‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
१० वर्षाचं चॅलेंज घ्यायचंच, तर मग ते गुंतवणुकीच घ्यायला काय हरकत आहे? कोणत्या गुंतवणुकीने मागच्या १० वर्षात किती परतावा दिला आहे याचा अभ्यास करण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यातली सर्वात मोठी गुंतवणूक आहे ती शेअर मार्केटमधील गुंतवणूक.
खरं तर आपल्याला, मुख्यत्वे मराठी माणसाला, शेअर मार्केट म्हणजे सट्टाच वाटतो. जणू काय इथे अधांतरीच पैसा गुंतवला जातो. पण हा सगळा भ्रम आहे. शेअर मार्केटमधे अतिशय विचारपूर्वक पैसे गुंतवले जातात. आणि हे मार्केट चांगला परतावाही देतं.
शेअर मार्केटमधे तोट्यात गेलेले शक्यतो काही ठराविक पठडीतले लोक असतात.
एक तर हे नवखे इंट्रा-डे ट्रेडर्स असतात. म्हणजे ज्याला दहा हजार गुंतवून दिवसाला चार पाच हजार कमवायचे असतात. असे लोक हमखास ट्रॅप होतात. कारण इंट्राडे ट्रेडिंग साठी प्रचंड अनुभव आणि अभ्यास लागतो, जो यांच्याकडे नसतो. कुणाच्यातरी सांगण्यावर हे ट्रेड करतात आणि फसतात.
यानंतर एक वर्ग असतो तो म्हणजे एखाद्या एजंट / ब्रोकर च्या सांगण्यावर किंवा एखादा ब्लॉग वाचून कमी कालावधीत खूप परतावा मिळण्याच्या हव्यासापायी कोणताही अभ्यास न करता एखाद्या अनोळखी कंपनीमधे पैसे गुंतवतात. हे लोकसुद्धा या ट्रॅप मधे हमखास फसतात.
काही लोक असतात जे कंपन्यांचे शेअर्स उच्च पातळीवर असताना खरेदी करतात आणि ते पडायला लागले कि लगेच गडबडीत विकून मोकळे होतात. जणू काय भविष्यात पुन्हा त्याचे भाव वाढणारच नाहीयेत. म्हणजे आज एखाद्या कंपनीचा शेअर १०० रुपयांवर आहे. मागच्या महिनाभरापासून तो चांगला वाढत आहे. ती वाढ पाहून तुम्ही तो खरेदी करता आणि नेमकी त्याची पडझड सुरु होते. शंभर चा शेअर ९० वर येतो. आणि तुम्ही आणखी नुकसान नको म्हणून लगेच तो १० रुपये तोट्यात विकून टाकता. तो का पडतोय, ते तात्पुरतं करेक्शन आहे कि काही मोठी गडबड आहे याचा तुम्ही अभ्यासच करत नाही. पण बऱ्याचदा ते तात्पुरतं करेक्शन असतं, आणि तुम्ही विकल्यानंतर काही दिवसांनी तो शेअर पुन्हा वाढायला लागतो आणि दीडशे पर्यंत पोहोचतोही. मग तुम्ही त्याला सट्टा म्हणता.
काही असतात जे कोणताच अभ्यास करत नाहीत. चार्ट काय सांगतोय, मार्केटची परिस्थिती काय आहे, आपण गुंतवत असलेल्या कंपनीचे भविष्यातील प्लॅन काय आहेत याचा कोणताही अभ्यास न करत गुंतवणूक करतात आणि फसतात.
एक मोठा वर्ग आहे जो स्टॉप लॉस लावत नाही. हा वर्ग एक खूप मोठ्या प्रमाणावर मार्केटमधे अडकतो. पण चूक सर्वस्वी यांची असते. शेअर च्या रेट वर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. स्टॉप लॉस लावणे मह्त्वाचे असते. म्हणजे तुम्ही शंभर रुपयांवर शेअर घेतला असेल, तर तुम्ही चार्ट चा अभ्यास करून शेअर किती रकमेच्या खाली आला तर विकून टाकायचा याचाही अभ्यास करणे आवश्यक असते. स्टॉप लॉस न लावणारा वर्ग एक खूप मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केट मधे अडकतो…
हि झाली शेअर मार्केटमधे अडकणारी उदाहरणे… आता फायद्याची उदाहरणे बघुया.
गुंतवणुकीच्या विविध क्षेत्रांमधे शेअर मार्केटसारखा परतावा देणारे रिअल इस्टेट वगळता इतर क्षेत्रे नाहीत. शेअर मार्केटमधे लॉन्ग टर्म गुंतवणूक हि नेहमी फायद्याचीच ठरते. आज शेअर घेतला आणि तो उद्या वाढलाच पाहिजे असले हिशोब करायचे नसतात. तो आज घेतलाय आणि पुढच्या दहा वर्षांनी किती असणार आहे याचाच हिशोब करायचा असतो. आणि या दहा वर्षांच्या कालावधीत तो तुम्हाला चांगला परतावा देतोच.
वॉरेन बफेंनी आपला पहिला शेअर १२ व्य वर्षी घेतला होता, आणि जागतिक महामंदीच्या काळात जिथे सगळे गुंतवणूकदार शेअर्स विकत होते तिथे बफेंनी शेअर्स घेण्याचा धडाका लावला होता. आज त्याचा रिझल्ट आपल्यासमोर आहे. मागच्या तीस वर्षांपासून बफे शेअर मार्केट चे बादशहा म्हणूनच ओळखले जातात.
हे क्षेत्र पैसा गुंतवण्याचे आहे, पैसा फिरविण्याचे नाही. इथे एकदा पैसा गुंतवला कि दहा वीस वर्षे त्याकडे ढुंकूनही पाहायचे नसते. गुंतवलेल्या कंपनीत काही मोठी गडबड झाली तरच त्यातून बाहेर पडायचे असते. बफे म्हणतात तसे, आज शेअर घेतल्यानंतर उद्यापासून शेअर मार्केट दहा वर्षासाठी बंद आहे असेच समजून चालायचे असते. काही ट्रेड तोट्यात जाऊ शकतात, नाही असं नाही. पण कुठे थांबायचं हे माहित असायला हवं.
शेअर मार्केट मधील लॉन्ग टर्म गुंतवणूक तुम्हाला हमखास चांगला परतावा देते. शेअर्स वाढले किंवा कमी झाले तरी प्रत्येक वर्षी तुम्हाला डिव्हीडंड हमखास मिळतो, म्हणजे एखादे शॉप विकत घेऊन ते भाड्याने दिल्यासारखे आहे. कायमस्वरूपी परतावा आणि संपत्तीचेही मूल्य वाढते राहते.
10 Years Challenge ची मागच्या काही दिवसात सोशल मीडियामधे चांगलीच चर्चा होती. म्हणून त्याचाच धागा पकडून दहा वर्षातील शेअर मार्केटमधील महत्वाच्या कंपन्यांची मागच्या १० वर्षातील कामगिरी तुमच्यासमोर मांडत आहे. हि आकडेवारी पाहून डोकं चक्रावून जातं.
खाली दिलेल्या चार्ट मधे निफ्टी ५० मधे समाविष्ट असलेल्या ५० कंपन्यांचे शेअर चे भाव आहेत. सोबत आणखी काही कंपन्यांची कामगिरी दिली आहे.
यात कंपन्यांची जानेवारी २००९ मधील शेअरची किंमत, आजची किंमत, झालेला बदल टक्क्यांमधे, मागील दहा वर्षातील सर्वोच्च किंमत आणि त्याचा टक्क्यांमधे बदल याचा सविस्तर चार्ट आहे. हा चार्ट नीट अभ्यासल्यास तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अंदाज येईल. आधी चार्ट अभ्यासा त्यानंतर त्याखाली पुढची माहिती…
(Vertical Mobile View मधे चार्ट पूर्ण दिसत नाही, शक्यतो डेस्कटॉप वर चार्ट बघा किंवा मोबाईल आडवा करून पहा)
Company | Share price in Jan 2009 | Share price in Jan 2019 | Change in Rs. | Change In % | Highest reach | Change in Rs. | Change in % |
Companies in Nifty50 | |||||||
ITC | 50.0 | 275.0 | 225.0 | 450% | 367.0 | 317.0 | 634% |
Cipla | 195.0 | 492.0 | 297.0 | 152.3% | 750.0 | 555.0 | 284.6% |
Dr. Reddys Lab | 475.0 | 2624.0 | 2149.0 | 452% | 4386.0 | 3911.0 | 823.4% |
Lupin | 124.0 | 865.0 | 741.0 | 597% | 2000.0 | 1876.0 | 1512.9% |
Sun Pharma | 105.0 | 411.0 | 306.0 | 291.4% | 1200.0 | 1095.0 | 1042.9% |
HCL tech | 60.0 | 977.0 | 917.0 | 1528.3% | 1125.0 | 1065.0 | 1775% |
Infosys | 142.0 | 727.0 | 585.0 | 412% | 755.0 | 613.0 | 431.7% |
Tech Mahindra | 70.0 | 735.0 | 665.0 | 950% | 780.0 | 710.0 | 1014.3% |
Wipro | 65.0 | 355.0 | 290.0 | 446% | 362.0 | 297.0 | 456.9% |
TCS | 123.0 | 1955.0 | 1832.0 | 1489.4% | 2276.0 | 2153.0 | 1750.4% |
Grasim | 211.0 | 732.0 | 521.0 | 247% | 1375.0 | 1164.0 | 551.7% |
Ultratech Cement | 395.0 | 3374.0 | 2979.0 | 754.2% | 4600.0 | 4205.0 | 1064.6% |
Bajaj Auto | 205.0 | 2565.0 | 2360.0 | 1151.2% | 3468.0 | 3263.0 | 1591.7% |
Hero Motocorp | 802.0 | 2598.0 | 1796.0 | 223.9% | 4092.0 | 3290.0 | 410.2% |
Eicher Motors | 238.0 | 19987.0 | 19749.0 | 8297.9% | 33480.0 | 33242.0 | 13967.2% |
Mahindra & Mahindra | 71.0 | 673.0 | 602.0 | 847.9% | 993.0 | 922.0 | 1298.6% |
Maruti Suzuki | 579.0 | 6511.0 | 5932.0 | 1024.5% | 9996.0 | 9417.0 | 1626.4% |
Tata Motors | 37.0 | 172.0 | 135.0 | 364.9% | 612.0 | 575.0 | 1554.1% |
Axix Bank | 110.0 | 656.0 | 546.0 | 496.6% | 680.0 | 570.0 | 518.2% |
HDFC Bank | 206.0 | 2084.0 | 1878.0 | 911.7% | 2220.0 | 2014.0 | 977.7% |
ICICI Bank | 86.0 | 343.0 | 257.0 | 298.8% | 383.0 | 297.0 | 345.3% |
IndusInd Bank | 44.0 | 1443.0 | 1399.0 | 3179.5% | 2038.0 | 1994.0 | 4531.8% |
Kotak Mahindra Bank | 99.0 | 1260.0 | 1161.0 | 1172.7% | 1417.0 | 1318.0 | 1331.3% |
SBI | 135.0 | 281.0 | 146.0 | 108.1% | 351.0 | 216.0 | 160% |
Yes Bank | 17.5 | 207.0 | 189.5 | 1082.9% | 404.0 | 386.5 | 2208.6% |
Bajaj Finance | 6.4 | 2458.0 | 2451.6 | 38306.3% | 2294.0 | 2287.6 | 35743.8% |
Bajaj Finserv | 160.0 | 6050.0 | 5890.0 | 3681.3% | 7200.0 | 7040.0 | 4400% |
HDFC | 311.0 | 1946.0 | 1635.0 | 525.7% | 2052.0 | 1741.0 | 559.8% |
Indiabulls Housing Fin. From Jan 2014 | 239.0 | 699.0 | 460.0 | 192.5% | 1440.0 | 1201.0 | 502.5% |
Coal India, from Jan 2011 | 315.0 | 225.0 | -90.0 | -28.6% | 447.0 | 132.0 | 41.9% |
Hindalco | 57.0 | 200.0 | 143.0 | 250.9% | 284.0 | 227.0 | 398.2% |
Tata Steel | 233.0 | 445.0 | 212.0 | 91% | 793.0 | 560.0 | 240.3% |
Vedanta | 94.0 | 191.0 | 97.0 | 103.2% | 495.0 | 401.0 | 426.6% |
BPCL | 59.0 | 348.0 | 289.0 | 489.8% | 551.0 | 492.0 | 833.9% |
HPCL | 58.0 | 239.0 | 181.0 | 312.1% | 492.0 | 434.0 | 748.3% |
GAIL | 118.0 | 333.0 | 215.0 | 182.2% | 399.0 | 281.0 | 238.1% |
IOC | 54.0 | 138.0 | 84.0 | 155.6% | 231.0 | 177.0 | 327.8% |
NTPC | 170.0 | 138.0 | -32.0 | -18.8% | 222.0 | 52.0 | 30.6% |
ONGC | 114.0 | 141.0 | 27.0 | 23.7% | 314.0 | 200.0 | 175.4% |
Power Grid | 85.0 | 187.0 | 102.0 | 120% | 226.0 | 141.0 | 165.9% |
Reliance Industries | 325.0 | 1229.0 | 904.0 | 278.2% | 1329.0 | 1004.0 | 308.9% |
Bharti Airtel | 355.0 | 305.0 | -50.0 | -14.1% | 565.0 | 210.0 | 59.2% |
Bharti Infratel from Jan 2013 | 211.0 | 287.0 | 76.0 | 36% | 500.0 | 289.0 | 137% |
Asian Paints | 91.0 | 1379.0 | 1288.0 | 1415.4% | 1490.0 | 1399.0 | 1537.4% |
HUL | 248.0 | 1743.0 | 1495.0 | 602.8% | 1870.0 | 1622.0 | 654% |
L&T | 349.0 | 1300.0 | 951.0 | 272.5% | 1470.0 | 1121.0 | 321.2% |
Zee Ent. | 73.0 | 373.0 | 300.0 | 411% | 619.0 | 546.0 | 747.9% |
Adani Ports | 65.0 | 326.0 | 261.0 | 401.5% | 452.0 | 387.0 | 595.4% |
UPL Ltd. | 107.0 | 760.0 | 653.0 | 610.3% | 902.0 | 795.0 | 743% |
Below, Other than Nifty50 Companies | |||||||
Lupin | 123.0 | 865.0 | 742.0 | 603.3% | 2129.0 | 2006.0 | 1630.9% |
TVS Motors | 11.3 | 477.0 | 465.8 | 4140% | 795.0 | 783.8 | 6966.7% |
Ashok Layland | 7.5 | 83.0 | 75.5 | 1006.7% | 167.0 | 159.5 | 2126.7% |
LIC Housing Fin. | 47.0 | 447.0 | 400.0 | 851.1% | 794.0 | 747.0 | 1589.4% |
V Guard | 3.3 | 200.0 | 196.7 | 5960.6% | 255.0 | 251.7 | 7627.3% |
Bata India | 54.0 | 1094.0 | 1040.0 | 1925.9% | 1177.0 | 1123.0 | 2079.6% |
MRF | 2011.0 | 62560.0 | 60549.0 | 3010.9% | 81400.0 | 79389.0 | 3947.7% |
Tata Chemical | 152.0 | 661.0 | 509.0 | 334.9% | 787.0 | 635.0 | 417.8% |
चार्ट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कि निफ्टी मधील ५० पैकी जवळजवळ ३०-३५ कंपन्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर परतावा दिलेला आहे. फक्त ३ कंपन्यांचे शेअर्स १० वर्षापेक्षा खालच्या पातळीवर आहेत. चार्टमधील कंपन्यांचा १० वर्षांपूर्वीचा रेट आणि आजचा रेट याची टक्केवारीमधे सरासली काढली तर हा परतावा १५००% पेक्षा जास्त आहे. म्हणजे दहा वर्षात जवळजवळ १६ पट परतावा. आणि सर्वोच्च रेट ची सरासरी काढली तर तो १८००% पेक्षा जास्त आहे, म्हणजे १९ पट परतावा….. देतंय का कुणी वर्षाला अडीच पट परतावा ? लाख रुपये गुंतवून वर्षकाठी अडीच लाख रुपये परतावा इतर कोणती गुंतवणूक देते का? नाहीच.
बर.. या चार्ट मधे आणखी काही रंजक गोष्टी आहेत. बऱ्याच कंपन्यांनी दहा वर्षांमधे १०-१५ पट परतावा दिलेला आहे. पण काही कंपन्यांनी ३०-४०-८० पट परतावा दिलेला आहे. बजाज फायनान्स ने दहा वर्षात ३८४ पट परतावा दिलेला आहे तर आयशर मोटर्स ने ८४ पट परतावा दिलेला आहे. म्हणजे बजाज फायनान्स मधे दहा वर्षांपूर्वी लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे ३ कोटी ८४ लाख रुपये झालेले आहेत, आणि आयशर मोटर्स मधे ८४ लाख रुपये. हि फक्त दहा वर्षाची आकडेवारी आहे. अगदी या सगळ्या कंपन्यांचे २००८ मधे मंदीमुळे शेअर्सचे भाव कमी होते असं जरी गृहीत धरलं तर २००८ चे भाव सुद्धा आत्तापेक्षा खूप कमी होते. हीच आकडेवारी २० वर्षांवर नेली तर हा परतावा कितीतरी पटींनी जास्त आहे. इथे दिलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त आणखीही कंपन्या आहेत ज्यांनी कित्येक पटींनी परतावा दिलेला आहे.
आहे का एवढी ताकद इतर कोणत्या गुंतवणुकीमधे ? बिलकुल नाही. मग शेअर मार्केट सट्टा कसा ? हे क्षेत्र सट्टा नाही.
आपण उगाच शेअर मार्केटचा फोबिया बाळगून बसलेलो आहोत. या फोबियामुळे श्रीमंतीच्या खूप मोठ्या मार्गापासून आपण अलिप्त आहोत. या मार्गावर लगेच वाटचाल सुरु करा… फक्त, इथे लगेच काही मिळत नाही, भरपूर संयम लागतो, चांगल्या वाईट काळामधे शांत राहून निर्णय घ्यावे लागतात, आजचा विचार न करता भविष्याचा विचार करावा लागतो. हा विचार करण्याची तुमची क्षमता असेल तर पुढच्या दहा वर्षाचं चॅलेंज आत्ताच घ्या. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स निवडा, भुरट्या सुरट्यांच्या नदी लागू नका, आज दहा गुंतवा उद्या २० मिळावा असल्या अमिषाला बळी पडू नका, चांगल्या सल्लागाराची मदत घ्या, हळूहळू पैसे गुंतवत रहा, आणि दहा वर्षांनी ती गुंतवणूक किती पटींनी वाढली आहे ते पहा… श्रीमंत लोक श्रीमंत का होतात, पैसा पैशावाल्यांकडेच का जातो याचं उत्तर दहा वर्षांनी पुराव्यासहित मिळेल…
अर्थसाक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Good information
Very nice day info
Khup Chan
Greatly explain.
Any body have a contact no. of parson who will guide to invest in mutual fund or shares
महोदय.
मी एक सेवानिवृत्त सैनिक असून मला माझ्या सेवानिवृत्तीय लाभातील 30% रक्कम पुढील 10 वर्षे कालावधी साठी गुंतवयाची आहे. दहा ऊद्योग संस्थाची नावे सुचवावीत.