शेवगा प्रक्रिया उद्योगाने दिली ओळख; रेखा वाहटुळे यांनी साधली उन्नती


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळाले तर प्रगती साध्य करणे अवघड नाही. फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिव येथील रेखा रवींद्र वाहटुळे यांनी प्रशिक्षण घेऊन 2016 मध्ये गृहउद्योग सुरू केला. यामुळे चार जणांच्या हाताला काम मिळाले असून आर्थिक उन्नती साध्य करण्यात त्यांना यश आले आहे. 2016 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात त्यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ पुरस्कार पटकावला.

डोंगरगाव येथे रेखा यांच्या कुटुंबीयांची दोन एकर शेती आहे. पती रवींद्र बेरोजगार अभियंता आहेत. शेतातून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह होणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रथम खुलताबाद येथे राहून रवींद्र यांनी छोटे मोठे काम करणे सुरू केले. त्या वेळी रेखा गृहिणी होत्या. लवकर लग्न झाल्यामुळे बारावीपर्यंतचेच शिक्षण पूर्ण करता आले. पतीला नियमित काम मिळत नसल्याने हे कुटुंब कामाच्या शोधात औरंगाबादेत राहायला आले.

श्रीमती वाहटुळे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रातून कौशल्य विकासावर आधारित अन्नप्रक्रिया उद्योगाचे एक महिना प्रशिक्षण घेतले. फळे, भाज्या प्रक्रिया, बेकरी, निर्जलीकरणाचे प्रात्यक्षिक आत्मसात केले. त्या शेवगा पाल्याचा वापर करून पराठा, खांकरा, चटणी असे विविध आरोग्यवर्धक चविष्ट पदार्थ तयार करायला त्या शिकल्या. त्यानंतर त्यांनी नंदनवन कॉलनी व कॅनॉट प्लेस या ठिकाणी दितिजा गृहउद्योग सुरू केला. शेवगा पराठा स्पेशल, व्हेज, नॉन व्हेज, गरम मसाले, धने, हळद, मिरची पावडर, थालीपीठ भाजणी, चहा मसाला, ढोकळा पीठ, नाष्टा, जेवण व विविध पराठे यांची विक्री केली जाते. दीड वर्षांत अडीच लाख रुपये निवळ उत्पन्न मिळाल्याचे त्या सांगतात.
_

स्रोत कृषिरंग
संकलन उद्योजक मित्र

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!