इथं कुणीही शंभर टक्के परफेक्ट नाही. यश अपयशाचा विचार करत बसू नका, कृती करा.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

हे होईल का? असं होईल का? नाही झालं तर काय? यश मिळेल का? संकल्पना काम करेल का? योग्य आहे का?…. किती विचार? किती प्रश्न? आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची तयारी सुद्धा नाही. या विचारांच्या नादात किती वेळ वाया चाललाय याचंही भान राहत नाही.

नुसता विचार करून काहीच होत नसतं, विचारांना कृतीत उतरवावे लागते. विचार कृतीत उतरलेच नाही तर योग्य होते कि अयोग्य हे कसे कळणार?

इथं कुणीही शंभर टक्के परफेक्ट नाही. कुणीही शंभर टक्के यशस्वी नाही. कुणाकडेही काही जगावेगळं ज्ञान नाही. अगदी मी तुम्हाला दररोज व्यवसायाविषयी काहीतरी सांगतोय म्हणजे मी सर्वज्ञानी आहे असंही नाही. मी सुचेल ते लिहितो इतकंच. जे चालू आहे तेच तुम्हाला सांगतोय. माझ्याकडे असलेली माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय इतकंच… आणि मीसुद्धा दिवसभरात जो जो भेटेल त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो… तुमच्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा काय आहे हे पहा… तुम्हाला स्वतःमधील अफाट ऊर्जेचा अविष्कार होईल.

अडचणी येत असतील तर येऊ द्या ना… जेवढ्या अडचणी जास्त तेवढे तुम्ही भविष्यातील वाटचालींसाठी तयार होतात. अडचणी येत नसतील तर तुमचा रस्ताच चुकलेला असतो.. अडचणींवर मार्ग शोधणारे यशस्वी होतात, मार्ग सापडत नाही म्हणून बोंबलत बसणारे आहे तिथेच राहतात… तुम्हीच ठरवा तुम्ही कोणत्या वर्गात मोडताय….

अडचणींना पाहून आनंदी व्हा, निराश नाही. अडचण आहे म्हणजे त्यावर उपाय शोधायची, काहीतरी नवीन करायची संधी असते. इथं कुणीही विना अडथळा वाटचाल करत नाही. हि शर्यत अडथळ्यांचीच आहे. आता “अडथळे का” म्हणून बोंबलत बसाल तर या शर्यतीतून बाद व्हाल… कितीतरी प्रयत्न अपयशी होतात, कितीतरी प्रयत्न सपशेल फसतात, पण एक यशस्वी मार्ग हाती लागण्यासाठी तुम्हाला पन्नास वेगवेगळे प्रयत्न करावे लागतातच. पर्याय शोधावेच लागतात. यश मिळेल का? असा प्रश्न विचारण्याऐवजी, यश मिळण्याआधीच माझी थांबण्याची हिम्मत होतेच कशी ? हा प्रश्न स्वतःलाच विचारा…

जगातल्या कोणत्याही यशस्वी उद्योजकाची, व्यक्तीची वाटचाल अभ्यासा … प्रचंड अडचणींचा सामना करून यश मिळविलेले दिसेल. कित्येक प्रयत्नांत ते अपयशी झालेले दिसतील. आपल्याला आजच त्यांच यश दिसतंय, त्यांच उच्च राहणीमान दिसतंय, पैसा दिसतोय, श्रीमंती दिसतेय… पण यासाठी त्यांनी घेतलेले अफाट कष्ट पाहण्याची आपली तयारी नाही…

आपलं आयुष्य मोजून साठ सत्तर वर्षाचं… त्यातले २५ शिक्षणातच गेलेत… शेवटचे पंधरा वीस वर्षे असे तसेच जातात… उरलेल्या मधल्या काळातील तीस पस्तीस वर्षांपैकी किती काळ फक्त विचार करण्यात घालवायचे हे तुम्ही ठरवा. जेवढा जास्त विचार करताल तेवढे यशापासून लांब जाताल… जितका लवकर निर्णय घ्याल तेवढा लवकर तुमचा प्रवास सुरु होईल… इथे कुणीच शंभर टक्के परफेक्ट नाही, इथं कुणीच शंभर टक्के यशस्वी नाही.

सुरुवात करा, आणि जे काही कराल त्यासाठी तुमचे शंभर टक्के प्रयत्न द्या… बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतील.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “इथं कुणीही शंभर टक्के परफेक्ट नाही. यश अपयशाचा विचार करत बसू नका, कृती करा.

  1. सर तुम्ही जे सांगितले ते बरोबर आहे माझे सीनियर सुद्धा मला हेच सांगतात पण काही अडचण आली मंजे मी घाबरुन जातो आनी मला काहिच सुचत नाही त्यामूळे बर्याच वेळा नुक़सान सुद्धा झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!