खाद्यसंस्कृती… मिसळ, चहा चे सेंटर आता खुप झालेत, नवीन काहीतरी शोधा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

मागील काही दिवसात मिसळ, चहा सेंटर ची संख्या खूपच वाढली आहे. जिकडे तिकडे सध्या या दोन्हींचंच बोलबाला दिसतोय. प्रत्येकाला मिसळ नाहीतर चहा चे हाॅटेल सुरु करण्याची इच्छा होत आहे. पुढच्याच्या पावलावर पाऊल टाकण्याचा फक्त प्रयत्न चालू आहे.

मिसळ चहा चे व्यवसाय वाईट आहेत असं बिलकुल नाही, यातही भरपूर संधी आहेत, लाखो करोडो रुपये कमावणारे यातही भरपूर आहेत. पण आपल रस्ता तयार करण्यात कुणालाच स्वारस्य नाही, या व्यवसायात बाकीचे श्रीमंत झालेत म्हणून आपणही तेच करायचं हि मानसिकता जास्त आहे. 3

बाकीच्यांनी आधीच मार्केट व्यापल्यामुळे आपल्यासाठी पुरेशी जागाच शिल्लक राहिलेली नाही हे लक्षात न घेताच सरसकट सुरुवात केली जात आहे. यामुळेच आता या ठराविक हाॅटेलांचीच मार्केटमधे गर्दी व्हायला लागली आहे. आणि गर्दी व्हायला लागली की ग्राहकांचं औत्सुक्य संपायला लागतं. सिलेक्टेड ब्रँड ला सुद्धा लोक सामान्य ब्रँड प्रमाणे वागणूक द्यायला लागतात. आणि काही काळातच हे नवउद्योजक सामान्य उद्योजकांच्या रांगेत जाऊन बसतात.

याचवेळी आणखिही काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांचा आपण व्यवसायीकदृष्ट्या विचारच करत नाही आहोत.

समोसे, कचोरी, ढोकळा चे स्पेशल सेंटर किती बघायला मिळतात? दाळ बाटी, आप्पे, जिलेबी चे किती स्पेशल हाॅटेल आहेत? खानदेशातल्या भरीत भाकरीचे खानदेश वगळता ईतर ठिकाणी किती हाॅटेल आहेत? काळ्या मसाल्याची गावरान झणक्याची आमटी भाकरी देणारे किती हॉटेल आहेत? १% सुद्धा नाही…

या पदार्थांना ग्राहक नाहीत म्हणुन कुणी सुरु करत नाही अस नाहीये तर हाॅटेल नाहीत म्हणुन ग्राहक समोर येत नाहीयेत. आपल्याकडील खाद्यसंस्कृती खुप प्रगत आहे. फक्त महाराष्ट्रीयनच नाही तर बाहेर राज्यातील देशातील पदार्थ सुद्धा ईथल्या जनतेने आनंदाने स्विकारले आहेत. त्यात पुण्यासारखं ठिकाण असेल तर विचारायलाच नको. इथं तर कोणतेही खाद्यपदार्थ विकले जाऊ शकतात. पुणेरी जनता खाण्याच्या बाबतीत खूपच हौशी आहे. पुण्यासोबतच महाराष्ट्रातील इतर शहरातही आता खाद्यसंस्कृती वाढत आहे.

खाद्यपदार्थ कोणतेही असो, त्याचे स्पेशलायझेशन असेल तर ग्राहक मिळतोच. खाद्यसंस्कृती फक्त मिसळ आणि चहा पुरतीच मर्यादीत नाही … उलट वर सांगीतलेल्या खाद्यपदार्थात अजुन कुणी विषेश लक्षच दिलेलं नाही ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे हे लक्षात घ्या…

या सेंटर्स खूप मोठे शॉप लागते असेही नाही. छोटेसे शॉप पहा, थोडक्यात पण आकर्षक डिझाईन करा, खवय्यांना बसण्यासाठी हटके काहीतरी सोय करा, मग बघा व्यवसाय कसा जोमाने चालतो ते.

सुरुवात करा… पठडीतल्या संकल्पना सोडुन वेगळा विचार करा, ज्यांनी आधीच मार्केट व्यापलंय तेच तुम्हीसुद्धा देत बसू नका, काहीतरी वेगळं द्या, जे तुमच्या परिसरात मिळत नाही, जे इतर कुणी देत नाही असं काहीतरी द्या.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


2 thoughts on “खाद्यसंस्कृती… मिसळ, चहा चे सेंटर आता खुप झालेत, नवीन काहीतरी शोधा

  1. नवीन काहितरी चालेल का नाहि या भितेने लोक जे चालू तेच करण्याचा प्रयत्न लोक करत राहतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!