देशभर वा जगभर पसारा असणाऱ्या मोठ्या कंपन्यांना संपूर्ण देशात व जगभरात माल पोचवत असताना किमतीचे नियोजन कसे जमते. सर्वच ठिकाणी एकच किंमत ठेवणे कसे जमते ? डिस्ट्रिब्युशन कसे जमते ?
हा प्रश्न खूप जणांना पडतो. बऱ्याचदा नवउद्योजकांना अनुभव नसल्यामुळे हा प्रश्न सतावत असतोच. यामुळे सुरुवातीच्या काळात आपल्या उत्पादनाची किंमत ठरवताना थोडा गोंधळ उडतोच.
पण या प्रश्नच उत्तर खूप मोठं किंवा किचकट नाही. पाच सात मुद्दे आहेत फक्त.
प्रोडक्शन कॉस्ट संबंधी
१. कंपन्यांचा प्रोडक्ट चा दर देशभरात सारखाच असू शकतो. परंतु बाहेर देशात तोच दर असेल असे नाही.
२. देशभरात एकच प्रोडक्शन कॉस्ट ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ते प्रोडक्ट बाहेर देशात पाठवताना ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते, तसेच स्थानिक परिस्थिती वेगवेगळी असू शकते, त्यानुसार बाहेर देशात किमतीत बदल होतो.
३. सामान्यपणे प्रोडक्शन कॉस्ट हि एकेका प्रोडक्ट वर काढत नाहीत, सगळे उत्पादन मिळून मग एकेका प्रोडक्ट ची सरासरी प्रोडक्शन कॉस्ट काढली जाते. एक प्रोडक्ट बनवायलाच खूप दिवस लागत असतील तरच फक्त प्रोडक्ट नुसार प्रोडक्शन कॉस्ट पहिली जाते.
किंमत एकंच ठेवण्यासाठी काय करतात ?
१. काही कंपन्या सर्व उत्पादने एकाच प्लांट मध्ये बनवतात. आणि देशभरात ठराविक ठिकाणी गोडाऊन बनवतात, आणि या गोडाऊन अंतर्गत स्टॉकीस्ट डिस्ट्रिब्युटर्स नेमतात. या गोडाऊन मधे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर माल जमा केला जातो. मोठ्या प्रमाणावर माल एकाच वेळी वाहतूक केल्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट बरीच कमी होते. हि ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट मधे आधीच गृहीत धरलेली असते.
२. काही कंपन्या देशभरात आपले प्लांट उभे करतात. प्रत्येक प्लांट अंतर्गत गोडाऊन असतात. आणि या गोडाऊनच्या मार्फत स्थानिक स्टॉकीस्ट व डिस्ट्रिब्युटर असतात.
३. काही कंपन्या देशभरातील इतर कंपन्यांना आपले व्हेंडर्स नेमतात. या व्हेंडर्स कडून या कंपन्या आपले प्रोडक्ट बनवून घेतात. आणि आपल्या स्थानिक डिस्ट्रिब्युशन चैन कडून वितरण करतात.
४. काही कंपन्या आपल्या एकाच प्लांट मध्ये उत्पादन घेतात. आणि आपल्या खाली स्टॉकीस्ट नियुक्त करतात. हे स्टॉकीस्ट बऱ्याचदा राज्यस्तरावर असतात. यांच्या अंतर्गत वितरण व्यवस्था काम करते.
५. उत्पादनाचा खर्च सरासरी पकडला जातो. म्हणजे जर आपण एखादी वस्तू बनवत असू, तिचा उत्पादन खर्च १०० रुपये आहे. आत अति वस्तू स्थानिक बाजारात विकताना अतिरिक्त खर्च नाही, पण बाहेर ठिकाणी पाठवताना ट्रान्सपोर्ट खर्च वाढणार असतो. मग अशावेळी सरासरी खर्च पकडला जातो आणि तो सर्व प्रोडक्ट साठी गृहीत धरला जातो. हा खर्च पकडून मग त्यावर नफा धरून किंमत ठरविली जाते.
६. काही प्रकारात प्रोडक्ट ची किंमत कमी जास्त होऊ शकते. काही उत्पादक स्थानिक मार्केटमधे ट्रान्सपोर्ट कॉस्ट येत नाही म्हणून स्वस्त विकतात, आणि बाहेर ठिकाणी ट्रान्सपोर्ट कॉस्ट अतिरिक्त वाढवून किंमत ठरवतात. पण याचे प्रमाण कमी आहे.
हे सर्व मार्ग प्रोडक्ट वा इंडस्ट्री नुसार ठरवावे लागतात.
सामान्यपणे प्रोडक्शन कॉस्ट काढताना शेवट पर्यंतचा खर्च पकडला जातो. एकेक प्रोडक्ट च्या नफ्याचा हिशोब केला जात नाही. एकूण उत्पादन खर्च किती, त्यानुसार प्रोडक्ट कॉस्ट किती, आणि त्यावर नफा किती असा हिशोब करतात. कमीत कमी किती नफा कमवायचा याचा आकडा ठरवून घेतला जातो.
MRP वर डीलर ना सगळीकडे शक्यतो सारखाच नफा दिला जातो. त्यात कमी जास्त केले जात नाही. राहिलेल्या किमतीत आपल्या उत्पादनाचा खर्च आणि आपला नफा याचे गणित सुळावले जाते.
वर सांगितलेल्या वेगवेगळ्या मार्गांनी कंपन्या आपली वितरण व्यवस्था मॅनेज करत असतात. अशावेळी ट्रान्सपोर्ट मध्ये जास्तीत जास्त १% चा फरक पडतो, यापेक्षा जास्त नाही. वाहतूक खर्चाचा एकूण प्रोडक्शन खर्चामध्ये हिस्सा खूप जास्त नसतो. आणि बाकी खर्च देशभरात कुठेही गेलात तरी सारखाच होणार असतो. त्यामुळे किंमत देशभरात सारखीच ठेवणे अवघड जात नाही.हा प्रोसेस चा भाग आहे, तुमचा व्यवसाय जसजसा वाढत जातो तसतसे तुम्ही या गोष्टींचे नियोजन आपोआपच करत जात. यासाठी स्वतंत्र स्किल ची किंवा अभ्यासाची गरज पडत नाही.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील