RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडतो आहे असे उर्जित पटेल यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. पटेलांनी वैयक्तिक कारण म्हटले असले तरी मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि आरबीआय मधील वादाची किनार या राजीनाम्याचा असल्याचे मानले जात आहे.

केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यात झालेल्या वादाची पार्श्वभूमी हे या राजीनाम्याचे मुख्य कारण मानले जाते आहे. आरबीआय आणि सरकार यांच्यात काही मुद्द्यांवर वाद सुरु होता. RBI विरोधात सरकार आपल्या विशेष अधिकारांचा वापर करण्याची शक्यता असल्याचेही समोर आले होते. १९ नोव्हेंबरला एक बैठक पार पडली ज्यात आरबीआय आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी होते. तर सर्व काही सुरळीत झाल्याचे जाहीर झाले होते. उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातला वाद मिटला अशाही बातम्या समोर आल्या होत्या. परंतु आता उर्जित पटेलांनी राजीनामा दिल्यामुळे सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

राजीनामा देताना, आरबीआयमध्ये गव्हर्नर पदावरा काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती असे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. आरबीआयच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करणं हा माझ्यासाठी गौरव होता. मी माझ्या सहकाऱ्यांचे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो त्यांनी मला खूप सहकार्य केले असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

उर्जित पटेल यांची नियुक्ती २०१६ मध्ये झाली होती.

या राजीनाम्यामुळे उद्या मार्केटमधे मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये २% नि पडझड झाली आहे. चार विधानसभा निकालांच्या अंदाजामुळे मार्केटमधे पडझड झाल्याची चर्चा असतानाच आता या राजीनाम्यामुळे मार्केटमधे आणखी काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
_

उद्योजक मित्र

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!