विकण्याची लाज बाळगू नका. …


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

आपल्यापैकी बऱ्याच जणांमधे विकण्याचा फोबिया आहे. आपण काहीतरी विकतोय म्हणजे खालच्या दर्जाचं काम करतोय अशी मानसिकता असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. व्यवसाय म्हटलं कि विक्री आलीच, पण अशावेळी मी कसं विकू? मी काय विकण्याचं काम करू का? लोकांना कसं सांगू हे प्रोडक्ट घ्या म्हणून ? असे प्रश्न आपल्यासमोर भिंत बनून उभे राहतात. एक प्रकारे आपल्याला विक्री करण्याची लाज वाटते.

विकण्याची लाज वाटणे हेच आपण व्यवसायात मागे असण्याचे किंवा अपयशी असण्याचे मुख्य कारण आहे. विक्री हाच व्यवसायाचा मुख्य गाभा असताना आपण त्यालाच बाजूला करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही विकू शकत नसाल तर तुमचा व्यवसाय उभा राहूच शकत नाही. उपलब्ध आणि शक्य असलेल्या प्रत्येक मार्गाने आपले उत्पादन, सेवा विकणे हेच व्यावसायिकाचे मुख्य काम असते.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी विक्री कौशल्य आवश्यक आहे. पण विक्री कौशल्य म्हणजे फक्त लोकांना ‘माझे प्रोडक्ट घ्या’ असे म्हणणे नाही. तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांनी विक्री करता अली पाहिजे, विक्रीसाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी राबवता आल्या पाहिजे, सतत काहीतरी नावीन्य दाखवता आले पाहिजे, जाहिरातींच्या नवनवीन संकल्पना अमलात आणता आल्या पाहिजे, ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करता आले पाहिजे, तुमचं प्रोडक्ट त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे, त्यांना तुमच्याकडूनच खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करता आले पाहिजे… थोडक्यात तुम्हाला लोकांपर्यंत पोचता आले पाहिजे, त्यांना तुमच्याकडे आकर्षित करता आले पाहिजे, आणि तुमचे प्रोडक्ट त्यांना विकता आले पाहिजे…

तुम्हाला विकता यायला हवं. कोणतीही लाज न बाळगता तुम्हाला विकता यायला हवं. जमत नसेल तर शिकून घ्या. लोक काय म्हणतील याचा विचार न करता कुठेतरी सेल्स फिल्ड मधे वर्षभर विक्री प्रतिनिधी म्हणून काम करा, विक्री शिकून घ्या. तुम्ही फिल्ड वर काम करावे आवश्यक आहे. प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन विक्री करणे आवश्यक आहे.

विकण्याची लाज बाळगू नका… लाज बाळगायचीच असेल तर आपल्याला “विकता येत नाही”, याची बाळगा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!