जगातील सर्वात मोठी फर्निचर कंपनी IKEA चे संस्थापक इंग्वार काम्प्राड यांच्या Business Tips


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

‘इंग्वार काम्प्राड’ हे जगातील सर्वात मोठ्या फर्निचर उत्पादक व रिटेल कंपनीचे, IKEA चे, संस्थापक होते. स्वीडन मधे जन्मलेल्या इंग्वार काम्प्राड यांनी १९४३ मधे IKEA ची सुरुवात केली. एका छोट्याश्या शॉप सुरु झालेली हि कंपनी आज जगातील सर्वात मोठी फर्निचर रिटेल साखळी असणारी कंपनी झाली आहे. वयाच्या ९१ व्य वर्षी २७ जानेवारी २०१८ रोजी इंग्वार काम्प्राड यांचा मृत्यू झाला. ते जगातील सर्वात श्रीमंत्यांच्या रांगेतही टॉप २५ मधे होते. मृत्यूसमयी त्यांची संपत्ती जवळजवळ ६० अब्ज डॉलर्स होती.

इंग्वार काम्प्राड यांच्या बिझनेस टिप्स आजच्या उद्यजकांसाठीही उपयोगी आहेत… म्हणूनच आमच्या वाचकांसाठी इंग्वार काम्प्राड यांच्या अमूल्य विचारांचे संकलन इथे देत आहोत

स्वच्छ, प्रांजळ तसेच सद्सदविवेक जागा ठेऊन व्यवसाय करण्याची वृत्ती अंतिमतः नेहमीच लाभदायक ठरते. सभोवतालच्या वातावरणच, वास्तवाचा सन्मान करण्याची आपली वृत्ती दिवसेंदिवस वाढवत नेली पाहिजे

आपले इप्सित ध्येय साधण्यात रोमांच नसतो तर त्याच्या प्रवासातच मोठा आनंद असतो.

व्यवसायाचा सर्वांगीण विकास व विस्तार हा आमचा स्वभावधर्म आहे. जे या बाबतीत उदासीन असतात किंवा आमच्या कार्यात सहभागी होत नाहीत, त्यांची खरोखरीच कीव करावीशी वाटते. तुम्ही याला तर तुमच्या बरोबर अन्यथा तुमच्या शिवाय, पण कार्य पुढे चालू राहणारच. कारण यातून झगमगाटी भविष्यावैभव आकाराला येते, यावर आमचा विश्वास आहे.

तुमचे जीवन हे दहा-दहा मिनिटांच्या तुकड्यांमधे विभागा… खरं तर केवळ दहा मिनिटांच्या छोट्याश्या कालावधीत तुम्ही खूप काही साधू शकता. पण एकदा का हा वेळ निरर्थकतेत घालवला तर मात्र तुमच्या हातात फक्त टरफलं राहतील…

मला ८० व्य वर्षात पदार्पण करताना अजिबात भीती वाटत नाही, कारण मला खूप काही सौंदर्यपूर्ण व अर्थपूर्ण जीवन जगायचे आहे. काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत… खरं तर मला मरायलाही फुरसत नाही.

सर्वोत्कृष्ट नेतृत्वाचे शहाणपण आपण आपल्यातूनच अभिव्यक्त करायला हवे. माझ्या IKEA च्या सहकाऱ्यांपुढे नेतृत्वाचे साक्षात उदाहरण मलाच ठेवावे लागते.

उद्योग व्यवसायात विविध व्यवस्थापकीय पदांवर यापुढे जास्तीत जास्त महिलांनाच संधी दिली पाहिजे. कारण घरातल्या वा कुटुंबातल्या प्रत्येक बाबींवर त्यांचेच निर्णय व नियोजन असते.

धोरणात्मक दिशा व दृष्टी ठरविताना साधेपणा, समग्रता तसेच व्यवहारज्ञान या गोष्टी नेहमीच उपयुक्त ठरतात.

वास्तवाचे भान न ठेवता आपण नेहमीच निरर्थक – अवास्तव चर्चा करत राहतो आणि आयुष्यातला खूप वेळ वाया घालवतो. इतकेच नव्हे तर छोट्या छोट्या गोष्टींवर त्वरित निर्णय घेण्यात सुद्धा व्यवस्थापन नेहमीच असमर्थता दर्शवते. अर्थात आमच्या IKEA चे संचालक मंडळही याला अपवाद नाहीत.

आपले कार्य पूर्ण झाले असे समजून एका यशबिंदूवर स्थिर होणे हा मृत्यूचं असतो. अशी निवृत्त माणसे चटकन विस्मृतीत जातात. ज्या कंपनीला आपण आखलेली ध्येये पूर्णझाली आहेत असे वाटते तिथे प्रगतीही चैतन्यहीन होते.

आपल्या ग्राहकांच्या दृष्टीने जे चांगले सर्वोत्तम असते, ते कालांतराने आमच्यासाठीही दीर्घकाळ चांगलेच ठरते.

कृतिशील माणसाकडून चूक होणे साहजिक आहे. आम्ही कधीच चुकत नाही असे म्हणणारे लोकच खरे दांभिक असतात.

चांगल्या गोष्टी सातत्याने घडाव्यात असे जर आपणास वाटत असेल तर नुसता लोकांना उपदेश करून उपयोगाचे नाही तर स्वतःच एक आदर्श निर्माण करीत, व्यवसायाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे मला अगत्याचे वाटते. आणि मला त्याचा अभिमान आहे.
_

संकलन
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “जगातील सर्वात मोठी फर्निचर कंपनी IKEA चे संस्थापक इंग्वार काम्प्राड यांच्या Business Tips

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!