स्टारबक्स मधील टेबल गोल आकाराचे असण्यामागचे मानसशास्त्रीय कारण माहित आहे का?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

स्टारबक्स हि जगातील नामांकित कॅफे चैन मधील एक कंपनी आहे. १९७१ साली स्थापन झालेली हि कंपनी आज २२ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त उलाढाल करते. स्टारबक्स च्या चाहत्यांची कमी नाही. आपल्यापैकी कित्येक जण स्टारबक्स मधे कॉफी पिण्यासाठी कधीतरी गेलेच असतील.

स्टारबक्स मधे गेल्यावर तेथील टेबल ची रचना कधी पहिली आहे का? नसेल पहिली तर पुढच्या वेळेस नक्की पहा.
स्टारबक्स मधील टेबल हे मुख्यत्वे गोल आकाराचे असतात. सोफासेट सोडले तर कॅफे मधील खुर्च्यांसमोर ठेवलेले सर्व टेबल गोल आकाराचेच असतात. जगभर हे टेबल गोल आकाराचेच दिसतील. यामागचे कारण तुम्हाला माहित आहे का?

यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे. कॉफी पिण्यासाठी एकटाच व्यक्ती आला असेल तर या गोल आकाराच्या टेबल मुळे त्याला एकटेपणाची जाणीव होत नाही. चौकोनी आयताकृती आकाराचे टेबल मुळे आपल्यासमोर जास्त मोकळी जागा असल्याची जाणीव होते, पण समोर गोल टेबल असेल तर एका नजरेत हि जागा खूप कमी भासते. यामुळे स्टारबक्स मधे एखाद्या टेबलवर एकटा व्यक्ती असला तरी त्याला एकटेपणाची जाणीव होत नाही. या एकटेपणाच्या जाणिवेतून बाहेर पाडण्यासाठी सुद्धा कित्येकक जण स्टारबक्स च्या कॅफेमधे जाऊन तासनतास बसतात. म्हणूनच स्टारबक्स कॅफेमधे तुम्हाला एक लहान गोल टेबल आणि त्याच्या बाजूने फक्त दोन खुर्च्या असा सेटअप जास्त प्रमाणात दिसतो.

धंदा फक्त एखादा सेटअप उभा करून चालू होत असेल पण मोठा होत नाही, व्यवसाय मोठा करण्यासाठी लोकांच्या मानसिकतेचा विचार करून आपल्या व्यवसायात सुधारणा करणे आवश्यक असते हेच स्टारबक्स च्या उदाहरणावरून दिसते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!