व्यवसायाचा पाया खिळखिळा होउ देउ नका…


लेखन : श्रीकांत आव्हाड
======================

काही दिवसांपूर्वी नगरमधील एका हाॅटेलमधे गेलो होतो… पार्सल आॅर्डर करुन, एका खुर्चीवर बसलो होतो… काही वेळाने एका टेबलवरुन वेटरला आवाज दिला गेला. पण वेटर आणि सुपरवायजर सगळेच काही कारणाने किचन मधे होते. बाहेर कुणीच नव्हतं… त्या ग्राहकाचा आवाज काउंटर वर बसलेल्या मालकाने ऐकला आणि स्वतः खुर्चीवरुन उठुन आॅर्डर घ्यायला गेले. आॅर्डर घेताना त्यांच्या बाॅडी लँग्वेज मधे कुठेही मालक असल्याचा अवीर्भव नव्हता… सुपरवायजर तिथे येईपर्यंत त्या ग्राहकाची आॅर्डर देउनही झाली होती…

सर्व्हीस….
मला याची खात्री आहे की तो ग्राहक पुन्हा पुन्हा त्या हाॅटेलमधेच येणार… तोच कशाला मीसुद्धा हाॅटेल म्हटलं तर आधी तेच हाॅटेल निवडणार….
कारण…? सर्व्हीस… जिथे मालक स्वतः आपल्या व्यवसायावर लक्ष ठेउन आहे आणि वेळ पडल्यास स्वतः कर्मचारी होतो तो व्यवसाय सर्व्हीस मधे कुठेच कमी पडू शकत नाही.
हाॅटेलचं जेवण चांगलं आहेच पण त्याचबरोबर सर्व्हीसही तेवढीच महत्वाची आहे, जी तिथे आहे…
व्यवसाय हा गुणवत्ता आणि सेवा यावर तर मोठा होतो….

मी असे कितीतरी व्यवसायीक पाहीलेत ज्यांच्या व्यवसायाची उलाढाल करोडोंमधे आहे पण वेळ पडल्यावर ते स्वतःच्याच व्यवसायात कर्मचारी सुद्धा व्हायला तयार असतात…

पुण्याचे एक केटरींग कंपनीचे मालक आहेत जे कोणत्याही आॅर्डरवेळी कार्यक्रमात स्वतः उपस्थित असतात. स्वतः लक्ष देतात, अगदी एखाद्या पाहुण्याला ताट टाकायची जागा सापडली नाही तर स्वतः ते ताट घेतात आणी त्याच्या योग्य ठिकाणी ठेउन येतात

कितीतरी कंपनी मालक पाहीलेत जे वेळ पडल्यावर स्वतः कंपनीमधे काम करतात… अगदी ईतर लेबरमधे मिसळून जातात…

नगरमधील संजोग हाॅटेल ची सेवा मी स्वतः अनुभवलेली आहे… या हाॅटेल चे मालक स्वतः त्यांच्या प्रत्येक केटरींग आॅर्डरवेळी कार्यक्रमस्थळी हजर असतात… कार्यक्रम संपेपर्यंत ते स्वतः किंवा त्यांचा मुलगा स्वतः सर्व कर्मचाऱ्यांकडे लक्ष ठेउन असतो…

काही वर्षापुर्वी पुण्यात एका आॅटोमेशन कंपनीमधे गेलो होतो… मालकांशी बोलत असताना कंपनीतल्या एका मशीनचा काहीतरी प्राॅब्लेम झाला होता, आणि कर्मचाऱ्यांकडुन योग्य काम होत नव्हते…. कंपनीचे मालक स्वतः तिथे गेले मशीनमधला प्राॅब्लेम दुर केला आणि स्वतः मशीन १५-२० मिनीटे चालवत बसले… त्यांच वय ५५-६० होतं… या वयातही अगदी उत्साहाने मशीन आॅपरेट करत होते.

कित्येक मोठमोठ्या दुकानात मालक स्वतः ग्राहकांशी बोलतात… त्यांची मते जाणून घेतात. आवश्यकतेनुसार आपल्या उत्पादनात, सेवेत सुधारणा किंवा बदल करतात.

कित्येक व्यवसायीक ग्राहकांच्या तक्रारीत स्वतः लक्ष घालतात. वेळ पडल्यास कर्मचारी बाजुला करुन स्वतः तो प्राॅब्लेम दूर करतात….

हे लोक कधीच अपयशी होत नाहीत, कारण अपयशी होण्याची जी कारणे आहेत ती त्यांनी कधी व्यवसायाच्या आसपास भटकुही दिलेली नसतात….

गुणवत्ता, सेवा, कामात वाहून घेणे हा तुमच्या व्यवसायाचा पाया आहे… व्यवसाय कितिही मोठा झाला तरी हा पाया खिळखिळा होणार नाही याची काळजी घ्या.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करा ↓↓

 

__________________________________

All rights ae reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!