‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
वर्ड बँक… शब्द विकणारी कंपनी.
अहमदनगर जिल्ह्यातील ‘किरण बेरड’ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली हि कंपनी शब्द विकते. किरण बेरड हे स्वतः लेखक आहेत. वर्तमानपत्रांसाठी वात्रटिका लिहिण्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज चित्रपट, शॉट फिल्म्स, वेब सिरीज साठी स्क्रिप्ट लिखाण ते स्वतःची शब्द पुरविणारी कंपनी उभारण्यापर्यंत झाला आहे.
ओळखीच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर वर्ड बँक हि कंपनी Content provider कंपनी आहे. कुणालाही लेखनातील काहीही हवे असेल तर ते या कंपनीकडून लिहून मिळते. भाषण, चित्रपटाची स्क्रिप्ट, लघुपटाची स्क्रिप्ट ,जाहिरातींच्या स्लोगन , वेबसाईट कंटेंट रायटिंग, नाटक स्क्रिप्ट, एकांकिका स्क्रिप्ट, सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट, रेडिओ जॉकीची स्क्रिप्ट, चरित्रग्रंथ, टीव्ही ऍड, वेब सिरीज साठी स्क्रिप्ट अशा विविध प्रकारचे कन्टेन्ट कंपनीमार्फत पुरविले जातात. बेरड यांच्या लेखणीने ‘रे राया’, ‘इपितर’ या चित्रपटांसाठी स्क्रिप्ट साकारल्या आहेत, तसेच अनेक शॉर्ट फिल्म, वेब सिरीज साठी लेखन केले आहे. महाराष्ट्रातभर धुमाकूळ घालणारी ‘गावरान मेवा’ हि वेब सीरिज चे लेखनही बेरड यांनीच केलेले आहे.
मार्केटमधील कन्टेन्ट ची गरज पाहून बेरड यांनी सुरु केलेल्या या ‘वर्ड बँकेला’ अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वेबसीरीज, शॉर्ट फिल्म साठी स्क्रिप्ट, वेबसाईटसाठी कन्टेन्ट, स्लोगन, जाहिरातीसाठी स्क्रिप्ट अशा विविध प्रकारच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणावर येत आहेत. मार्केटमधे कंपनीने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे
वर्ड बँकेसाठ बेरड यांनी संपूर्ण भारतातील लेखकांची एक टीम बनवली आहे. आज हे लेखक कस्टमरच्या गरजेनुसार त्यांना लिहून देतात. कुणालाही लेखनातील जे काही हवं असेल ते या वर्ड बँक या कंपनीकडून लिहून मिळते. उदाहरणार्थ भाषण, चित्रपटाची स्क्रिप्ट, लघुपटाची स्क्रिप्ट ,जाहिरातींच्या स्लोगन, वेबसाईट कंटेंट रायटिंग, नाटक स्क्रिप्ट, एकांकिका स्क्रिप्ट, सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट, रेडिओ जॉकीची स्क्रिप्ट, चरित्रग्रंथ, टीव्ही ऍड, वेब सिरीज साठी स्क्रिप्ट अशा कोणत्याही प्रकारचे लेखन काम करून हवे असेल तर या कंपनी कडून लिहून मिळतात.
तुम्हालाही लेखनासंबंधी काही आवश्यकता असेल 7020380335 या नंबरवर कॉल करून अथवा www.wordbank.co.in या वेबसाईटवर जाऊन आपण आपली कन्टेन्ट संदर्भातील मागणी नोंदवू शकता.
तसेच लेखकांनाही या वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करता येते. तुमच्याकडे लेखन कौशल्य असेल तर तुम्हीही या कंपनीसोबत व्हेंडर म्हणून जोडले जाऊ शकता.
__
उद्योजक मित्र