प्रोजेक्ट कन्सल्टंट व्हा… व्यवसायाची अनोखी संधी

प्रोजेक्ट कन्सल्टंट व्हा… व्यवसायाची अनोखी संधी

हे एक Business Proposal आहे.

मी प्रोजेक्ट कंसल्टंट/ऍडव्हायजर ची टीम तयार करत आहे.

प्रोजक्ट कन्सल्टंट म्हणजे प्रोजेक्ट उभा करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारा व्यक्ती. प्राथमिक डॉक्युमेंटेशन पासून प्रोजेक्ट उभा राहीपर्यंत प्रोजेक्ट कन्सल्टंट, क्लायंट ला सहकार्य करत असतो. पण या कन्सल्टन्ट ची मार्केटमधे कमतरता आहे. कोणताही प्रोजेक्ट असो त्यासंबंधी पूर्ण माहिती देणारा आणि तो उभा करून देणारा एखादा व्यक्ती लोकांना हवा असतोच. किमान त्यासंबंधी सर्व गोष्टींची पूर्तता करून देणाऱ्या व्यक्तीची गरज प्रत्येकाला असतेच. परंतु लहान लहान प्रोजेक्टसाठी कुणी कन्स्लटिंग करत नाही. मलाही यासंबंधी कित्येक वेळा विचारणा होत असतात. पण मी प्रोजेक्ट उभा करण्यात प्रत्यक्ष सहभाग घेत नाही, मी क्लायंट ला गाईड करण्याचे काम करतो. माझ्या क्लायंट्स ची संख्या पाहता प्रोजेक्ट उभा करून देण्याच्या कामासाठी माझ्याकडे पुरेसा वेळही नाही, त्यामुळे मला या प्रकारच्या एन्क्वायरी कित्येक वेळा नाकाराव्या लागतात.

प्रोजेक्ट कन्सल्टिंग चे मार्गदर्शन कुणीही देत नाही, या क्षेत्रात प्रत्यक्ष काम केलेलेच बहुतेकदा कन्सल्टिंग सुरु करतात. त्यामुळे हा व्यवसाय मुख्यत्वे अनुभवाच्या बळावर सुरु केला जातो. पण मी, तुम्हाला अनुभव नसला तरी कन्सल्टिंग संबंधी मार्गदर्शन करून चांगला प्रोजेक्ट कन्सल्टन्ट बनण्यासाठी मदत करू शकतो.

या प्रोजेक्ट कन्सल्टंट ची मार्केट मधे भरपूर आवश्यकता आहे. आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करता विविध क्षेत्रात राज्यभरात किमान दोनशे ते तीनशे प्रोजेक्ट कंसल्टंट/ऍडव्हायजर ची आवश्यकता आहे. म्हणूनच मी कन्सल्टन्ट ची टीम तयार करत आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे कन्सल्टंट जिल्हा स्तरावर उद्योजकांना उपलब्ध करून देणे हे या टीम मुख्य उद्दिष्ट असेल. उदा. एखाद्या व्यक्तीला फूड इंडस्ट्री संबंधित प्रोजेक्ट सेटअप उभारून देणारा कन्सल्टन्ट हवा आहे, तर त्याला त्याच्याच जिल्ह्यात संबंधित व्यवसाय सेटअप करून देणारा कन्सल्टंट उपलब्ध झाला पाहिजे.

हे कन्सल्टंट पूर्णपणे स्वतंत्र असतील. हे कन्सल्टन्ट माझ्या फ्रॅंचाईजी नसतील, यांचा आणि माझा कुठलाही व्यावहारिक संबंध नसेल. प्रत्येक जण आपापला व्यवसाय आपल्या परीने हाताळेल. मी या सर्वांना प्रोजेक्ट कंसल्टंट/ऍडव्हायजर होण्यासाठी आवश्यक असणारे योग्य ते मार्गदर्शन करेल. या सर्व कंसल्टंट ने आपला व्यवसाय स्वतंत्रपणे हाताळायचा असला तरी मी माझ्याकडे होत असलेल्या एन्क्वायरी सुद्धा यांच्याकडे पाठवू शकेल.

या कंसल्टंट साठी अतिरिक्त सर्व्हिस म्हणून माझी फर्म Roslin Business Solutions च्या अंतर्गत एक स्वतंत्र डिरेक्टरी पोर्टल वेबसाईट तयार करण्याचे काम चालू आहे ज्यावर क्लायंट्स आपल्याला हवे ते कंसल्टंट शोधू शकतील. व या डिरेक्टरीचे प्रमोशन Roslin च्या माध्यमातून केले जाईल. वेबसाईट डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

हे एक बिझनेस प्रपोजल आहे त्यामुळे यासाठी माझी कन्सल्टिंग फी लागू असेल. इच्छुकांना मी प्रोजेक्ट कन्सल्टिंग विषयी पूर्ण मार्गदर्शन करेल, सोबतच आपल्या व्यवसायाचे प्रमोशन कसे करावे, क्लायंट कसे शोधावेत, क्लायंट कसे हाताळावेत, फी कशी अकरावी यासंबंधी पूर्ण मार्गदर्शन करेल.

व्यवसाय बऱ्यापैकी शिकायला किमान तीन महिने लागू शकतात. कन्स्लटिंग सेक्टर मधे सेट व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे किमान वर्षभर वेळ देण्याची तयारी असावी. हा व्यवसाय सेट झाल्यानंतर आपोआपच माऊथ पब्लिसिटीचा फायदा मिळतो.

यासाठी एकूण गुंतवणूक किमान लाखभर रुपये लागू शकते. यात माझी फी २५,०००/- रुपये आणि ऑफिस सेटअप चा इतर खर्च गृहीत धरलेला आहे. कंसल्टंट ला ऑफिस ची आवश्यकता असतेच. एखादा चांगला फ्लॅट असल्यास उत्तम. यामुळे क्लायंट्स वर चांगला प्रभाव पडतो. इतकी गुंतवणूक क्षमता नसेल तर त्यावरही वेगळे मार्ग शोधात येतील, पण त्याचा व्यवसाय सेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.

यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर मला ७७४४०३४४९० या क्रमांकावर सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क करू शकता.

धन्यवाद
श्रीकांत आव्हाड

वेबसाईट वर पब्लिश केलेल्या जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार असतात. या जाहिरातींचा 'उद्योजक मित्र'वेबसाईट तसेच उद्योजक मित्रच्या इतर पोर्टलशी कोणताही संबंध नसतो. कोणतेही व्यवहार करताना संपूर्ण शहानिशा करूनच करा.

Related Post

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!