लहान मुलांना दुचाकीवर, खास करून पाठीमागे, बसविणे हा अतिशय धोकादायक प्रकार आहे. गाडी अचानक खड्ड्यात आदळली, स्पीड ब्रेकर वर उडाली, मुलांना झोप लागली तर ते खाली पडू शकतात. यामुळे कित्येक पालक आपल्या मुलांना एखाद्या पंचाने, मफलरने, कापडाने स्वतःला बांधतात. तरीही गाठ सुटली तर मुले पडण्याचा धोका असतोच. काही वेळेस तर लहान मूल मागे बसलेलं असताना कसबसं आपल्या पालकाला आपल्या लहानश्या हाताने धरून बसलेलं दिसतं. हात सुटला तर खाली पडण्याची भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते, या भीतीपोटी ते समोर बसलेल्याला जमेल तेवढं घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असत. किंवा मूल मोपेडवर पुढे उभं केलं असेल तर अचानक ब्रेक मारल्यावर ते हॅण्डल वर आदळण्याची भीतीसुद्धा असतेच.
मार्केटमधे काही सेफ्टी बेल्ट्स पुरविणाऱ्या कंपन्या आल्या आहेत. (इथे काही इमेजेस दिलेल्या आहेत, त्या पाहून अंदाज येईल.) या सेफ्टी बेल्ट्स मुळे हि लहान मुले गाडीवरून खाली पडण्याचा, किंवा मोपेड वर समोर उभे असताना हॅण्डल वर आदळण्याचा धोका पूर्णपणे नाहीसा होतो. मुलांना कोणताही त्रास न होता हे बेल्ट लावता येतात.
परंतु या बेल्ट्स चा अजूनही पुरेसा प्रसार झालेला दिसून येत नाही. ठराविक शहर आणि एरिया पुरतेच याचे मार्केट दिसून येते.
म्हणूनच व्यवसायाच्या दृष्टीने हि एक चांगली संधी आहे. इंटरनेट वर शोध घेतल्यास या बेल्ट्स चे बरेचशे उत्पादक किंवा इंपोर्टर्स सापडतील. यांच्याकडून हे बेल्ट्स विकत घेऊन स्थानिक मार्केट मध्ये विक्री करण्याचा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. गुंतवणूक पन्नास हजारपेक्षा जास्त लागणार नाही. बेल्ट्स मोठ्या संख्येमधे (bulk quantity मधे) घेतल्यामुळे चांगला डिस्काउंट मिळेल. स्थानिक रिटेल नेटवर्क हाताशी धरले तर चांगले मार्केट मिळू शकते. सोबतच जर थेट पालकांना विकू शकलात तर चांगला नफा सुद्धा मिळेल. या बेल्ट्सची मागणी कधीही न संपणारी आहे.

स्वतः उत्पादनही करू शकता. फक्त याचे डिझायनिंग करता आले पाहिजे, मटेरियल क्वालिटी चांगली ठेवता आली पाहिजे, आणि शिलाईचे चांगले ज्ञान असावे… स्वतः उत्पादन घेऊनही विक्री करू शकता किंवा ट्रेडिंग करूनही मार्केटमधे जम बसवू शकता. या प्रोडक्ट ची उपयुक्तता पाहता तुम्ही पालकांना प्रोडक्ट चे महत्व चांगल्या प्रकारे समजून सांगू शकलात याची गरज जाणवून दिली तर चांगला व्यवसाय करू शकता.
या बेल्ट्स चे उत्पादक किंवा ट्रेडर्स तुम्हाला इंटरनेट वर सापडतील. सर्वांकडे चौकशी करून गुणवत्ता, उपयुक्तता, रेट सर्व काही शहानिशा करून मगच कुणाकडून माल घ्यायचा हे निश्चित करा. सुरुवातीला जास्त माल घेऊ नका. थोडीच खरेदी करा. यासाठी थोडा रेट जास्त द्यावा लागला तरी हरकत नाही. स्थानिक मार्केटमधे पालकांत जनजागृती करून, रिटेल नेटवर पकडून मार्केटचा अंदाज आल्यावर मग मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु करा.
(सर्व इमेजेस इंटरनेट वरून मिळतील ताशा घेतलेल्या आहेत. कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट प्रमोट करण्याचा उद्देश नाही. तुम्हाला योग्य वाटेल त्यांच्याकडूनच खरेदी करा)
धन्यवाद
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
उद्योजक मित्र
All rights ae reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील