फेसबुक, इंस्टाग्राम, यु ट्यूब टाईमपास करण्यासाठी नाही, पैसे कमावण्यासाठी वापरा…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

फेसबुक, इंस्टाग्राम, यु ट्यूब, व्हाट्सऍप हे फक्त टाईमपास करण्यासाठी नसून पैसे कमावण्यासाठी सुद्धा आहेत. जगभरातील करोडो लोक या सोशल मीडिया माध्यमांतून लाखो रुपये कमवत आहेत. जिओ च्या इंटरनेट क्रांतीनंतर देशभरतील हजारो-लाखो नवउद्योजकांना सोशल मीडिया चे क्षेत्र सुद्धा व्यवसायासाठी खुले झाले. कित्येकांनी या माध्यमांचा वापर करून लाखो रुपये कमवायला सुरुवात केली आहे, कित्येक जण आता या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. आता नवीनच मार्केटमधे आलेल्या टिकटॉक या App च्या माध्यमातूनही पैसे कमावण्याच्या संधी आहेत.

सोशल मीडियाचा वापर व्यवसाय वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे होतो पण सोशल मीडिया हे माध्यमंच व्यवसाय म्हणून वापरूनही चांगले पैसे कमावता येऊ शकतात.

मार्केटमधे सोशल मीडिया पोर्टल बरेच आहेत, पण यामधे फेसबुक, इंइंस्टाग्राम, व्हॅट्सऍप आणि युट्युब या चार माध्यमांचा वापर आपल्याकडे (आणि जगभरातसुद्धा) सर्वात जास्त आहे. या माध्यमांचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता. आज सोशल मीडिया इंडस्ट्री हा एक स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. यात तुम्ही स्वतः कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डेव्हलप न करता मार्केटमधे टॉप ला असलेल्या सोशल मीडिया माध्यमांनाच आपला व्यवसाय बनवता… कसं ? ते सविस्तर बघू…

फेसुबक –
फेसबुक वरून पैसे कमवण्याचे भरपूर मार्ग आहेत.
इन्स्टंट आर्टिकल च्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकता. जर तुमची वेबसाईट असेल आणि तिला दररोज चांगल्या प्रकारे व्हिजिट मिळत असतील तर तुमची वेबसाईट आणि त्यासंबंधी पेज इन्स्टंट आर्टिकल ला रजिस्टर करता येते. एकदा वेबसाईट रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही ते आर्टिकल जेव्हा पेज वर पब्लिश करता ते आपोआपच इन्स्टंट आर्टिकल मधे कन्व्हर्ट होते. यानंतर त्या आर्टिकल मधे फेसबुक कडून काही जाहिराती पब्लिश केल्या जातात. या जाहिरातींना जेवढे इम्प्रेशन मिळतील तेवढे तुम्हाला पैसे मिळतात. थोडक्यात यासाठी तुमचेआर्टिकल जास्तीत जास्त वेळा वाचले गेले पाहिजे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

इन्स्टंट आर्टिकल शिवायही तुम्ही पैसे कमावू शकता. फेसबुक ने इन्स्टंट आर्टिकल चे नियम सध्या बरेच कडक केलेत, तुमची वेबसाईट इन्स्टंट आर्टिकल च्या स्टॅंडर्ड मध्ये येण्यासाठीच बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यामुळे हा मार्ग थोडा अवघड गृहीत धरून चला.

यावर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे तुमच्या फेसबुक पेज वरून जाहिराती पब्लिश करणे. यासाठी तुमच्या पेज ला भरपूर लाईक्स आणि फॉलोअर्स असले पाहिजेत. किमान लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील तर बरेच जाहिरातदार त्यांच्या जाहिराती तुमच्या पेज वर पब्लिश करण्यासाठी तुम्हाला पैसे देतात.
यासाठी तुमचे पेज चांगले ऍक्टिव्ह असणे आवश्यक असते. फेसबुक पेज फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि एंगेजमेंट वाढवण्यासाठी तुम्हाला सतत काहीतरी कंटेन्ट पब्लिश करणे आवश्यक असते. दिवसाला किमान दहा बारा पोस्ट तुम्ही पब्लिश करत असला तरच तुमच्या पेज वर चांगली एंगेजमेंट दिसेल.

उदाहरणादाखल लाख दोन लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले कित्येक एंटरटेनमेंट पेज बघा. एक तर ते इन्स्टंट आर्टिकल पब्लिश करतात, किंवा चित्रपटांच्या जाहिराती (ट्रेलर ई.) पब्लिश करत असतात, किंवा इतर प्रमोशनल माहिती पब्लिश करत असतात. या माध्यमातून महिन्याला कितीतरी उत्पन्न या पेज चे ऍडमिन मिळवत आहेत.

यु ट्यूब –
फेसबुक नंतर सर्वात जास्त युजर्स यु ट्यूब वर आहेत. रिलायन्स जिओ च्या लॉन्चिंग नंतर देशात इतरही कंपन्यांनी सढळहस्ते इंटरनेट युसेज वाटायला सुरुवात केली. यामुळे इंटरनेटचा वापर भरमसाठ वाढला. यात मुख्य वापर यु ट्यूब व्हिडीओ बघण्यासाठी होत आहे. याचा मोठा फायदा देशातील यु ट्यूब चॅनल चालवणाऱ्यांना झाला आहे.
तुमचे यु ट्यूब चॅनल तयार करा, व्हिडीओ बनवा, ते चॅनल वर पब्लिश करा. जास्तीत जास्त व्हिडीओ पब्लिश करत राहा. किमान १०००० पेक्षा जास्त स्बस्क्राइबर मिळवा. तुमचे अकाउंट यु ट्यूब मॉनिटायझेशन ला जोडलेले असेल तर यु ट्यूब तुमच्या व्हिडीओ आधी किंवा व्हिडीओ च्य मध्ये जाहिराती पब्लिश करत असते, या व्हिडीओंना जितके प्रेक्षक बघतील (Views मिळतील) तेवढे तुम्हाला यु ट्यूब पैसे देईल.

यु ट्यूब चॅनल ला स्बस्क्राइबर्स मिळणे सोपे नाही. इथे चांगले कन्टेन्ट असतील तरच स्बस्क्राइबर्स मिळतात. पण एकदा चांगली सुरुवात झाल्यावर मग तुमच्याकडे पैशाची रास लागते. युट्युब वर कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ चालू शकतात. त्यामुळे इथे काही ठरावीक कंटेन्ट लागतात असे नाही.

तसेच तुम्ही स्वतः व्हिडीओ बनवून टाकणार असाल तर व्हिडीओ मधे स्वतः काही जाहिराती घेऊ शकता. त्यामाध्यमातूनही तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.

इंस्टाग्राम –
इंस्टाग्राम सध्या जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारे सोशल मीडिया माध्यम आहे. युजर्स च्या बाबतीत इंस्टाग्राम लवकरच फेसबुकलाही मागे टाकेल. इंस्टाग्राम वर सध्या तरी मॉनिटायझेशन पद्धत नाही. पण तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट चांगले फॉलोअर्स असतील तर तुमच्या अकाउंट वर जाहिराती पब्लिश करण्यासाठी नक्कीच मिळतील. जाहिरातदार नेहमीच वाचकांच्या, प्रेक्षकांच्या शोधात असतात. जिथे जिथे लोक एकत्र येतात असे त्यांना जाणवते तिथेतिथे ते आपल्या जाहिराती देतच असतात. इंस्टाग्राम वर शक्यतो एंटरटेनमेंट अकाउंट असल्यास उत्तम. सतत काहीतरी मनोरंजनाचीमाहिती पब्लिश करत राहणे आणि सोबतच आधी-मधी जाहिरातदारांच्या जाहिराती पब्लिश करणे.

WhatsApp हेसुद्ध लोकांना जोडणारे खूप मोठे माध्यम आहे, पण त्यावरून जास्त प्रमाणात आता संधी दिसत नाहीत. पण जर तुम्हाला WhatsApp नेटवर्क तयार करणे शक्य असेल तर तेसुद्धा खूप मोठा व्यवसाय मिळवून देऊ शकेल. एखादे व्हॅट्सऍप वरून माहिती देणारी सर्व्हिस सुरु करू शकता आणि त्यामाध्यमातून लोकांना जोडू शकता. या माहितीसोबतच जाहिरातीही पब्लिश करू शकता. पण व्यवसायाच्या दृष्टीने व्हॅट्सऍप ला खूप मर्यादा आहेत. त्यामुळे आपण पहिल्या तीन माध्यमांनाच जास्त गांभीर्याने घेणे योग्य.

फेसबुक, यु ट्युब आणि इंस्टाग्राम हे तीनही माध्यम तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात… यांचा जर योग्य वापर केला तर यातून महिन्याला लाखो रुपये कमावणे अवघड नाही.

पण हे काम वाटतं तितकं सोपं नाही. इथे प्लॅटफॉर्म डेव्हलप करायला एखाद्या व्यवसायासारखाच भरपूर वेळ लागतो. भरपूर कष्ट घ्यावे लागतात. सतत नवनवीन गोष्टींचा धांडोळा घ्यावा लागतो. नवनवीन प्रयोग करावे लागतात.
फेसबुक पेज लाईक मिळविणे असो, युट्युब चॅनल चे स्बस्क्राइबर्स मिळविणे असो किंवा इंस्टाग्राम चे फॉलोअर्स मिळविणे असेल… प्रत्येकाला भरपूर वेळ लागतो. हे एखाद्या व्यवसायासारखेच आहे. सुरुवातीला तुम्हाला काहीच प्रतिसाद मिळत नाही. इथे सुरुवात करणारे ८०% हौशी काही महिन्यातच हात टेकतात. वर्षभर तुम्हाला पैसे कमवायला काही संधी नसतात. पण पेज, चॅनल, अकाउंट मात्र सतत ऍक्टिव्ह ठेवावे लागतात. सतत काहीतरी कंटेन्ट पब्लिश करावेच लागतात. आणि यासाठी स्किलच लागतं. लोकांना काय आवडेल, कशा प्रकारच्या कन्टेन्ट मधे लोक एंगेज होतील, फॉलोअर्स कसे वाढतील यावर सतत अभ्यास करावा लागतो. वर्ष दीड वर्ष चांगलं काम करत राहीलात तर चांगल्या प्रकारे फॉलोअर्स मिळायला लागतात. वर्षभरानंतर तुम्हाला पैसे कमावण्याचा संधी उपलब्ध व्हायला लागतात. आज ज्या फेसबुक अकाउंट ला तुम्हाला दहा बारा लाख फॉलोअर्स दिसत असतील त्यांची सुरुवात पाच सहा वर्षांपूर्वी झाली होती, हळूहळू करत आज ते मोठे व्यासपीठ झाले आहेत. त्यांना जाहिरातीसाठी भरपूर पैसेही मिळतात.

इथे तुम्ही फक्त हे तीनच व्यासपीठ वापरावेत असं नाही, जर तुम्हाला इतर सोशल मीडिया माध्यमातही व्यवसायाच्या संधी दिसत असतील तर त्याचाही वापर करावा. फेसबुरी, इन्स्टा आणि यु ट्यूब हे सर्वात मोठे व्यासपीठ आहेत म्हणून मी या तीन वरच भर दिलेला आहे. पाण्यात आणखीही माध्यमांचा विचार आपण करू शकतो.

चांगले कंटेन्ट हा या व्यवसायाचा गाभा आहे. मागच्या वर्षभरात आपल्या उद्योजक मित्र फेसबुक पेज वर ६० हजार फॉलोअर्स वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंट सुरु केले तर आज त्यावर दिवसाला ४०० पेक्षा जास्त फॉलोवर्स वाढत आहेत. कंटेन्ट असतील तर लोक जोडले जातातच. हेच तुम्हाला करायचं आहे. पण खास व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करायचा आहे इतकंच.

फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट शक्यतो एंटरटेनमेंटशी निगडित असावेत, याला लवकर फॉलोअर्स मिळतात. यु ट्यूब वर कोणतेही व्हिडीओ चालू शकतात. इथे लोकांना काहीही आवडू शकतं. त्यामुळे इथे भरपूर प्रयोग करत रहा.

सर्व्हिस इंडस्ट्रीचा जमाना आहे. यात अशा सोशल मीडिया व्यासपीठाचा वापर करून जर तुम्हाला व्यवसाय उभारता आला तर बातच न्यारी. हे क्षेत्र भविष्यात वाढतच जाणार आहे. आज फेसबुक, इन्स्टा, यु ट्यूब आहे, भविष्यात ते बंद होऊन दुसरे काही सुरु झालेलं असेल. पण एकदा या इंडस्ट्रीमधे तुम्ही सुरुवात केल्यावर त्या प्रत्येकाशी तुम्ही जुळवून घेणारच आहात.

फक्त टाईमपास करण्यासाठी हि माध्यमे वापरू नका. इथे भरपूर पैसा मिळू शकतो. जम बसायला थोडा वेळ लागतो. पण तो व्यवसायाचा नियमच आहे. काहीतरी वेगळं करायचं असेल तर सोशल मीडिया इंडस्ट्री चांगला पर्याय आहे.

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!