ब्रॅंडिंग, मार्केटिंग, सेल्स… अर्थ आणि संबंध


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

ब्रॅंडिंग, मार्केटिंग, सेल्स… व्यवसायात हे तीन महत्वाचे शब्द आहेत. याशिवाय व्यवसायाची कल्पना होऊ शकत नाही.

या शब्दांचा अर्थ तसा खूप मोठा आहे. सविस्तर सांगायला गेलो तर कितीही लिहिता येईल. पण व्यवसायाच्या दृष्टीने या शब्दांचे प्रॅक्टिकल अर्थ माहित करून देतो. ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय करताना नक्की काय करायचे असते याचा अंदाज येईल. हि माहिती कुठल्या ठोकताळे किंवा पुस्तकी पद्धतीची नाही, तर तुम्हाला व्यवसाय करताना कशा प्रकारे नियोजन करायचे आहे यासाठी आहे. या माहितीमध्ये आणि पुस्तकी व्याख्येमधे नक्कीच फरक असू शकेल, पण नवउद्योजकांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान महत्वाचे असते, म्हणून तुमच्या लक्षात येईल याप्रकारे या तीन शब्दांचा अर्थ आणि एकमेकांशी असलेला संबंध याचा सार देत आहे.
__

ब्रॅंडिंग –

ब्रॅंडिंग म्हणजे ब्रँड बनवणे. तुमच्या व्यवसायाचा ब्रँड. ब्रँड हि तुमच्या व्यवसायाची, उत्पादनाची ओळख असते. ब्रँड कशाचाही असू शकतो. तुमच्या दुकानाचा, उत्पादनाचा किंवा तुमच्या नावाचा.. कोणताही. उदा. तुम्ही एखाद्या वास्तूचे उत्पादन घेत असाल तर त्या वस्तूचा ब्रँड, किंवा तुमचे एखादे दुकान असेल तर त्या दुकानाचे नाव हा ब्रँड असेल ई. तुमची ओळख हा सुद्धा ब्रँड आहे तुमच्या व्यवसायासाठी.

हा ब्रँड बनवावा लागतो. यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. गुणवत्ता, सेवा यातून तुमचा ब्रँड तयार होत असतो. पण व्यवसाय सुरु करताना जी ब्रॅण्डिंग करावी लागते ती यापेक्ष वेगळी असते. ब्रँड बनवणे, आणि ब्रॅण्डिंग करणे हे वेगवेगळे शब्द आहेत.

ब्रॅंडिंग करणे म्हणजे तुमच्या ब्रँड ला लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवणे. यासाठी जाहिराती चा मार्ग वापरावा लागतो. पण हे काम टप्प्याटप्प्या ने करावे लागते.
उदा- ब्रँड नेम निवडणे, लोगो तयार करणे, ट्रेड मार्क नोंदणी करणे, प्रोडक्ट पॅकिंग ची डिझाईन प्रभावी बनवणे, यानंतर जाहिरात सुरु करणे याप्रकारे.

जाहिरात करताना तुमचा ब्रँड लोकांच्या नजरेत भरेल याची काळजी घ्यावी लागते. तुमचा ब्रँड कशासाठी आहे, तो किती प्रभावी आहे, तो कोणत्या उत्पादनासाठी आहे हे लोकांना जाणवले पाहिजे. ब्रॅण्डिंग मधून तुमच्या ब्रँड ची गुणवत्ता सुद्धा जाणवली पाहिजे. ब्रँड आणि उत्पादन हे समीकरण लोकांच्या डोक्यात घट्ट बसले पाहिजे. यासाठी जाहिरातींचा प्रभावी मारा करावा लागतो. यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. त्यांचा कौशल्याने वापर करावा लागतो.
__

मार्केटिंग –

मार्केटिंग म्हणजे तुमच्या ब्रँड चे उत्पादन मार्केट मध्ये पोचवणे. योग्य प्रकारे ब्रॅंडिंग करताना मार्केटिंग साठी सुरुवात करायची असते. तुम्ही एखाद्या वास्तूचे उत्पादन करत असाल तर ते संपूर्ण मार्केट मध्ये पोहोचले पाहिजे याची दक्षता मार्केटिंग करताना घ्यावी लागते. तुमच्या अपेक्षित ग्राहकांपर्यंत तुमचे उत्पादन पोचवणे म्हणजे मार्केटिंग.

उदा. तुम्ही एखाद्या साबणाचे उत्पादन करत आहात, तर प्रत्यक्ष मार्केट मधील सर्व शॉप मध्ये तुमचे उत्पादन (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) पोचवणे हि मार्केटिंग झाली, याचबरोबरीने व्हर्च्युअल जगात सुद्धा लोकांपर्यंत तुमचे उत्पादन पोचवणे हीसुद्धा मार्केटिंग आहे. तुम्ही सोशल मीडियावरून तुमच्या उत्पादनाची जाहिरात करताय म्हणजे मार्केटिंगचं करत असता.
किंवा तुमचे एखादे दुकान आहे. तर अशावेळी तुमच्या दुकानातील वस्तूंची माहिती ग्राहकांपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने जात राहील यासाठी प्रयत्न करणे म्हणजे मार्केटिंग करणे.
किंवा तुम्ही एखादा सर्व्हिस व्यवसाय करत आहात तर तुमच्या सेवांची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचवणे म्हणजे मार्केटिंग.


__

सेल्स –

विक्री हा व्यवसायाचा मुख्य भाग. ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग हा प्रभावी वापर केला कि ग्राहक आकर्षित होतोच. अशावेळी त्यांना योग्य आणि अपेक्षित प्रोडक्ट देणे हे महत्वाचे आहे. तुमचे उत्पादन मार्केट मध्ये डिस्ट्रिब्युट केले जात असेल तर विक्रेत्यांना ते उत्पादन जास्तीत जास्त विकण्यासाठी प्रवृत्त करत राहणे हा विक्रीचा भाग झाला. तुमचे एखादे शॉप असेल तर येणाऱ्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे माहिती देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना तुमचे उत्पादन किंवा सेवा घेण्यासाठी राजी करणे हा झाला विक्री चा भाग.
यासाठी चांगली सेल्स चेन तयार करणे, सेल्स टिम मध्ये चांगले कर्मचारी नियुक्त करणे, त्यांच्याकडून काम करून घेणे, ग्राहकांशी व्यक्तिशः संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे यासारखे मार्ग अवलंबणे आवश्यक आहे.
__

ब्रॅंडिंग, मार्केटिंग, आणि सेल्स या तीनही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. या तीनही गोष्टी एकमेकांच्या सोबतीनेच पुढे जातात. यापैकी एक जरी मागे राहिली तरी व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकत नाही. या तीनही गोष्टी एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत. याना सोबत ठेऊन योग्य ताळमेळ साधला तर यश पायाशी लोळण घेईल, आणि यापैकी एकाचा जरी अनमान केला तर स्वतःला लोळायची वेळ येईल.

तीन पायऱ्या – तुमच्या उत्पादनाचा ब्रँड बनवा, त्यानंतर त्या ब्रँड चे उत्पादन मार्केट मध्ये पोचावा, त्यानंतर त्याच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करा. या तीन पायऱ्या मिळून तुमचा व्यवसाय उभा राहतो.

व्यवसाय म्हणजे उत्पादन नव्हे, व्यवसाय म्हणजे विक्री.
आणि प्रभावी विक्री साठी ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, आणि सेल्स या तीन्हींचाही सहभाग आवश्यक आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
____

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “ब्रॅंडिंग, मार्केटिंग, सेल्स… अर्थ आणि संबंध

  1. Sir, only one sentence , i’ll do comment on this topic :
    “Thank you very much for this true n much directive information !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!