स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार

१. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.

२. उठा, जागे व्हा!! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका!

३. ध्येयासाठी जगणे, हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा. खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्‍चित ध्येयाप्रत पोचू शकाल.

४. शक्‍यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्‍यतेच्या पुढे निघून जायला हवे.

५. सामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.

६. तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.

७. देवाला जर आपण आपल्या अंत:करणात आणि प्रत्येक जिवंत व्यक्तीत शोधू शकलो नाहीत, तर त्याला शोधायला जाणार कोठे?

८. एक काम करत असताना एकच काम करा. आपले सर्वस्व त्यात अर्पण करा. इतर सारे काही विसरून जा.

९. दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

१०. अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.

११. कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.

१२. समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.

१३. स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

१४. अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

१५. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.

१६. चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.

१७. तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल. कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

१८. दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.

१९. भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.

२०. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

२१. द्वेष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.

२२. संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधे असायला हवी.

२३. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.
__________________

संकलन
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!