‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
आदिदास आणि प्यूमा… फुटवेअर च्या जगातील ही बलाढ्य नावे. हे दोन्ही ब्रँड सख्ख्या भावांच्या मालकीचे आहेत हे तुम्हाला माहित आहे का? ॲडॉल्फ डॅसलर आणि रुडॉल्फ डॅसलर या दोन सख्ख्या भावांच्या मालकीच्या या कंपन्या आहेत.
डॅसलर बंधू मूळचे जर्मनीच्या बव्हेरिया या प्रांतातील. घरची परिस्थिती बेताचीच. म्हणजे अगदीच काही श्रीमंती नव्हती कारण वडील एका बुटाच्या कारखान्यात काम करायचे तर आई धोबी काम. पहिल्या जागतिक महायुद्धात ॲडॉल्फ आणि रुडॉल्फ हे दोघे जर्मन सैन्यात होते. युद्धसमाप्तीनंतर काय व्यवसाय करावा हा प्रश्न पडलेला असताना धाकटा बंधू ॲडॉल्फ याच्या डोक्यात बूट बनवण्याचा व्यवसाय करण्याची कल्पना आली. आई चालवत असलेल्या लॉण्ड्री च्या मागच्या खोलीत ॲडॉल्फने बूट बनविण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच आपल्या वडिलांना हेच काम करताना पाहिल्यामुळे ॲडॉल्फ ने त्यांची कौशल्ये आत्मसात केली. कालांतराने रुडॉल्फ ही या व्यवसायात जोडला गेला आणि खऱ्या अर्थाने त्यांची फुटवेअर फॅक्टरी सुरू झाली. डॅसलर शू फॅक्टरी या नावाने त्यांनी कंपनी सुरु केली. अत्यंत उत्तम दर्जा राखल्यामुळे हातांनी शिवलेले हे शूज अल्पावधीतच युरोपियन खेळ जगतात नावरूपास आले. त्यांच्या कंपनीची स्थापना झाल्यानंतर चार वर्षातच बाजारात जवळपास प्रत्येक दुकानात त्यांच्या कंपनीचे शूज होते.
सगळं सुरळीत चालू असताना दुसरे महायुद्ध सुरू झाले. पुन्हा मागच्या प्रमाणेच परत त्यांना हिटलरच्या नाझी सैन्याने सैन्यात भाग घेण्यास फर्मावलं. यातही ॲडॉल्फ हा दोघा भावांमध्ये लहान असल्याने त्याला शूज फॅक्टरीत राहून सैन्याला हत्यारे पुरविण्याचं काम दिलं गेलं पण रुडॉल्फ मात्र प्रत्यक्ष महायुद्धात सहभाग घेण्यास फर्मावलं. महायुद्धात शत्रु पक्षाकडून रुडॉल्फ युद्धकैदी म्हणून पकडला गेला.
कालांतराने शत्रूच्या ताब्यातून त्याची सुटका झाली पण त्याच्या डोक्यात गैरसमजुतीने एक पक्का संशय निर्माण झाला होता की त्याला युद्धभूमीवर पाठवून फॅक्टरीत थांबण्या मागे काहीतरी षडयंत्र असून त्यात ॲडॉल्फचा नक्कीच सहभाग आहे. बस मग काय, संशयाची ही एकच ठिणगी आणि त्या दोन्ही भावांची मनं आणि कंपनी दोन्ही दुभंगली गेली. ते वेगळे झाले ॲडॉल्फने आपल्या नावाची आणि आडनावाची काही अक्षरे वापरून आदिदास नावाची कंपनी स्थापन केली, तर रुडॉल्फ ने प्यूमा (व्याघ्र कुळातील एक पॅंथर सदृश्य चपळ प्राणी) या नावाने शूज कंपनी स्थापन केली
दोनीही कंपन्यांनी मार्केटमधे अल्पावधीतच आपला जम बसवला. आजही फुटवेअर च्या दुनियेत आदिदास आणि प्यूमा हे दोन ब्रँड कमालीचे लोकप्रिय आणि यशस्वी आहेत. जगातील स्पोर्ट्स साहित्य बनवणाऱ्या क्षेत्रात या कंपन्यांचा वरचष्मा आहे.
_
उद्योजक मित्र
www.udyojakmitra.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील