‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
वर्ल्ड स्टील असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पोलाद उत्पादनामध्ये भारताने जपानला मागे टाकून जगात दुसरे स्थान मिळवले आहे. वर्ल्ड स्टील असोसिएशनने जाहीर केलेल्या या यादीमधे चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षभरात देशांतर्गत पोलाद उत्पादनामध्ये ४.९ टक्के वाढ होऊन ते १०६.५ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे, असे या माहितीमधे म्हटले आहे. १०४.३ दशलक्ष टन पोलाद उत्पादन करणाऱ्या जपानला भारताने मागे टाकले. या यादीमधे चीनने प्रथम स्थान कायम राखले आहे. या उत्पादनाच्या टॉप टेन यादीमधे जपाननंतर अमेरिका, द. कोरिया, रशिया, जर्मनी, तुर्की, ब्राझिल, इराण या देशांचा क्रमांक लागला आहे. जागतिक बाजारपेठेत चीनच्या पोलादाचा वाटा तब्बल ५१.३ टक्के आहे. गेल्या वर्षी चीनच्या पोलाद उत्पादनात साडेसहा टक्क्यांनी वाढ झाली व ते ९२८.३ दशलक्ष टनांवर पोहोचले.
उद्योजक मित्र