‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
चिनी कंपन्यांच्या आक्रमक मार्केटिंगसमोर कमी पडत असलेल्या, एकेकाळी आघाडीवर असलेल्या, भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी चिनी कंपन्यांपुढे सपशेल शरणागती पत्करली आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इंटेक्स यांसारख्या भारतीय कंपन्या आपल्याच देशात अस्तित्वासाठी झगडत आहेत.
काऊंटरपॉइंट रिसर्च या संस्थेने केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०१४ च्या अखेरीस भारतीय कंपन्यांची स्मार्टफोन बाजारातील हिस्सेदारी जवळपास ५0 टक्के होती. आता ती फक्त ९ टक्के राहिली आहे. चिनी स्मार्टफोन कंपन्यांचा भारतातील बाजारहिस्सा जवळपास ६० टक्क्यांवर गेला आहे.
भारतीय कंपन्यांची मार्केट स्थिती काही वर्षांपूर्वी चांगली होती. परंतु मागील काही वर्षात शिओमी, ओप्पो, विवो सारख्या चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात प्रवेश करून आक्रमक मार्केटिंग चे तंत्र अवलंबले. चिनी कंपन्यांच्या आर्थिक ताकदीसमोर भारतीय कंपन्या तग धरू शकल्या नाही. मागील काही महिन्यांपासून चिनी कंपनी शिओमी हि देशातील सर्वात मोठी स्मार्टफोन विक्रेती कंपनी ठरली आहे. टॉप ५ स्मार्टफोन मध्ये एकही भारतीय ब्रँड नाही.
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील