प्रेझेंटेशन आणी ब्रँड


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

बरेच जण प्रेझेन्टेशन आणि ब्रँड यामधे गल्लत करतात. प्रेझेन्टेशन, भपका यालाच ब्रँड समजतात. पण या दोन्ही संज्ञांमधे खूप फरक आहे…

एक उदाहरण घेऊया…

तुम्ही एखादा व्यवसाय सुरु केलाय.. लाखो रुपये खर्चुन ऑफिस डिझाईन केलं…. दररोज महागड्या चारचाकीमधुन सुटाबुटात तुम्ही ऑफिस मधे येताय.. तुमचा भपका पाहुनच क्लायंट्स तुमच्याकडे यायला लागले…. तुम्ही म्हणाल ती फि द्यायला लागले

हे झालं प्रेझेंटेशन

तुम्हाला कदाचित वाटेल कि एवढं मोठं प्रेझेन्टेशन, भव्य सेटअप केल्यामुळे लोकांच्या मनात आपला ब्रँड आता निर्माण झालाय; पण असे नसते… ते फक्त प्रेझेंटेशनच असते.

::::::::::::::::::::::::

तुमच ऑफिस म्हणजे (घरामधेच कुठेतरी किंवा बाहेर) एखाद्या खोलीत बसवलेला छोटासा सेटअप आहे… तुम्ही सामान्य दिसाल अशा कपड्यात आहात… ऑफिसवर येतानाही चारचाकीची अडचण नको म्हणुन एखाद्या दुचाकीवर, मोपेडपर येताय…

पण तुमचा असा सामान्य सेटअप पाहुनही “त्यांच्या आवतारावर जाउ नको, त्यांच्याकडे मिळणारी माहिती, सेवा दुसरीकडे कुठेही मिळत नाही… त्यांच्याकडेच जा, पैशापेक्षा काम होणं महत्वाचं”… अशीच चर्चा होते… असेच सल्ले दिले जातात…

याला म्हणतात ब्रँड…

::::::::::::::::::

तुमचा ब्रँड ऐकून लोक तुमच्या प्रोडक्ट वर, सर्व्हिस वर डोळे झाकून विश्वास ठेवायला लागतात, तेव्हा तुम्ही ब्रँड बनण्याकडे वाटचाल सुरु केलेली असते.

प्रेझेंटेशन करणं सोपं आहे, ब्रँड बनवणं अवघड.

ब्रँड बनवण्यासाठी लागते प्रचंड मेहनत, जिद्द, कौशल्य, विश्वास, शिस्त, गुणवत्ता, नियोजन, सातत्य आणि दृष्टीकोण….

आधी चांगलं प्रेझेंटेशन करून ग्राहकांना आकर्षित करणे आणि मग त्यांना चांगली सेवा गुणवत्ता देऊन आपला ब्रँड तयार करणे हि सामान्यपणे केली जाणारी प्रॅक्टिस आहे, आणि याव्यतिरिक्त दुसरा मार्गही नाही. पण जर तुमच्याकडे प्रेझेंटेशन साठी पुरेशी गुंतवणूक क्षमता नसेल, अगदी शून्यातूनच व्यवसायाला सुरुवात केली असेल तर मात्र तुम्ही आपल्या गुणवणवत्ता आणि सेवेवर प्रचंड मेहेनत घेणे आवश्यक असते, यात जराशीही तडजोड करून जमत नाही. इथे थोडा वेळ लागतो, पण हळू हळू लोकांच्या मनात तुमचा ब्रँड घर करायला लागतो… याचेच परिवर्तन ब्रँड निर्माण होण्यात होते.

प्रेझेंटेशन मुळे ब्रँड मधील एखादी चूक धकून जाऊ शकते, पण याला मर्यादा आहेत. सेवा गुणवत्ता यात जर खराब कामगिरी होत असेल तर प्रेझेंटेशन सुद्धा ब्रँड ला संपण्यापासून वाचवू शकत नाही.

प्रेझेंटेशन तात्पुरतं असतं, ब्रँड कायमचा.
ब्रँड बनवण्यासाठी प्रेझेंटेशन लागत असेल,
पण ब्रँड टिकवण्यासाठी प्रामाणीक मेहनतंच लागते…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


6 thoughts on “प्रेझेंटेशन आणी ब्रँड

  1. पोस्ट छान आहे सर, तुमच्या सगळ्या पोस्ट मुळे ज्ञानात खूप भर पडली. शंका कमी झाल्या…????

  2. सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं
    धन्यवाद सर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!