व्यवसायासाठी लागणारे आवश्यक शासकीय परवाने


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यासंबंधी विविध प्रकारच्या नोंदणी कराव्या लागतात. यातीलच काही नोंदणी प्रकारांसंबंधी माहिती घेऊयात

१) उद्यम नोंदणी.

कोणत्याही (सूक्ष्म, लघु, मध्यम) उत्पादन अथवा सेवा क्षेत्रातील व्यवसायाची शासन दप्तरी नोंदणी करण्यासाठी उद्यम नोंदणी करणे बंधनकारक आहे. उद्यम हि व्यवसायाची प्राथमिक ओळख असते.
शासनाच्या MSME (लघु सुक्ष्म मध्यम) खात्याच्या उद्योगांसाठी असणाऱ्या विविध योजना व अनुदान, बॅकेंत आपल्या व्यवसायाचे Current Account उघडण्यासाठी व मुद्रा लोन व ईतर कर्ज घेण्यासाठी उद्यम नोंदणी असणे आवश्यक आहे.

2) शाॅप अॅक्ट लायसन्स

नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात शॉप मधून व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो.
व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते. शॉप अधिनियम धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.

शॉप अधिनियम / व्यवसाय दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
१)मालकाचा पासपोर्ट साईज फोटो
२)सहीचा फोटो
३)आधार कार्ड
४)लाईट बील
५)दुकानाचा मराठी बोर्डसह फोटो

सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा.

3) FSSAI फुड लायसन्स परवाना

ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ ची विक्री केली जाते किंवा खाद्य पदार्थ बनविले जातात (उदा.हाॅटेल,किराणा दुकान, घरगुती खाद्य उत्पादन, दुग्धजन्य व्यवसाय, तेल घाना, चायनीज, पाणीपुरी, मिठाई, बेकरी, Repacking,फूड प्रोसेससिंग… ईत्यादी..) त्या सर्वांना FSSAI फुड लायसन्स असणे बंधनकारक आहे.खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता Food Safety and Standard Authority of India (FSSAI) यांचे व्यवसाय मान्यता प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.
अशा परवानगी शिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे,साठविणे,उत्पादन करणे बेकायदेशीर असून अशी बेकायदेशीर कृती करणारांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात.यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण (FSSAI) हे खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना देवू करतात.
हा परवाना १ ते ५ वर्षांसाठी मिळू शकतो .या परवान्यासाठी आवश्यक व्यवसायकाचा स्वतःचा फोटो, आधारकार्ड आहे.

4) GST रजिस्ट्रेशन (वस्तू व सेवा कर)

भारतात एक जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर जीएसटी हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. देशभरात एकसमान करप्रणाली असावी असा उद्देश यामागे होता. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारद्वारे त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली भारतात लागू करण्यात आली.

____________________________

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


67 thoughts on “व्यवसायासाठी लागणारे आवश्यक शासकीय परवाने

  1. माझे दुकान ग्रामपंचायत पातळीवर आहे त्यामध्ये फक्त कांदा बटाटा लसूण या मालाची विक्री होते…. त्यासाठी मला ग्रामपंचायत परवाना गरजेचा आहे का

    1. ग्रामपंचायतीची NOC घेऊन ठेवा… तोच तुमच्या व्यवसायाचा नोंदणीचा पुरावा असतो.

    2. मला ग्राम पंचायत हद्दी मध्ये adventures park सुरू करायचे आहे… कोणती कागदपत्रे लागतील

      1. 1)धान्य खरेदी विक्री लायसन्स परवाना कोठे मिळतो?

        2)भाजीपाला व इतर शेतमाल,कांदा खरेदीसाठी परवाना आवश्यक आहे का?

        असेल तर…तो परवाना कोठे मिळतो?

        1. धान्य कादा भाजीपाला खरेदी चे लायन्सन तालुका कृषी मार्केट कमीटी मध्ये मिळतो!

  2. स्क्राप व्यवसाय साठी कुठले लायसन लागते

      1. लाकडी घाणा चे तेल पॅकिंग साठी कोणते परवानगी लागते

    1. आवश्यकता नाही, तरी सुरक्षितता म्हणून फूड लायसन्स काढून घेऊ शकता

      1. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात भाजीपाला व फळे विक्री साठी कोणते लायसन काढावे व ते कुठे कडावे

  3. खाजगी इस्पितळ चालू करण्यासाठी शासनाच्या कुठल्या परवानग्या लागतात??

    1. ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात २५ खाटांचा इस्पितळ सुरू करण्यासाठी कुठल्या परवानग्या आवश्यक आहेत.

      ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात जीम सेंटर सुरू करण्यासाठी कुठल्या परवानग्या आवश्यक आहेत.य

  4. मी लाकडी फर्निचर करतो त्या साठी मला कोणता परवाना लागेल मला वनविभागाचे अधिकारी खुप त्रास देत आहे कृपया कोणत्या परवान्याची गरज आहे

    1. देशी गाईच्या पंचगव्य (दूध तूप दही गोमूत्र शेण) पासून काही उत्पादन आणि औषधे बनवून स्वतः विकणे यासाठी कोणती परवानगी/नोंदनी आवश्यक आहे

      1. स्वतःच्या ब्रँड पॅकिंगमध्ये विक्री करणार असाल तर FSSAI लायसन्स लागेल

  5. साबण , टूथपेस्ट, हँड वॉश, डिश वॉश, टॉयलेट क्लिनर, फ्लोर क्लिनर, कपडे वॉश क्लिनर , लेडीज सॅनिटरी पॅड, इत्यादी वस्तू होलसेल चालू करायचं आहे तर मला कोणते लायसन असणे गरजेचे आहे

    1. हेल्थ संबंधी प्रोडक्ट असेल तर FDA परवाना लागेल,
      इतर केमिकल प्रोडक्ट ला कोणतेही लायसन लागणार नाही. इंडस्ट्री सेटअप करणार आल तर MPCB चा परवाना लागेल

  6. Pesticides,insecticides, fartilizar & PGR products swatachya navane packing branding karun selling krayche aahe aamhi 4 Jan partnership madhe krayche thravle aahe but tysathi document ani licence kuthli lagtil ani registered kase karave

  7. लाकडी घाणा तेल पेंकिंग व विक्री यासाठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणार्या या व्यवसायासाठी PAN कार्ड काढणे आवश्यक आहे
    का आणि आवश्यक असेल तर कृपया त्यासाठी लागणारा आवश्यक डिड चा नमुना कृपया मिळेल का.
    संदिप ढेब (फौजी)
    9149472620
    सातारा.

    1. लाकडी घाना उद्योगासाठी उद्यम नोंदणी करा. उद्यम नोंदणीसाठी PAN आवश्यक आहे

  8. उद्योग आधार लायसन्स असेल तर शॉप ॲक्ट परवाना गरजेचा असतो का, शासनाकडे कोटेशन, निविदा दाखल करणे कामी

    1. उद्योग आधार किंवा उद्यम हे उत्पादन अथवा सेवा क्षेत्रासाठी असते तर शॉप ऍक्ट हे महापालिके अंतर्गत कोणतेही शॉप सुरु करावयाचे असल्यास आवश्यक असते.

  9. माझे उद्योग आधार चे लायसन्स आहे. परंतु महानगरपालिकेत क्षेत्रात कोटेशन निविदा भरताना शॉप ॲक्ट लायसन्स गरजेचे आहे का. मी शॉप ॲक्ट लायसन्स काढलेले नाही.

  10. मि ग्रामपंचयत भागात चिकन चा शॉप ओपन केला आहे आनी शॉप एक्ट शुद्धा काढले आहे परन्तु ग्रामपंचायत माला NOC देत नाही आणि प्रॉब्लम देत आहे आमच्या गावात चिकन मार्केट आहे परंतु गावाची लोक संख्या 30000 + आहे
    मला काय करावे लागेल ते सूचवा प्लीज़

    1. NOC न देण्याचं कारण लेखी घ्या, देत नसतील उद्यम रजिस्टर करून व्यवसाय सुरु करा. उद्यम साठी ग्रामपंचायतीच्या NOC ची गरज नाही.

  11. मला agruclature pesticides चे product manufracturing ची facotry chalu karychi aahe konkonte license lagtil

  12. फळांपासून वाईन निर्मिती करण्यासाठी लागणारे परवाने कोणती आहे त्याच्या बद्दल मला माहिती हवी आहे धन्यवाद

  13. मशरूम विक्री साठी फुड परवाना आवश्यक आहे काय?

  14. मला साखर कारखाना साठी लागणारे मटीरियल सप्लाइ करायचे आहे .तरी मला या व्यवसाया साठी कोणती कागदपत्रे लागतील…

  15. मला गावात स्क्रॅप चा व्यवसाय करायचा आहे तर मी कशाची नोंदणी करू

  16. नमस्कार सर,
    मला फळे आणी भाजीं यांचीं शहरात आणी शहराबाहेर (महाराष्ट्रातं) टेम्पो मार्फत आयात/निर्यात व विक्री कारवायची आहे यासाठी कोणता परवाना लागेल आणि कोठे अप्लाय करावे लागेल.

  17. आमची पिठाची गिरणी आहे त्यासाठी महानगरपालिका परवानगी आवश्यक आहे का?

  18. Mala Gulachya chacha brand karayacha aahe v tyacha Franchise dyayachi aahe tr konati lisence v document lagatil

  19. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मालाचे निलाव घेण्यासाठी कोणत्या परवान्याची आवश्यकता असते व तो कसा मिळवता येईल

  20. नमस्कार
    आमचे गावात शितपेयचे तसेच जनरल स्टोअर दुकान आहे. दुकानाला ग्रामपंचायतीचा नंबर आहे. तर आम्हाला फूड लायसेन्साठी काय कागदपत्रे लागतील. तसेच आमचे उद्योग आधार प्रमाणपत्र आहे.

  21. मला आयुर्वेदिक गावठी औषध विक्री करायची असेल तर मला कोणते लायसेन्स लागेल.काय करावे लागेल.स्वतः च स्टार्ट करण्या साठी ऑनलाईन पण करायचे आहे .

  22. गावामध्ये घाण्यावरचे तेल काढून पॅक करून विकणे स्वतःच्या नावाने व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी कोणते परवाने आवश्यक आहेत.

  23. मला गावातच अगरबत्ती चा व्यवसाय चालू करायचा आहे आणी अगरबत्ती स्वतःचा ब्रँड करून सेल करायची आहे त्यासाठी कोणकोणते परवाने लागतील कृपया याची माहिती सांगावी आणी किती खर्च येईल यासाठी

  24. गावामध्ये मसाला उदयोग ( चटणी ) पॅकेज तसेच इतर मसाले याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोण कोणती लायसन ची आवश्यकता आहे. .

  25. 1.)घाण्याचे तेल काढून स्वत पॅकिंग &विक्री साठी..कोणते परवाने लागतील?
    2).लोगो किंवा आपली ओळख यासाठी काय करावे लागेल.
    .लॅब आवश्यक आहे का.?
    तेल उत्पादन कोणत्याNACमध्ये मोडते..कृपया माहिती द्या..सर

      1. लाकडी घाणा साठी छोटा व्यवसायाला लॅब नसेल तर चालेल का..? सर

  26. मला गावात पशुखाद्य विक्री व्यावसाय सुरू करायचा आहे. Manufacture कडुन पशुखाद्य विकत घेऊन गावात shop सुरू करून Retail sales करायचा आहे. कोणत्या परवानग्या लागतील?

  27. मला वायर नेल मेकिंग चा व्यवसाय सुरु करायचा आहे मला त्या व्यवसाया बद्दल मार्गदर्शन व माहिती कोठे मिळेल

  28. मला वायर नेलमेकिंग मशीन बद्दल माहिती हवी आहे तसेच त्यासाठी कोणता कागदपत्रे लागतील हे पण सांगावे

  29. मला वायर नेल मेकिंग चा व्यवसाय सुरू करायचा आहे , त्यासाठी मला मार्गदर्शन कोठे मिळेल तसेच त्यासाठी कोणत्या कागद पत्रांची आवश्यक्ता आहे

  30. सर नमस्कार मला विमा कंपनी सुरू करायची आहे तर काय करावे लागेल त्या बाबत सविस्तर माहिती सांगा .

  31. साखर कारखान्यांना इतर कारखान्याची साखर खरेदी करून विक्री करता येते का असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

  32. सर मला भाजीपाला मार्केट सुरु करायला परवानगी कुठली आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *