‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
तुमची काहीतरी चांगले आणि वेगळे करण्याची विचारधाराच तुम्हाला यशोशिखरांकडे घेऊन जात असते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पूनावाला ग्रुपचे चेअरमन सायरस पूनावाला.
भारतातील गणमान्य श्रीमंत लोकांच्या यादीत सायरस पूनावाला यांचा नंबर लागतो. आशिया खंडातील क्रमांक एक आणि जगातील क्रमांक दोनवर असणारी व्हॅक्सिन म्हणजेच अनेक रोगांवर प्रभावी उपचार करणारी प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणारी Serum Institute of India ही कंपनी सायरस पूनावाला यांचीच…
आपण जे काम लोकांसाठी करतो तेच काम स्वतःसाठी केले तर… या एकाच विचाराने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, कशी…?
सुरूवातीस सायरस पूनावाला यांच्या फॅमिलीचा मुख्य व्यवसाय म्हणजे Horse Racing म्हंजेच घोड्यांच्या शर्यती… त्यांचा स्वमालकीचा अद्ययावत असा Stud Farm (घोड्यांचा तबेला) होता. या Stud Farm वरील घोडे म्हातारे अथवा निकामी झाल्यावर, त्या घोड्यांना पूनावाला परिवार मुंबईच्या हाफकिन इंस्टीट्यूट मध्ये देऊन टाकायचा. या हाफकिन इंस्टीट्यूट मध्ये त्या घोड्यांवर विविध रोगांवर प्रतिबंधात्मक लसी (व्हॅक्सिन) बनविण्यासाठी प्रयोग केले जायचे. या कामात नाव आणि पैसा दोन्ही होते. एकदा सायरस यांच्या मनांत आले की, जर त्यांनीच हा व्हॅक्सिन बनविण्याचा व्यवसाय सुरू केला तर…? हाफकिन इंस्टीट्यूट च्या ऐवजी आपणच हे केले अन तेही परवडणार्यव किमतीत…? बस… हा एकच विचार… ते त्यावर ठाम होते. १९६६ साली, त्यांनी आपल्या बंधुसोबत व्हॅक्सिन बनविणाऱ्या Serum Institute Of India या कंपनीची मुहुर्तमेढ रोवली आणि पुढे जो घडला तो तर इतिहास आहे…
Diphtheria, धनुर्वात, डांग्या खोकला (डी.टी.पी. व्हॅक्सिन),BCG, कावीळ,गोवर, कांजन्या,रुबेला या आणि अशा अनेक संसर्गजन्य रोगांवर उपचारांसाठी जगात सर्वात जास्त व्हॅक्सिन तयार करणारी कंपनी म्हणजे SIL होय. १९८१ मध्ये SIL ने सर्पदंशावर उपचारासाठी Anti-Snake Venom Serum बनविली ज्यामुळे आजवर अनेकांना जीवनदान मिळालेले आहे.
१९८९ मध्ये M-Vac चे उत्पादन सुरू झाले आणि त्याच वर्षी SIL ही भारतातील क्रमांक एक ची व्हॅक्सिन बनविणारी कंपनी ठरली. या सर्व व्हॅक्सिनचा जगभर इतका प्रसार झाला की सन २००० मध्ये संपूर्ण जगभरातील ५० % मुलं ही एकट्या SIL चे व्हॅक्सिनेटेड होती.
पुनावाला हे देशातील १५ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पुनावाला यांची आजची एकूण संपत्ती ९ अब्ज डॉलर्स म्हणजे ६० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
२०१५ साली त्यांनी मुंबईमधील लिंकन हाऊस तब्बल ७५० कोटी रुपये किमतीला विकत घेतले, जो देशातील आजपर्यंतचा सर्वात महागडा खाजगी उपयोगासाठी केलेला व्यवहार आहे.
सन २००५ मध्ये सायरस पूनावाला यांना पद्मश्री व Lifetime Achievement Award ने भूषविण्यात आले. आज वयाच्या पंच्याहत्तरीत असूनही सायरस हे त्यांच्या Stud Farm वर आवर्जून जातातच…
_
उद्योजक मित्र
www.udyojakmitra.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील