लेखक :: श्रीकांत आव्हाड
व्यवसाय करत असताना तुम्हाला अर्थसहाय्याची गरज पडतेच. व्यवसायाची सुरुवात कर्ज न घेता करणे कधीही योग्यच, पण एकदा व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याच्या वाढीसाठी कर्ज घेण्यात काहीच गैर नसते. उलट व्यवसायाची वाढ हि कर्जावरच झाली पाहिजे हाच अर्थसाक्षरतेचा नियम आहे. CC लोन सुद्धा व्यवसायातील उलाढाल वाढीसाठी खूप महत्वाचे असते. परंतु असे अर्थसहायय घेताना तुम्हाला बऱ्याच बाबींची पूर्तता करावी लागते. तुमचे सिबिल चांगले असणे आवश्यक असते, बँक अकाउंट मधील उलाढाल चांगली असणे आवश्यक असते, सोबतच तुमचे इतरही आर्थिक बाबींची पूर्तता तुमची अर्थसाक्षरतेसंबंधी ज्ञान दर्शवत असते.
यासाठी तुम्ही या पाच गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे…
१. व्यवसायासाठी अर्थसहाय्याची (कर्जाची) गरज पडली तर तुमचा सिबील स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे, परंतु तुमचा कोणताही आर्थीक व्यवहाराचा ईतिहास नसल्यामुळे तुमचा सिबील स्कोअर खुप कमी असु शकतो, व यामुळे कर्ज नाकारले जाऊ शकते. यासाठी सुरुवातीपासूनच तुमचा सिबील स्कोअर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु करा. तुम्ही कधीच कर्ज घेतले नसेल तर सिबिल शून्य असते. अशावेळी एखादे दहा वीस हजाराचे गोल्ड लोन घेऊन त्याचे हफ्ते वर्ष दोन वर्षे नियमित फेडावेत. हे हफ्ते चेक द्वारेच दिले जातील याची दक्षता घ्यावी. यामुळे तुमचा सिबिल स्कोर चांगला होतो आणि कर्जासाठी अडचण येत नाही. कर्ज शक्यतो व्यवसाय सुरु केल्यांनतर तीन वर्षांनी घ्यावे.
२. तुमचं ऊत्पन्न कितीही असो IT Return नक्की भरा… टॅक्स आणी रिटर्न याचा संबंध नाही… रिटर्न हा फक्त तुमच्या ऊत्पन्नाचा पुरावा असतो. तुमचे आर्थिक व्यवहार किती आहेत, तुमचे उत्पन्न किती आहे, तुमचा व्यवसाय कसा चालू आहे याचा पुरावा म्हणजे हा IT Return असतो.
३. तुमच्या व्यवसायाचे बँकेत करंट अकाउंट उघडा. त्यात ट्रांझॅक्शन फिरते ठेवा.. त्यातुन भरपुर व्यवहार होतील याची काळजी घ्या… deposit, withdrawal भरपुर होऊ द्या…. कर्ज देताना बँक आधी तुमयाच्या व्यवसायाचे करंट अकाउंट तपासात असतात.
४. एखादे कर्ज थकले असेल किंवा चेक बाऊंस झालेले असतील तर लवकरात लवकर त्यातुन मोकळे व्हा. कर्जाचे अथवा व्यवहाराचे चेक बाऊंस होऊ देऊ नका. चेक बाउंस, थकलेले कर्ज तुम्हाला आर्थिकदृष्ट्या नकारात्मक दर्शवतात.
५. ऊगाच कोणत्याही बँकेत किंवा फायनान्स कंपनीमधे कर्जाची विचारणा करण्यासाठी तुमची फाईल देऊ नका. जिथे किमान ५०% खात्री असेल तिथेच कर्जासाठी अर्ज करा. यामुळे तुमचा सिबिल कमी होऊ शकतो. तसेच फ्री सिबिल चेक करून देणाऱ्या वेबसाईटवर सिबिल तपासू नका. त्यासाठी सिबिल च्या वेबसाईटवर जाऊन पेमेंट करूनच सिबिल तपासून घ्या.
या पाच गोष्टी तुम्ही आर्थिक दृष्ट्या साक्षर आहात याची साक्ष देतील आणि जेव्हा कधी तुम्हाला व्यवसाय वृद्धीसाठी कर्जाची गरज पडत तेव्हा तुमच्या कामी येतील.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील