नारायण मूर्तींना ‘कॉर्पोरेट गांधी’ का म्हणतात ?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

कॉर्पोरेट गांधी… इन्फोसिस चे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांना कॉर्पोरेट गांधी म्हणून ओळखले जाते हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे. समस्त कॉर्पोरेट वर्ग नारायणमूर्तींना कॉर्पोरेट गांधी म्हणूनच ओळखतं. पण हे नाव नारायणमूर्तींना कसं जोडलं गेलं हे तुम्हाला माहित आहे ? चला जाणून घेऊया या नावाचा इतिहास…

२० ऑगस्ट १९४६ रोजी कर्नाटक मधील म्हैसूर येथे त्यांचा जन्म झाला. १९६७ मधे इलेक्ट्रीक इंजिनिअर, १९६९ मधे IIT कानपूर मधुन एम.टेक. आणि लगेच IIM अहमदाबाद येथे प्रमुख कार्यप्रणाली तंत्रज्ञ म्हणून रुजु झाले.

१९७६ साली त्यांनी सॉफ्ट्रॉनिक्स या नावाने स्वतःची कंपनी सुरु केली. या पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले, नंतर त्यांनी प्रतिथयश अशा PCS म्हणजे पटनी कॉम्पूटर सर्व्हिसेस मधे नोकरी सुरु केली. याच कंपनीत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली.

कंपनीच्या कामानिमीत्त ते पॅरिसला गेले. सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण करुन ते परत भारतात येण्यास निघाले. जातांना विमानाने गेले होते, पण येतांना अनेक देश फिरुन मग भारतात येण्याचा त्यांनी विचार केला. फिरत ते बल्गेरिया देशात आले. तिथे अंर्तगत रेल्वेप्रवासात त्यांनी एका स्थानिक सहप्रवाशी महिलेला बल्गेरिया देश, अर्थकारण, एकूण कार्यपध्दती याच्या विषयी माहिती विचारली. संशयी असलेल्या त्या महिलेने लगेच पोलिस कंम्प्लेंट केली. हेर समजून, कुठलीही चौकशी न करता नारायण मूर्ती यांचे सामान, पैसे, कागदपत्रे जप्त करुन अटक करुन अंधार कोठडीत डांबले. खिडकी, टॉयलेट, जेवण कसलीच सोय नसलेल्या ८x८ च्या कोठडीत ते दोन दिवस होते. केवळ भारत बल्गेरियाचा मित्र आहे म्हणून जिवंत सोडतोय असे सांगुन पैसे, कपडे, सामान काहीही परत न देता त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देवुन हाकलण्यात आलं.

त्यानंतर कित्येक महीने ते डिप्रेशनमधे होते. या घटनेचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी मनोमन ठरविले की माझं सर्वस्व देवुन आता मी स्वतःच एक मोठी कंपनी उभी करेन, ज्यामधे माझ्या देशातील लाखों लोकांना रोजगार मिळेल. आपल्या करियरसोबत आयुष्यातला सर्वात मोठा जुगार खेळून त्यांनी पटनी कॉम्प्युटर मधील नोकरी सोडून सुरक्षित आणि भरपूर पगाराची नोकरी सोडून २ जुलै १९८१ पत्नीकडून अवघे १०००० रु. घेवुन सात मित्रांच्या सोबतीने मुंबईतील माटुंग्यातील मित्र राघवनच्या घरात ईन्फोसिस कन्सलटंट प्रा.लि. ची स्थापना केली. १९८३ मधे मुख्य कार्यालय बंगलोरला हलविले.

१९९१ मधे कंपनीचे रुपांतर इन्फोसिस पब्लिक लिमीटेड मधे झाले. १९९९ मधे NASDAQ (National Association Of Securities Dealers Automated Quotation) मधे इन्फोसिस च्या शेअर्सची नोंदणी झाली. असा इतिहास रचणारी ही पहीली भारतीय कंपनी आहे. आज जवळपास ३०००० करोड नफा, दोन लाखांवर कर्मचारीवर्ग, जगभरातील सर्व प्रमुख शहरांमधे ऑफिसेस आणि पगारासोबतच कंपनीचे शेअर्स देवुन ड्रायव्हर, कॅन्टीनवाल्यासह कर्मचाऱ्यांना करोडपती बनविणारी ही कंपनी…

नारायण मुर्तींना बल्गेरियातील अपमान हा महात्मा गांधींच्या अफ्रिकेतील अपमानाप्रमाणे जिव्हारी लागला… ते पेटून उठले, म्हणून की काय जगाने त्यांना नाव दिले…”कॉर्पोरेट गांधी”…

_

उद्योजक मित्र
www.udyojakmitra.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!