८ सोप्या पायर्‍या वापरुन तुमची उद्दिष्टे साध्य करा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

तुम्हाला तुमच्या आयुष्यातील उद्दिष्टे साध्य करताना येणार्‍या अडचणींवर मात करणे अवघड जात आहे का? तुम्हाला तुमची उद्दिष्टे गाठण्यापासून, तुम्हाला तारकांपर्यंत पोचण्यात ज्या अडचणी येतात त्यावर मात करता येण्यासाठी या ८ सोप्प्या क्लृपत्या वापरा

१. तुमचं स्वप्न, तुमचं उद्दिष्ट तुमच्या साठी का महत्वाचं आहे ? तुमचं स्वप्न, तुमचं उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करताना ते तुमच्या जीवनासाठी तुम्हाला प्रेरणा मिळत रहावी या साथी तुमच्या मनात , तुमच्या आयुष्यात त्या स्वप्नाचं/उद्दिष्टांच महत्व किती आहे ते बिंबवलं गेलं पाहिजे. तुमच्या उद्दिष्टाचे तुमच्या आयुष्यातिल महत्व आधी जाणून घ्या. ते साध्य केल्या नंतरचे फायदे व तुमच्या जीवनात त्या मुळे घडणारे बादल, परिणाम यांची एक यादी तयार करा.

२. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन करा. आपण ठरवलेली उद्दिष्ट साध्य न करता येण्यामागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे नियोजनाचा अभाव. उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या प्रत्येक पायरीचं विस्तृत नियोजन करा. प्रत्येक पायरी /टप्पा पार करतांना काही बादल करण्याची आवश्यकता असेल तर तुमच्या नियोजनात तसे आवश्यक बदल करा. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नव्याने समाविष्ट कराव्या लागतील अथवा काही वगळाव्या लागतील, तसे करण्यात तडजोड करू नका.

३. तुमचा फोकस आबाधित ठेवा. तुमच्या नियोजनाला बांधील रहा. तुम्ही जो पथ/मार्ग निवडला आहे त्यावरुन ढळू नका. तुमच्यातली ऊर्जा तुमच्या उद्दिष्ट साध्य करण्याच्या तुम्ही ठरवलेल्या दिशेने प्रवाहीत राहू द्या.

४. तुमचा वेग कमी होऊ देऊ नका. काहीही घडले तरी तुमच्या प्लॅन/नियोजनावर वर काम करणे बंद करू नका. शक्यतो तुमच्या कडे आता जे आहे त्यावर समाधान मानू नका. तुमच्या हातात आता जे आहे ते घेऊन काम सुरू करा, आणि काहीही झाले तरी थांबू नका.

५. स्वत:ला तपासा. स्वत:ला नेहमी प्रश्न विचारा, “मी आणखी काय करु शकतो ?”. तुम्ही आणखी कोणत्या पर्यायांचा विचार करू शकता का याविषयी सतत तपासून घ्या. स्वत:ला प्रश्न विचारा की तुम्हाला आणखी काही माहिती मिळवणे गरजेचे आहे का? तुमच्या प्लॅन /नियोजनाकडे थोडं वेगळ्या दृष्टीकोणातून/नजरेने बघण्याचा प्रयत्न करा.

६. कोणतीही कल्पना/विचार फालतू नसतो, हे लक्षात असूद्या. चांगल्या कल्पना अचानकच समोर येत असतात. त्या तत्क्षणी लिहून ठेवा. यासाठीचं जेव्हा कधी अशीच अचानक काही कल्पना डोक्यात येईल ती लिहून ठेवण्यासाठी सोबत कायम एक डायरी असूद्या. यामुळे चांगल्या कल्पना/चांगले विचार हरवणार नाहीत.

७. नेहमी सकारात्मक विचार करा. तुम्ही काय विचार करताय आणि काय बोलताय या विषयी कायम जागरूक रहा. तुमच्या शंका बाजूला ठेवा. तुम्हाला किती ही अडचणी आल्या तरी विश्वास ठेवा की तुमची उद्दिष्ट साध्य होण्यासारखी आहेत. सुविचार, सकारात्मक विचार, सकारात्मक शब्द वापरुन स्वत:ला बजावत रहा. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृस्थिकोण, सकारात्मक विचार खूप महत्वाचे ठरतात.

८. तुमच्या उद्दिष्टांना कृतज्ञतेची जोड द्या. तुमच्यातील ऊर्जा उच्च ठेवण्यासाठी, असे उद्दिष्ट मिळाल्या बद्दल कृतज्ञ रहा. उद्दिष्ट तुमच्या आयुष्याला दिशा देतात, तुम्ही कसे जागता ते ठरवतात. उद्दिष्ट तुम्हाला, तुमच्या आयुष्याला समृद्ध बनवतात. तुमच्या उद्दिष्टांप्रती कृतज्ञता बाळगल्याने तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होतो, तसेच तुम्हाला नम्र व खुल्या मनाचं बनण्यास मदत होते. तुमच्यातिल प्रेरणा व इच्छाशक्ती यांना बळ मिळते आणि अगदी लहानतले लहान काम सुद्धा महत्वाचे व आनंददाई होते. तुमच्या आयुष्यातील सर्व कार्यात कृतज्ञ व्हायला शिका.

या सोप्या क्लृप्त्या अंगिकारा आणि स्वत:ला उद्दिष्ट साध्य करण्याप्रती कार्यात झोकून द्या. यांचा परिपाठ करा आणि तुमची स्वप्न, तुमचे उदधिष्ठ साध्य करण्याच्या प्रवासाला आजच सुरवात करा.

निलेश गावडे

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!