रिटेल व्यवसाय… संधी आणि माहिती


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

रिटेल व्यवसाय… अनुभव नसताना, कमी गुंतवणुकीत सुरु करता येणारा, कमी रिस्क असणारा व्यवसाय असा हा व्यवसाय आहे

सामान्यपणे रिटेल व्यवसाय म्हणजे शॉप मधून विक्री असे समजले जाते…. काउंटरवरून ग्राहकांना केली जाणारी विक्री, किंवा जिथे थेट शेवटचा ग्राहक म्हणजे end customer खरेदी करतो असे क्षेत्र… तांत्रिकदृष्ट्या रिटेल व्यवसायाची व्याख्या बरीच विस्तृत आहे. परंतु इथे शॉप या अर्थानेच हा शब्द घेतलेला आहे.

रिटेल व्यवसाय उत्पादन व्यवसायापेक्षा नक्कीच जास्त सुरक्षित आहे आणि मार्केटिंगच्या दृष्टीनेही जरा कमी त्रास असणारा आहे. फक्त तुम्हाला तुमच्या परिसरात कोणत्या प्रॉडक्ट साठी मार्केट चांगले राहील याचा विचार करावा लागतो. एक चांगले सुटसुटीत शॉप सेटअप करून तुमचे प्रॉडक्ट विक्री सुरु केली कि योग्य मार्केटिंगच्या साहाय्याने तुम्हाला ग्राहक मिळण्यात अडचण येत नाही. उत्पादन क्षेत्रासारखा ट्रेडिंग व्यवसाय मोठा होण्यात काही मर्यादा असल्या तरी चांगले आणि दररोज ठराविक उत्पन्न मिळवून देण्यासाठी किंवा पैसा खेळता ठेवण्यासाठी रिटेल व्यवसाय जास्त सक्षम आहे यात शंका नाही.

रिटेल व्यवसायात रिस्क कमी असते, कारण तुमची गुंतवणूक हि मुख्यत्वे वस्तूंमध्ये असते, जी वसूल होणारच असते. तसेच कमी गुंतवणुकीतही व्यवसाय सुरु करता येतो. उत्पादन क्षेत्रात मशिनरी व इतर गोष्टींसाठी गुंतवणूक जास्त लागते ज्यामुळे बऱ्याच वेळा आपण उत्पादन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय सुरु करण्याला घाबरतो. पण ट्रेडिंग व्यवसायात हा धोका खूप कमी असतो. फ्रँचाइजी असल्यास गुंतवणूक जास्त लागते पण ब्रँड चा फायदा होतो, त्यामुळे फ्रॅंचाईजी व्यवसाय सुद्धा खूप चांगला व्यवसाय आहे.

रिटेल व्यवसायात शॉप सेटअप ला खूप महत्व असते. तुमचे दुकान जितके चांगले सजवलेले असेल, जितके उठावदार सेल तितका तुमच्याकडे ग्राहक जास्त आकर्षित होतो, त्यामुळे या व्यवसायात मार्केटिंग ची महत्वाची पायरी म्हणजे शॉप योग्य पद्धतीने तयार केलेले, बनवलेले असणे. यांनतर योग्य मार्केटिंग, जाहिरात करून ग्राहकाला आकर्षित करण्याचे कौशल्य तुम्हाला आत्मसात करावे लागते. योग्य प्रेझेन्टेशन ग्राहकाला तुमच्या दुकानाकडे आकर्षित करतोच.

रिटेल व्यवसायाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे या व्यवसायासाठी विशेष कौशल्याची नसते. थोडेसे विक्री आणि संपर्क स्किल असणे पुरेसे आहे. ग्राहक हाताळणी करता येणे आवश्यक आहे. कारण इथे थेट सामान्य ग्राहकांशीच व्यवहार करायचा असतो, आणि हे ग्राहक हजारो प्रकारचे, स्वभावाचे, वृत्तीचे असतात. या ग्राहकांना योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. रिटेल व्यवसायाची पार्श्वभूमी नसली तरी फरक पडत नाही, थोड्या अवधीत तुम्ही ग्राहक हाताळणी, शॉप मॅनेजमेंट शिकू शकता. यामुळेच नवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी, तसेच व्यवसायाचा पूर्वानुभव नसणाऱ्यांसाठी रिटेल व्यवसाय उत्तम मार्ग आहे. व्यवसायाचे स्टोक मॅनेजमेंट, आर्थिक नियोजन हे मात्र चांगल्या प्रकारे आत्मसात करावेत.

रिटेल व्यवसाय शोधणे अवघडही नाही. मार्केट मध्ये ३६० डिग्री मधे नजर फिरवल्यास शेकडो पर्याय सापडतात. गावातल्या छोट्याशा किराणा दुकानापासून शहरातील मोठ्या शोरूम पर्यंत सर्व काही रिटेल शॉपच आहेत. फक्त आर्थिक क्षमतेनुसार प्रत्येकाचे स्वरूप वेगवेगळे आहे इतकंच काय तो फरक. कित्येक रिटेल व्यवसाय लाखभर गुंतवणुकीतही सुरु करता येतात. गुंतवणूक क्षमता चांगली असल्यास मोठ्या स्तरावर शॉप सुरु करता येते. फ्रँचाइजी, शोरूम साठी गुंतवणूक थोडी जास्त लागते. यात आपण काही सर्व्हिस इंडस्ट्रीमधील शॉप सुद्धा घेऊ शकतो, काही फूड फ्रँचाइजी, टेलिकॉम फ्रँचाइजी इत्यादी प्रकारच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमधील फ्रँचाइजी सुद्धा चांगल्या व्यवसाय संधी आहेत.

अननुभवी लोकांसाठी, तसेच ज्यांना व्यवसायासाठी जास्त वेळ किंवा ऊर्जा देणे शक्य होऊ शकत नाही अशांसाठी रिटेल व्यवसाय चांगला मार्ग आहे. ठरवलं तर अतिशय कमी गुंतवणुकीतही सुरुवात करता येते आणि व्यवसाय वृद्धीसाठी अमर्याद संधी आहेत.

वॉलमार्ट हे जगातील सर्वात मोठे रिटेल व्यवसायाचे उदाहरण आहे, तर गावातील लहानशे किराणा किंवा मोबाईल चे दुकान किंवा घरातूनच काही वस्तू विकणारे लहान व्यावसायिक हे रिटेल व्यवसायाचे सर्वात लहान उदाहरण आहे. आपला व्यवसाय सुरु करण्यापासून तो कोणत्या उंचीवर न्यायाचा हे सर्वस्वी व्यावसायिकावर अवलंबून आहे.

धन्यवाद

उद्योजक व्हा..
समृद्ध व्हा…
____

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


2 thoughts on “रिटेल व्यवसाय… संधी आणि माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!