‘काईली जेनर’ ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर संपूर्ण जगातील महिलांसाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट घडली आहे. ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध मासिकाने बुधवार दिनांक ०६ मार्च २०१९ ला प्रसिद्ध केलेल्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये काईली जेनर ही अवघ्या २१ वर्षांच्या युवतीने सर्वात लहान वयात आणि ते ही स्वबळावर अब्जाधीश होण्याचा मान मिळवणारी पहिली महिला ठरली आहे.

कायलीची संपत्ती १ अब्ज डॉलर्स आहे. रिऍलिटी टीव्ही स्टार काईली जेनर ही काईली कॉस्मॅटिकस या सौन्दर्य प्रसाधनांच्या कंपनीची मालकीण आहे. मेकअप च्या बिझनेसची ही सम्राज्ञी आज जगामध्ये अव्वल ठरलीय. २०१५ साली अवघ्या ७ पूर्णवेळ आणि ५ अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुरु केलेली ही कंपनी आज चक्क १ अब्ज डॉलर्स ची झाली आहे.

सर्वात तरुण अब्जाधीश हा मान कायलीने फेसबुक चा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गला मागे टाकून पटकावला आहे. मार्क झुकरबर्ग हा मान मिळविताना २३ वर्षांचा होता.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सांगायचे झाले तर ‘फोर्ब्स’ च्या या यादीत तब्बल २५२ महिलांनी यंदा स्थान पटकावले आहे. ज्यामध्ये सेल्फमेड म्हणजेच स्वबळावर मोठ्या झालेल्या महिलांची संख्या ५६ वरून ७२ झालीय. जगातील सर्वात श्रीमंत महिलेचे स्थान चीनच्या रिअल इस्टेट मधील दिग्गज वू याजून यांनी मिळविले असून त्यांची एकूण संपत्ती ९.४ अब्ज डॉलर्स आहे. शेवटी काय… ? Woman power Rocks…

जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!

_

उद्योजक मित्र
www.udyojakmitra.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!