‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
सुनील भरती मित्तल, हे १९९६ मधे स्थापन झालेल्या “भरती इंटरप्रायजेस लिमिटेड” चे संस्थापक, कार्यकारी अध्यक्ष आणि ग्रुप चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
आज “भरती इंटरप्रायजेस लिमिटेड” टेलिकम्युनिकेशन, आर्थिक सल्लासेवा, किरकोळ विक्री, स्थावर आणि शेती उत्पादने इत्यादी क्षेत्रात काम करते. कंपनीचा एक भाग असलेली भरती एअरटेल हि कंपनी सेवा घेणाऱ्या ग्राहकांचा विचार करता भारतातील सर्वात मोठी आणि जगातील चौथ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. जिओ चा परिणाम झाला असला तरी अजूनही कंपनीचे स्बस्क्रायबर्स सर्वात जास्त आहेत. कंपनीचे काम आता आशिया आणि आफ्रिका खंडातील २० देशात काम चालते. २००७ ला सुनील मित्तल यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ या किताबाने गौरविले आहे.
सुनील मित्तल यांच्या काह बीझनेस टिप्स नवउद्योजकांसाठी उपयोगी आहेत…
कोणतेही स्वप्न अशक्य नाही
छोट्या छोट्या सुधारणा नाही, क्रांतिकारक सुधारणा करणे महत्वाचे आहे
जागतिक विचार करा आणि स्थानिक ठिकाणी काम करा. प्रत्येक बाजारपेठ हि तिच्यापुरती अनोखीच असते, त्यात आश्चर्यकारक तफावत असू शकते, कोणताही एक साचा दुसऱ्या ठिकाणी जसाच्या तास उपयुक्त ठरत नाही. निरनिराळ्या बाजारपेठेसाठी तुमचा साचा अनुकूल बनविणे हेच यशाचे गमक असते
संस्थेच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी योग्य वेळी योग्य माणसे निवडा
प्रत्येक कामगारांत एक उद्योजक असतो, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना त्यांच्यातील क्षमता शोधायला बळ द्या. संपूर्ण संस्थेतच घेतलेल्या निर्णयाबद्दल आपलेपणाची, स्वामित्वाची भावना असणारी संस्कृती निर्माण करा.
नाविन्याची आणि सहजतेची ज्योत सतत धगधगती ठेवा
_
संकलन
उद्योजक मित्र
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र
Nice