‘स्टार्टअप’ इंडियात ‘महाराष्ट्राचा पहिला क्रमांक’


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

वाणिज्य मंत्रालयाकडून घोषणा

वाणिज्य मंत्रालयाकडून DIPP च्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षात महाराष्ट्राला स्टार्ट क्षेत्रातील कामासाठी उदयोन्मुख राज्यांमधे प्रथम मानांकन मिळाले आहे.

वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशातील सर्वाधिक २७८७ नवोदित उद्योग (स्टार्टअप) महाराष्ट्रात आहेत. नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी) यासंबंधीची मानांकने गुरूवारी घोषित केली. त्यामध्ये गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरले असले तरी देशामध्ये स्टार्टअपच्या संख्येत गुजरात अखेरच्या स्थानी आहे. तेथील स्टार्टअपची संख्या अवघी ७६४ आहे.

DIPP ने (Department of Industrial Policy & Promotion) अलिकडेच स्टार्टअप क्षेत्रात राज्य सरकारांनी केलेल्या कामाची पाहणी केली होती.

धोरण आखणे, नवोदित उद्योगांचे हब उभारणे, कल्पकतेला वाव देणे, उद्योगांशी संवाद या माध्यमातून राज्य सरकारांनी स्टार्टअपसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी केलेल्या उपाययोजनांचा या पाहणीत समावेश होता. २७ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेश यात सहभागी झाले होते. या पाहणीत सर्वोत्तम, अग्रणी, महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख आदी श्रेणीत राज्यांचन्ना मानांकन देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला ‘उदयोन्मुख’ हे मानांकन मिळाले.

या सर्वेक्षणात DIPP चमूने उद्योजक, व्यापारी यांना ४० हजार मोबाइल कॉल्स केले. त्याद्वारे राज्यांमधील स्टार्टअप धोरणाची स्थिती जाणून घेण्यात आली. राज्यात अधिकाधिक स्टार्टअप उद्योग सुरू होण्यासाठी गुजरातने १०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. त्याचा २०० उद्योग प्रकल्पांना लाभ झाला. यामुळेच गुजरातला यामध्ये सर्वोत्तम राज्याचा मान मिळाला आहे.

विविध मानांकने अशी
उदयोन्मुख राज्ये : महाराष्ट्र, आसाम, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मिर, पंजाब, तामिळनाडू व उत्तराखंड

महत्त्वाकांक्षी राज्ये : हरियाणा, हिमाचलप्रदेश, झारखंड, उत्तरप्रदेश व पश्चिम बंगाल

अग्रणी राज्ये : कर्नाटक, केरळ, ओरिसा व राजस्थान

स्टार्टअप लीडर : आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश व तेलंगणा

नवोदित राज्ये व केंद्रशासित प्रदेश : चंदीगड, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड, पुडूच्चेरी, सिक्कीम व त्रिपुरा

____

उद्योजक मित्र

व्यवसायासंबंधी विविध माहितीकरिता उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करा ↓↓

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

One thought on “‘स्टार्टअप’ इंडियात ‘महाराष्ट्राचा पहिला क्रमांक’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!