची विक्री सुरू केली होती.मैसूरचे गव्हर्नर जयचमराजा वडियार यांनी कंपनी सुरू करण्यासाठी रुस्तुम आणि फारूक या इराणी बंधूंना प्रोत्साहित केलं होतं. त्यातूनच मैसूरमधील यादवगिरी औद्योगिक क्षेत्रातील २५ एकर जमिनीत इराणी बंधूंनी ‘आयडियल जावा इंडिया लिमिटेडची’ सुरुवात केली होती. मैसूरच्या महाराजांनी स्वतः या प्लॅन्टचं उद्घाटन केलं होतं. कंपनीत महाराजांनी एकट्याने जवळपास ५१ लाख रुपये गुंतवले होते.जवळपास २२०० पगारी कर्मचाऱ्यांसह सुरू झालेल्या या कंपनीला वर्षाकाठी ४२००० मोटोसायकलच्या उत्पादनाचा परवाना मिळाला होता. दिवसाला साधारणतः १३० नवीन बाईकच्या उत्पादनाची कंपनीची क्षमता होती. ‘फॉरेव्हर बाईक, फॉरेव्हर व्हॅल्यू’या टॅगलाईनखाली बाजारात आलेल्या या बाईकने आपली टॅगलाईन शब्दशः जपली होती.

७०, ८० आणि ९० च्या दशकात भारतातील बाईकर्समध्ये जिकडे तिकडे फक्त येझदीचाच बोलबाला होता. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटाच्या माध्यमातून ही बाईक मोठ्या पडद्यावर देखील पोहोचली होती.त्यानंतरच्या काळात मात्र भारत सरकारने सुझुकी, होंडा, यामाहा आणि कावासकी यांसारख्या जपानी कंपन्यांना भारतात मोटोरसायकल निर्मितीचे कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली. सहाजिकच बाजारात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली.

जापनीज कंपन्यांनी आपल्या बाईकमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळे प्रयोग केले आणि बाजारात आपले पाय पसरवायला सुरुवात केली. याचा परिणाम एझडीच्या व्यवसायावर झाला आणि ८० चं दशक संपता-संपता येझदीची लोकप्रियता देखील कमी व्हायला लागली आणि शेवटी १९९६ साली कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.जावा १९९६ सालीच बंद झाली !!! जावाला हॅन्डेल लॉक नव्हतं. तिथं कुलूप लावायला लागायचं. तसच कुलूप कंपनीला लागलं. पण गाडी बंद झाली म्हणून तिची क्रेझ काही कमी झाली नाही. आजही २५-३० वर्षांपूर्वीची एझडी, बाइकप्रेमी लाख डिड लाखात घ्यायला तयार असतात.

पण प्रत्येक पिढीत एक माणूस असतोच जो अशा बाईक प्रेमींची काळजी घ्यायला जन्माला आलेला असतो. आनंद महिद्रां यांनी जावा ताब्यात घेतली. महिंद्राचा ब्रॅण्ड न लावता त्यांनी जावा प्रमोट केली. काल जावाचे तीन मॉडेल लॉन्च केलेत. ते करताना देखील जुनं ते सोनं जपण्यात आलं. जावा चा जुनाच लूक जपण्यात आला आहे. गाडीची किंमत डिड लाखांपासून पुढे सुरु होते. नव्वदीत गाजलेली जावा, आता पुन्हा नव्याने उभारी घेत असलेली पाहून तमाम बाइकप्रेमी खुश आहेत. लवकरच “जावा” पुन्हा रस्त्यावर धुमाकूळ घालताना दिसेल यात शंका नाही

Source – Unknown

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!