लेखक :: श्रीकांत आव्हाड
व्यवसाय म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे व्यवसाय सुरु करताना जर तुम्ही पहिल्याच दिवसापासून उत्पन्नाची अशा बाळगून असाल तर तुमचा भ्रमनिरास निश्चित आहे.
व्यवसायात पहिले सहा महिने कधीची उत्पन्नाची अपेक्षा ठेऊ नये. उलट या काळात नुकसानीची मानसिक तयारी असावी. व्यवसायाचे पहिले एक वर्ष हे तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्ची पडत असतो. यानंतर तुमचा व्यवसाय नफ्यात यायला सुरुवात होत असते. तसेच प्रत्येक महिन्यात तुम्हाला नफाच होईल असे काहीच नाही. वर्षातील २-३ महिने नुकसान आणि उरलेले ९-१० महिने नफा असेच गणित असते. अशावेळेस नफ्याच्या दिवसांतून नुकसान भरून काढायचे असते. आर्थिक नियोजन सुद्धा अशाच पद्धतीने करावे लागते.
बरेच जण नोकरी नाही म्हणून व्यवसाय सुरु करतात आणि व्यवसायातून नोकरीसारखे महिन्याला फिक्स उत्पन्नाची अपेक्षा करतात. यांचा अपेक्षाभंग १००% होतोच, आणि मग व्यवसाय क्षेत्रच कसं चुकीचं आहे हेच सगळीकडे सांगत सुटतात. एखाद्या महिन्यात नुकसान झालं तरी लगेच खचून जातात, व्यवसायच बंद करण्याचा विचार सुरु करतात… व्यवसाय म्हणजे काय हे माहित नसल्यामुळे हे होणारच असते, पण यामुळे नाहक उद्योग क्षेत्र बदनाम होते.
नुकसान होण्याला घाबरत असाल, कायम फिक्स उत्पन्न हवे असेल तर तुम्ही व्यवसाय कधीही करू शकणार नाही. हा चढउताराचा खेळ आहे. कधी काय होईल कुणीच सांगू शकत नाही. इथे फक्त मानसिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांचाच निभाव लागतो. म्हणूनच व्यवसाय सुरु करताना प्रत्येक चांगल्या वाईट निष्कर्षांची तयारी ठेवा, अडीअडचणींना खंबीर मनाने सामोरे जाण्याची तयारी ठेवा, तरच तुम्ही व्यवसायात टिकू शकता.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील