वॉलमार्ट माघार घेणार नाही


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

भारत सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठेतून माघारीची चर्चा, वॉलमार्ट ने फेटाळून लावली आहे.

भारतात ई-कॉमर्ससंबंधी लागू झालेल्या नव्या धोरणाच्या चौकटीत आमचा व्यवसाय चालूच राहील, असे वॉलमार्टने म्हटले आहे.

वॉलमार्ट ने मागील वर्षी ई-कॉमर्समध्ये आघाडीवर असणाऱ्या फ्लिपकार्टमधील ७७ टक्के भांडवली हिस्सा वॉलमार्टने १६ अब्ज अमेरिकी डॉलरना विकत घेतला होता. मात्र परदेशी गुंतवणूक असणाऱ्या ई-कॉमर्सबाबत सरकारने एक फेब्रुवारीपासून नवे नियम लागू केल्याने अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे वॉलमार्ट लवकरच फ्लिपकार्टमधील हिस्सा विकेल, अशी शक्यता मॉर्गन स्टॅनले या संस्थेने व्यक्त केली होती परंतु वॉलमार्टने हि शक्यता फेटाळून लावली आहे.

वॉलमार्ट व फ्लिपकार्टमध्ये झालेला व्यवहार, त्याची कटिबद्धता दीर्घकालीन आहे. त्यामुळे नव्या नियमांच्या अंमलबजावणीनंतरही आमचा भारतातील व्यवसाय सुरूच राहील. तसेच, भविष्यकालीन संधींचा विचार करता आमच्या व्यवसायात वाढच होईल, असा विश्वास वॉलमार्टने व्यक्त केला. ग्राहकसेवा, रोजगारनिर्मिती, लहान उद्योजक व शेतकऱ्यांचे सहकार्य आदी माध्यमातून आम्ही भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत करू इच्छितो, असेही वॉलमार्टने म्हटले आहे.

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

वेबसाईट बनवा फक्त काही मिनिटात… अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!