कामाला किंमत द्या, कामाच्या स्वरूपाला नाही…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

कोई भी धंदा छोटा नही होता
और धंदे से बडा धरम नही होता

फक्त या एका डायलॉग साठी मी ‘रईस’ चित्रपट पहिला होता. माझ्या आवडीच्या डायलॉग मधील बेस्ट डायलॉग आहे हा….

कोणताच व्यावसाय लहान मोठा नसतो, तो फक्त आणि फक्त व्यवसाय असतो… तुम्ही करत असलेलं प्रत्येक काम सन्मानजनक असतं. पण आपल्याकडे अजूनही कामाची किंमत केली जात नाही. तुम्ही कोणता व्यवसाय करता किंवा कुठे नोकरी करता किंवा काय काम करता यावरून तुमची लायकी ठरवली जाते. तुम्ही काम करता हे महत्वाचं नसतं तर तुम्ही काय काम करता हेच पाहिलं जातं. नोकरी करत असाल तर उच्च दर्जाचीच पाहिजे, व्यवसाय करत असाल तर भाला मोठा पसारा असलाच पाहिजे, असले काहीसे आडाखे आपण बांधून ठेवलेले आहेत. आपण कामाला किंमत न देता कामाच्या स्वरूपाला किंमत देत आहोत.

प्लम्बर, वायरमन, वेल्डर, पेंटर, चहाची टपरी, वडापाव ची गाडी, भज्याची गाडी, भाजीपाला विक्री, पान टपरी असले व्यवसाय पाहिले कि आपण नाक मुरडतो, जणू काय हे खालच्या दर्जाचे उद्योग आहेत. गुंतवणूक क्षमता नसलेल्या एखाद्याला यातलाच एखादा व्यवसाय कर म्हटलं तर ‘मी काय असलेधंदे करायचे का?’ असं प्रत्युत्तर मिळतं. खरं तर यात काहीच लॉजिक नाही, या असल्या वृत्तीमुळे आपल्यातील कित्येकजण पिछाडीवर पडलेत, पण अजूनही आपण सुधारायला तयार नाही. अगदी हे व्यवसाय करणाऱ्या मुलांना लग्नासाठी लवकर मुलीसुद्धा मिळत नाहीत एवढा कहर झालाय… असंच चालू राहील तर आपलं आणि आपल्या देशाचं भविष्य अवघड आहे असंच म्हणावं लागेल.

कामाची किंमत करायला पाहिजे. कोणतही काम असो ते सन्मानजनकच असतं. कष्ट करणाऱ्या, काम करणाऱ्या प्रत्येकाला मानाचा दर्जा दिलाच गेला पाहिजे. पाश्चिमात्य देशांच्या प्रगतीच मुख्य कारण, ते सर्व प्रकारच्या कामाला सारखीच किंमत देतात हेच आहे… आपल्यालाही अशी मानसिकता तयार करावीच लागणार आहे. अगदी रस्त्याच्या कडेला बसून चणे फुटाणे विकणारा, बूट पॉलिश करणारा सुद्धा एखाद्या मोठ्या उद्योजकाएवढाच सन्मानास पात्र असतो. आणि आता बदलेली परिस्थिती पाहता कोणता व्यवसाय तुम्हाला कोणत्या स्तरावर घेऊन जाईल तुम्ही काहीच अंदाज बंधू शकत नाही. आज सायकल वर फिरणारा वर्ष दोन वर्षात आलिशान कार मध्ये फिरताना दिसू शकतो. कुणाचीही परिस्थिती कोणत्याही व्यवसायात क्षणार्धात बदलू शकते. त्यामुळे जुन्या पारंपरिक नजरेतून जरी बघायचं म्हटलं तरी कोणतही काम आता कमी दर्जाचं राहिलेलं नाही.

कोणताच व्यवसाय लहान नसतो, कमी दर्जाचा नसतो; हि मानसिकता ठेऊनच व्यवसायात उतरणे आवश्यक असते. मी स्वतः माझ्याकडे एका टेलिकॉम कंपनीचे डिस्ट्रिब्युशन असताना रस्त्याच्या कडेला स्टॉल उभा करून दिवसभर सिम, मोबाईल, इंटरनेट मोडेम ची विक्री केलेली आहे, त्याचवेळी माझे सेल्स ची मुलं तोंडाला रुमाल बांधून उभं राहायची… याने झालं एकंच, ती मुलं आजही तेच काम करत आहेत, आणि मी बराच पुढे आलेलो आहे.

कामाला किंमत द्या, कामाच्या स्वरूपाला नाही…

कोई भी धंदा छोटा नही होता,
और धंदेसे बडा कोई धरम नही होता…
व्यवसाय उतरायचं असेल तर हे सूत्र तोंडपाठ असायलाच हवं…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!