‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
उन्हाळा दोन महिन्यावर आलाय… उन्हाळ्यात असणाऱ्या व्यवसायाच्या संधींचा शोध घेऊन त्याची सुरुवात आत्तापासूनच करणे आवश्यक आहे. सीझननुसार व्यवसाय करणारे बरेच जण मार्केटमधे आहेत. तरीही यात अजूनही चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
एखाद्या चांगल्या लोकेशन ला १०० स्क्वे. फु. जरी शॉप असेल तरी तुमचा व्यवसाय चांगला चालू शकतो. तसेच अशी जागा उपलब्ध नसल्यास घरातूनही व्यवसाय करणे अवघड नाही. शॉप जनरल स्टोअर म्हणूनच चालवावे.
टोपी, रंगीत छत्र्या, सावलीसाठी वापरले जाणारे कापड, गॉगल, उष्णता कमी करणारी थंड पेय, अशा कितीतरी वस्तूंची मागणी उन्हाळ्यात वाढत असते.
कुलरला व कुलर दुरुस्तीला या सिझन मधे खूप मागणी असते. विदर्भातून कुलर चे स्पेअर आणून असेम्बल करून विकू शकता किंवा थेट तयार कुलर विकू शकता.
कोकणात किनारपट्टीच्या परिसरात व सह्याद्री सातपुड्यातील थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाशी निगडित वस्तूंना भरपूर मागणी असते कारण बराच शहरी वर्ग उन्हाळ्यामध्ये सुट्टीसाठी याच ठिकाणी जातो.
एखाद्या चांगल्या ठिकाणी ज्यूस सेंटर किंवा उसाच्या रसाचे दुकानही खूप चालते. जम बसल्यास हा व्यवसाय कायमस्वरूपीही होऊ शकतो.
स्थानिक परिस्थितीमधे असेच आणखीनही काही व्यवसाय सापडू शकतात.
तुम्ही अशाच काही वस्तूंची निवड करून व्यवसाय सुरु करा. चार महिन्यात जम बसेल आणि काही महिन्यात एक कायमस्वरूपी व्यवसाय सुरु होईल. या वस्तू (पेय वगळता) मुंबई मार्केट मध्ये व्होलसेल मध्ये अतिशय कमी किमतीत मिळतात. थंड पेय तुम्हाला स्थानिक परिसरातील चांगल्या उत्पादकाकांकडून उपलब्ध होऊ शकतील. गुंतवणूक जास्त लागणार नाही, सुरुवात काही हजारात करता येईल, एकेक वस्तू वाढवत न्या, हळूहळू मोठा व्यवसाय उभा राहील. आपल्याच शहरातील ग्राहक वर्ग टार्गेट करणार असाल तर शहरातील परिसरातील चांगले लोकेशन शॉपसाठी निवड, पर्यटन स्थळी सुरुवात करणार असाल तर मुख्य मार्केटमधे किंवा त्याच्या आसपासच शॉप पहा. काहीजण तर थेट एखादी ओम्नी सारखी गाडी घेऊनच त्यातून विक्री करतात. हाही उत्तम पर्याय आहे. संधी दिसेल तिथे व्यवसाय सुरु करता येतो.
शॉप मधून विक्रीसाठी प्रोडक्ट निवडताना किमान ३०% प्रोडक्ट ची मागणी वर्षभर असेल असे निवडा आणि उरलेले ७०% सीझननुसार बदलत रहा. प्रत्येक सीझननुसार आणि सण-वारानुसार प्रोडक्ट मधे बदल करत रहा. त्या-त्यावेळी जे खपेल ते विकण्याचा प्रयत्न करत रहा. ३०% कायमस्वरूपी विकणारे प्रोडक्ट तुम्हाला एक फिक्स ग्राहक वर्ग निर्माण करून देतील आणि सीझननुसार प्रोडक्ट तुम्हाला प्रत्येक सीझनमधील अतिरिक्त वाढणारे ग्राहक मिळवून देतील.
करा तर मग, या उन्हाळ्यापासून नवीन व्यवसायाची सुरुवात…
उद्योजक व्हा…
_
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
माझे इलेक्ट्रिक दुकान आहे मला कुलर चा व्यवसाय करायचा आहे त्यासाठी विदर्भातील कुलर होलसेलर ची माहीत मिळेल का
मला इलेक्ट्रिकल चे दुकान चालू करायचे आहे आपण माल कुठून आणता याबद्दल मार्गदर्शन करा माझा नंबर 9766434374
खूप छान
खरंच हे उद्योग सुरु होऊ शकताय
Any wholesale product supply fast running