शेअर्स च्या भावातील चढ उताराचा अंदाज सांगणारे Exponential Moving Average

शेअर्स च्या भावातील चढ उताराचा अंदाज सांगणारे Exponential Moving Average

Share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

यापूर्वी आपण साधी बदलती सरासरी (SMA) याविषयी माहिती घेतली. शेअरबाजारातील ट्रेडर्स अजून एका प्रकारच्या सरासरीवर लक्ष ठेवतात. यास विशेष बदलती सरासरी किंवा एक्सपोनेशल मुव्हिंग एव्हरेज(EMA) असे म्हणतात.

एखादया शेअर्सच्या बाजारभावाबद्धल अंदाज विविध गोष्टींचा विचार करून बांधत असले तरी त्यांचा मुख्य हेतू हा चालू भावात पडणाऱ्या फरकावर अधिक केंद्रित असतोअशी सरासरी काढताना अलीकडच्या बाजारभावाचा विचार करून ही किंमत मिळवली जाते.

ही सरासरी विशिष्ट गोष्टीवर, साधारणपणे अलीकडच्या काळातील बाजारभावावर विशेष भर देऊन मिळवीत असल्याने त्यास वेटेज मुव्हिंग एव्हरेज (WMA) असेही म्हणतात. SMA चा विचार करताना याच्याशी संबंधित प्रत्येक घटकास सारखेच महत्व दिलेले असते तर विशेष बदलत्या सरासरीस अलीकडे असलेल्या बाजारभावाचा विचार केला जातो.

याप्रमाणे EMA काढताना खालील पद्धतीने काढतात
1.प्रथम ज्या दिवसांचा EMA काढायचा आहे त्याचा SME काढतात. हा आपणास जेवढया दिवसांचा काढायचा आहे त्याचा बंद भावाची बेरीज करून त्यास संबंधित दिवसांच्या संख्येने भागून मिळवता येईल.
2.ज्या दिवसांचा EMA काढायचा त्यांचा गुणक (multipler) मिळवणे. हा गुणक मिळवण्यासाठी 2 भागीले संबंधित दिवसांची संख्या अधिक 1 असे सूत्र वापरावे लागते.
3.यावरून सद्याचा EMA काढणे.

याप्रमाणे खुलता भाव, चालू भाव, दिवसाचा सर्वाधिक भाव, सर्वात कमी भाव, सरासरी भाव यांचा EMA काढता येऊ शकतो.
या पद्धतीचा वापर करून सर्वसाधारणपणे शेअर , इंडेक्स, कमोडिटी किंवा करन्सी याचा भाव वाढेल की कमी होईल हे समजू शकते. जर EMA वाढत असेल तर भाव वाढतील आणि कमी होत असतील तर कमी होतील.

शेअर, इंडेक्स , कमोडिटी यांच्या कोणत्या भावाला अधिक खरेदीदार मिळतील किंवा कोणता भाव आल्यास विक्रीते वाढतील ते समजेल.
ट्रेडर्स त्यांची टार्गेट प्राईज आणि स्टॉप लॉस निश्चित करता येईल.अभ्यासक याचा वेगवेगळ्या दृष्टीने विचार करून SMA आणि EMA याचा वापर आपला अनुभव याचा वापर करून अंदाज बांधतात. याविषयी चांगली माहिती देणारे व्हिडिओ यु ट्यूब वर आहेत तसेच SMA आणि EMA चा वापर करून तयार चार्ट बनवून देणारी मोफत संकेतस्थळे उपलब्ध आहेत.

_

उदय पिंगळे
8390944222

लेखक गुंतवणूक अभ्यासक, मार्गदर्शक व सल्लागार आहेत.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

 

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

वेबसाईट वर पब्लिश केलेल्या जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार असतात. या जाहिरातींचा 'उद्योजक मित्र'वेबसाईट तसेच उद्योजक मित्रच्या इतर पोर्टलशी कोणताही संबंध नसतो. कोणतेही व्यवहार करताना संपूर्ण शहानिशा करूनच करा.

Share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Related Post

औषधोपचारावरचा प्रचंड खर्च हे आर्थिक संकटाचं एक मोठं कारण आहे… पैसा वाढवण्यासाठी आधी वाचवावा लागतो…

औषधोपचारावरचा प्रचंड खर्च हे आर्थिक संकटाचं एक मोठं कारण आहे… पैसा वाढवण्यासाठी आधी वाचवावा लागतो…

Share285        285Shares‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम ====================== लेखक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!