लेखक : श्रीकांत आव्हाड
=================
नवीन व्यवसाय सुरु केला कि पहिली महत्वाची कामगिरी असते ती म्हणजे मार्केटिंग व विक्री सुरु करणे. व्यवसाय खूपच लहान स्तरावर असेल तर सुरुवातीला तुम्हाला स्वतःच विक्रीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. परंतु सामान्यपणे व्यवसाय सुरु केल्यांनतर लगेच एक चांगला सेल्स एक्झिक्युटिव्ह नियुक्त करावा. हा व्यक्ती शक्यतो तरुण असावा, आणि तुमच्याच क्षेत्रात काम करणारा असावा. नवखा मुलगा सेल्स साठी कधीच नेमू नका. अनुभवी आणि सध्या काम करत असलेलाच सेल्समन नियुक्त करा.
अनुभवी कर्मचाऱ्यांना पगार जास्त द्यावा लागतो म्हणून बरेच जण नवीन मुलांची नियुक्ती करतात. पण हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. सेल्स साठी अनुभवी आणि काम करत असणाराच मुलगा निवडावा. त्याला पगार जास्त द्यावा लागला तरी हरकत नाही. प्रत्यक्ष फिल्ड वर काम करत असल्यामुळे हे सेल्स एक्झिक्युटिव्ह लगेच कामाला लागतात. त्यांना तुमच्या प्रोडक्ट चे मार्केट माहित असते. त्याचे रिटेलर्स, डिस्ट्रिब्युटर्स प्रत्यक्ष ओळखीचे असतात. कोणते मार्केट कसे आहे. कुठे कसा प्रतीसाद मिळेल याचा यांना चांगला अंदाज असतो. हे विक्री प्रतिनिधी तुमचे प्रोडक्ट लगेच अशा ओळखीच्या मार्केट मध्ये डिस्ट्रिब्युट करत असतात. यामुळे मार्केटमध्ये लगेच तुमचा माल वितरित व्हायला सुरुवात होते. आणि तुमचा व्यवसाय कमी कालावधीत चांगल्या स्तरावर पोहोचायला मदत होते.
नवीन मुले असतील तर त्यांना मार्केट समजून घ्यायला दोन तीन महिने जातात. त्यांनतर मार्केट ची थोडीफार ओळख होते. आणि मग हळू हळू विक्री सुरु होते. पण अनुभव नसल्यामुळे हि नवीन मुले प्रभावीपणे काम करू शकत नाही. या मुलांना पूर्णपणे मार्केट मध्ये रुळण्यासाठी वर्षभर लागते. साहजिकच यांच्याकडून काम न होणे म्हणजे तुमचे नुकसान असते. त्यापेक्षा यांच्यापेक्षा जास्त पगार द्यायची वेळ आली तरी हरकत नाही, पण प्रत्यक्ष फिल्ड वर काम करणारच विक्री प्रतिनिधी नियुक्त करा. एक अनुभवी व्यक्ती नियुक्त झाल्यानंतर त्याच्या खाली एक दोन असे अननुभवी मुले असतील हरकत नाही. ते हळूहळू शिकू शकतात. आणि त्यांचा तुमच्या व्यवसायावरही काही परिणाम होत नाही.
यासोबतच तुम्ही स्वतः विक्री मधे काम करणे सुद्धा खूप आवश्यक असते. विक्री कशी होते, सेल्स चॅनल कसे काम करतो, मार्केट कसे आहे, कशा प्रकारे कामकाज चालते अशी सगळी माहिती तुम्ही करून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला मार्केटची काहीच माहिती नसेल सेल्स क्षेत्रातील काही लोक इतके चतुर असतात कि कधी तुम्हाला चुना लावतील कळणारही नाही. त्यामुळे एवढी काळजी घेणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी मार्केटमधे स्वतः काम करणे महत्वाचे आहे.
पगार जास्त द्यावा लागू नये म्हणून कर्मचारीच नियुक्त न करणारे, किंवा एखाददुसरा काहीही माहिती नसणारा ऑफिस बॉय टाईप मुलगा अपॉईंट करणारे व्यवसायात कधीच मोठी उंची गाठू शकत नाही. काहीजण तर स्वतःच सगळी कामे करण्याचा प्रयत्न करतात, आणि कोणतंच काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे लवकरच सगळं आवरायची वेळ येते.
सेल्स टीम तुमच्या व्यवसायाचे पाय असतात. ते जेवढे भक्कम तेवढी तुमच्या व्यवसायाची वाटचाल दमदार असते. खर्चाचवर प्रतिबंध लावायच्या नादात सेल्स टीमच अपंग निवडणारे उद्योजक आपल्याच व्यवसायाला जन्मतःच पांगळे करत असतात.
सेल्स टीम वर खर्चाचा अति विचार करू नका. अनुभवी आणि काम करणारे लोक हवे असतील तर त्यांना पगारही तेवढा द्यावा लागतो. हे लोक पगार घेतात पण तेवढीच विक्रीही करून देतात. बचत करावी, पण प्रमाणात. त्याचा तुमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असेल तर ती बचत विषासमान असते, जी तुमच्या व्यवसायाला हळूहळू संपवते.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Nice inforamation
नवीन व्यवसायासाठी आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे.
Sir ready sale executive pahijet pan milat nahit astil tar kalwa whatsapp 9970096645