व्यवसाय सुरु करण्यापूर्वी या महत्वाच्या २५ प्रश्नांची उत्तरे मिळावा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

बिझनेस कन्सल्टिंग हे माझं प्रोफेशन आहे आणि आवडही. व्यवसाय सुरु करण्यापासून तो यशस्वीपणे चालवण्यापर्यंत सर्वच गोष्टी यामध्ये अंतर्भूत असतातच. यासोबतच व्यावसायीक दृष्टिकोन विकास, व्हिजन डेव्हलपमेंट या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. माझ्या कन्सल्टिंग चा मुख्य रोख हा व्यवसाय चालवण्यासंबंधी असतो. माझा जास्त क्लायंट वर्ग हा नवीन व्यवसाय सुरु करणारे ज्यांना व्यवसायाचा अनुभव आणि पार्श्वभूमी नाही असे आहेत, म्हणून माझ्या क्लायंट ला मार्गदर्शन करताना मी व्यावसायिक मानसिकता आणि व्यवसाय सुरु केल्यानंतरच मॅनेजमेंट यावर भर देतो.

यासाठी खाली दिलेल्या मुद्द्यांवर, प्रश्नांवर चर्चा करतो. यामधे व्यवसायाचा जवळजवळ संपूर्ण सार आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर व्यवसाय बिलकुल अवघड नाही. या प्रश्नांची उत्तरे क्लायंट ला कन्सल्टिंग करताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिली जातात. पण जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना टप्प्या टप्प्याने मिळतात.

तुम्हीही या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करा… व्यवसायासंबंधी बऱ्याच शंका, कुशंका, आक्षेप दूर होतील..

१. व्यवसाय मानसिकता काय आणि कशी असते ?
२. व्यवसायासंबंधी तुमचा दृष्टीकोण कसा असावा ?
३. व्यवसाय कसा निवडावा? तुमच्यासाठी योग्य क्षेत्र आणि व्यवसाय कोणते आहेत?
४. प्राथमीक नियोजन कसे करावे ?
५. व्यवसायात येणाऱ्या मुख्य समस्या कोणत्या आहेत, त्या कशा सोडवाव्यात?
६. व्यवसाय करत असताना कोणकोणत्या गोष्टींसाठी आणि संकटांची तयार असावे ?
७. व्यवसाय करताना कुठे चुका होतात, त्या कशा टाळाव्यात ?
८. व्यवसायातील आर्थीक बाबी कशा हाताळाव्यात ?
९. नफ्या तोट्याचे गणित कसे जुळवावे?
१०. व्यवसायासंबंधी नेहमी केल्या जाणाऱ्या चुका किंवा समजुती कोणत्या आहेत, त्या कशा टाळाव्यात ?
११. व्यवसायाचे प्राथमीक नियम कोणते आहेत त्यांचे पालन कसे करावे ?
१२. व्यवसाय सुरु करतानाचे टप्पे कसे असावेत ?
१३. व्यवसाय सुरु केल्यानंतर कशा प्रकारे हाताळावा?
१४. ग्राहक हाताळणी कशी असावी?
१५. ब्रँड कशा प्रकारे बनवावा लागेल?
१६. प्राथमीक मार्केटींग कशी करावी लागेल? मार्केट कसे शोधावे?
१७. भविष्यात संधी कशा वाढवाव्यात ?
१८. कायदेशीर, शासकीय बाबींची पुर्तता कशी करावी?
१९. व्यवसायातील धोके कसे टाळावेत?
२०. कर्मचारी कसे निवडावेत? कसे हाताळावेत?
२१. अपयशाचा सामना कसा करावा?
२२. यशाचे नियोजन कसे करावे ?
२३. व्यवसाय कसा करावा? कसा हाताळावा? कसा चालवावा? कसा वाढवावा?
२४. व्यवसायाचा पोर्टफोलिओ कसा तयार करावा ?
२५. व्यवसायाव्यतिरिक्त इतर गुंतवणुकीचे प्राथमिक नियोजन कसे असावे?

या प्रश्नांची उत्तरे इथे सविस्तर सांगणे शक्य नाही. कारण प्रत्येक प्रश्नावर किमान हजार शब्दांचा एक लेख होऊ शकतो. पण आजपर्यंत मी जे जे लेख लिहिले आहेत त्यामध्ये या विषयांवर बरेचसे लेखन आहे.

या प्रश्नांची उत्तरे मिळवा. थोडा अभ्यास करा. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपल्या मानसिकतेला आधी व्यावसायिक बनवा. मग व्यवसायात उतरा.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा..
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

3 thoughts on “व्यवसाय सुरु करण्यापूर्वी या महत्वाच्या २५ प्रश्नांची उत्तरे मिळावा

  1. नमस्कार सर, मी तुमची नियमित वाचक आहे. तुमचं लेखन खरच खूप प्रेरणादायी असत. मी एका निमशहरी भागातून आहे. सर माझी इच्छा आहे की इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू करावा. त्या व्यवसायाबाबतीत इतरांपेक्षा वेगळं देणं आणि अजून बऱ्याचशा संकल्पना मनात आहेत. पण मी एक स्त्री असल्यामुळे लोक काय म्हणतील वगैरे बऱ्याचशा गोष्टी मनात येतात. तुम्ही काय सुचवाल?

    1. लोक काहीच म्हणत नाहीत. जे काही म्हणतात ते रिकामटेकडे असतात. प्रत्येकाला आपापल्या आयुष्यच पडलेलं असतं. लोक नवीन प्रयत्नांची खिल्ली उडवतात, आणि यशाचे गुलाम होतात. त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार करू नका, सुरुवात करा.

    2. मी स्वतः एका प्रतिथयश बँकेत कायमस्वरूपी पदावर काम करणारा कर्मचारी होतो, चालू नोकरी सोडून मी इस्त्री व्यवसायात उतरलो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!