फॉरेन पॉलिसी या अमेरिकी प्रकाशनगृहातर्फे दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या टॉप ग्लोबल थिंकर्स या सूचीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजच्या मुकेश अंबानी यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकाशनगृहातर्फे शंभर जणांची सूची प्रसिद्ध करण्यात येते. यातील प्रमुख नावांची घोषणा बुधवारी करण्यात आली. उर्वरित नावे २२ जानेवारीला घोषित होतील.
या सूचीमध्ये अंबानी यांच्यासह अलीबाबाचे संस्थापक जॅक मा, अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ख्रिस्टाइन लॅगार्ड यांचाही समावेश आहे. ४४.३ अब्ज अमेरिकी डॉलरची संपत्ती असणाऱ्या अंबानी यांनी गेल्या वर्षी जॅक मा यांना मागे टाकले. इंधन, वायू व रिटेल व्यवसायात त्यांच्या कंपनीने मोठी झेप घेतली आहे. मात्र त्यांची जिओ मोबाइलसेवा भारतीय उद्योगविश्वात सर्वाधिक परिणामकारक ठरली आहे,’ असे या प्रकाशनगृहाने म्हटले आहे.