‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
काही महिन्यांपूर्वी एक कॉल आला होता. संबंधित व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरु करायचा होता, त्यासंबंधी कन्सल्टिंग त्यांनी कॉल केला होता. त्यांचा पहिला व्यवसाय बंद पडला होता आणि आता नवीन काहीतरी सुरुवात करण्याच्या विचारात होते. पहिला व्यवसाय बंद का पडला असे विचारले असता ते म्हणाले कि आमचा सेल्स एम्प्लॉयी काम सोडून गेल्यामुळे व्यवसाय बंद करावा लागला. मार्केट तोच सगळं बघायचा, आम्हाला मार्केटची माहिती नव्हती त्यामुळे त्याने काम सोडले आणि व्यवसाय कमी कमी होत गेला, म्हणून शेवटी बंद केला.
त्यांना क्षणभर काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं. एक सेल्स कर्मचारी काम सोडून गेला म्हणून व्यवसायच बंद केला असा प्रकार पहिल्यांदाच ऐकायला मिळत होता. कर्मचाऱ्यांवर अति अवलंबून राहिल्यामुळे व्यवसाय मंदावण्याचे प्रकार मला भरपूर माहित आहेत, पण व्यवसाय बंद पडलेला ऐकण्याची पहिलीच वेळ.
कर्मचाऱ्यांवर अतिअवलंबित्व आपल्या व्यवसायासाठी नुकसानकारक ठरते हे नवउद्योजकांना माहीतच नसते. पैसा गुंतवला, दोन चार मुलं सेल्स साठी कमला ठेवली कि व्यवसाय सुरु होतो असा बऱ्याच अननुभवी नवउद्योजकांचा समज असतो. मार्केटकडे लक्ष देण्याचे आपले काम नाही आपण फक्त ऑफिस मध्ये बसून राहायचे असा भ्रम असतो. हाच भ्रम शेवटी अंगलट येतो.
व्यवसाय सुरु केल्यानंतर स्वतः उद्योजकाने मार्केटमधे फिरणे आवश्यक असते. जमेल तेवढे मार्केट पालथे घालणे आवश्यक असते. मी तर लहान व्यवसाय असतील तर सुरुवातीचे काही नेटवर्क स्वतः उद्योजकानेच तयार करावे असा आग्रह धरत असतो. मार्केट काय असतं, तिथे काम कसं चालतं, नेटवर्क कसे तयार करावे लागते, नेटवर्क कसे हाताळायचे असते, संभाषण कौशल्य कसे आत्मसात करावे, आर्थिक व्यवहार कसे हाताळावे लागतात, स्थानिक स्टॅंडर्ड प्रॅक्टिस काय आहे अशा विविध बाबींची माहिती स्वतः उद्योजकाने करून घेणे आवश्यक असते. उद्योजकाने मार्केटमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ खर्च करणे आवश्यक असते.
कित्येक नवउद्योजकांकडून याच ठिकाणी चूक होते. सेल्स साठी कर्मचारी नेमून उद्योजक निर्धास्त होतात. मार्केटकडे दुर्लक्ष होते. आपले मार्केट कोणते आहे, डीलर्स कोणकोण आहेत हेही कित्येकांना माहित नसते. आपला सेल्स कर्मचारी सांगेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो. तो म्हणले तसे निर्णय घेतले जातात. हळूहळू तो मालकावरच वरचढ व्हायला लागतो, आणि सगळी सूत्रे ताब्यात घेण्याचा पर्यटन सुरु करतो.
हि सेल्स इंडस्ट्री खूप विचित्र आहे. इथे खूप मुरलेले लोक असतात. जर सेल्स कर्मचाऱ्याला लक्षात आले कि आपला मालक पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे, त्याला मार्केटची जराही माहिती नाही, तर अशावेळी तो त्या उद्योजकाला कधी संपवून टाकेल कळणारही नाही. मार्केटची सगळी सूत्रे तो हाती घेतो. मार्केटमधे कंपनीऐवजी, कंपनीच्या मालकाऐवजी स्वतःचे नेटवर्क तयार करतो, आणि पुढच्या संधीची वाट पाहतो. नवीन संधी दिसली कि लगेच तिकडे उडी मारतो. उद्योजकाला मार्केटची माहिती नसतेच. अशावेळी मार्केट पूर्णपणे विस्कळीत होते, विक्री मध्ये कमालीची घसरण व्हायला लागते, मार्केटमधे कधीही न फिरकल्यामुळे सूत्रे हाती घेता येत नाही. नवीन सेल्स कर्मचारी शोधण्यासाठी धावपळ सुरु होते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
मार्केट हातून निसटत असताना उद्योजक त्याकडे फक्त पाहण्याशिवाय बाकी काहीही करू शकत नाही. पण खरं तर ते मार्केट त्या उद्योजकाचे नसतेच तर ते असते त्याच्या विक्री कर्मचाऱ्याचे. तो काम सोडून गेला कि मार्केटही तुम्हाला सोडून जाते.
सेल्स कर्मचारी लागतातच, पण तेच एकमात्र व्यवसायाचे आधारस्तंभ नसतात. ते विक्रीचे फक्त माध्यम असतात. सेल्स कर्मचारी नेमण्याआधी उद्योजकाने स्वतः मार्केटमधे काम करून विक्री कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते.
आपल्या सेल्स टीम मध्ये पर्याय तयार ठेवणे आवश्यक असते. कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेपेक्षा किमान एक कर्मचारी जास्तीचा नेहमीच असला पाहिजे. आपल्यावाचून मालकाचं काहीही अडत नाही हे कर्मचाऱ्याला जाणवले पाहिजे. आणि यासाठी स्वतः उद्योजकाचे मार्केटमधे लक्ष असले पाहिजे. कर्मचाऱ्यांइतकेच मार्केट स्वतः उद्योजकाचे तोंडपाठ असले पाहिजे. एखादा कर्मचारी अचानक कामावर उपलब्ध नसेल तर त्याचे काम स्वतः करू शकेल, इतका उद्योजक सेल्स साठी तयार असावा.
प्रोडक्शन डिपार्टमेंट मधे कुणी सुपरवायजर असेल तर त्याचेही काम उद्योजकाने समजून घेतले पाहिजे. प्रोडक्शन कसे चालते, कधी कुठे कसा किती माल लागतो याचा पूर्ण अभ्यास असला पाहिजे, लेबर कडून काय काम करून घ्यायचे याचे कौशल्य आत्मसात असले पाहिजे. अचानक कधी वेळ अली तर व्यवसायाच्या कोणत्याही दैनंदिन कामावर वर काहीही परिणाम होणार नाही यासाठी उद्योजकाने नेहमीच सतर्क राहिले पाहिजे.
उद्योजक आपल्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतो पण ते अवलंबित्व कधीही अति प्रमाणात नसावे. त्याला एका मर्यादेपर्यंतच ठेवावे.
उद्योजक आणि कर्मचाऱ्यांच्या हाच तर मुख्य फरक असतो. उद्योजक आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कामासाठी तयार असतो आणि कर्मचारी फक्त त्याला नेमून दिलेल्या कामासाठी तयार झालेला असतो.
(व्यवसायातील घोडचूक हि लेखमालिका मुख्यत्वे अननुभवी नवउद्योजकांसाठी आहे. व्यवसाय करत असताना अनुभव नसल्यामुळे काही चुका घडण्याची शक्यता असते. पण यातील काही चुका या व्यवसायालाच संपवू शकतात. म्हणूनच त्या होऊ शकणाऱ्या चुकांची आधीच माहिती करून घेऊन त्या टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने हि लेखमालिका आहे.)
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Mi Retail shop open kartoy … Building materials suruvat Kashi karavi
This is the real life experience. But a new entrepreneur with no experience stumbles repeatedly and carries on till the end.
The basic requirement is to carry on such education at the start of his career.
It should be a subject or lesson in your college years when you intend to join business.
M B A course teaches only too be dependant on others at your cost. However adaptability to the suggestion given above would help lot of youth in this country.
After all “Workers” are “वर् कर”
Nice article.
Thanks