जागतिक स्तरावर ठसा उमटवणाऱ्या १३ बिझनेस फॅमिलीज्


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

आपल्या व्यवसाय कौशल्याचा जगभरात ठसा उमटवणाऱ्या १३ बिझनेस फॅमिलीज.

या अशा फॅमिलीज् आहेत ज्यांनी आपले उद्योगविश्व उभे केले आणि त्यांना जगातील सर्वोत्तम बनविले. आजही यापैकी बरीच कुटुंबे आपल्या व्यवसायावर नियंत्रण ठेऊन आहेत, तर काही काळाच्या ओघात मागे पडली आहेत, परंतु यांनी जगभरातील उद्योगविश्वावर आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. जगभरातील उद्योगजगताला एक नवी दिशा दिली आहे. जाणून घेऊया या तेरा बिझनेस फॅमिलीज् …

या यादीमधे फक्त अशी कुटुंबे आहेत जे मागील पिढ्यांपासून उद्योगात आहेत किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे उद्योग सांभाळत आहेत. त्यामुळे काही नामांकित मोठे उद्योजक या यादीमधे नाहीत.

१. वॉल्टन फॅमिली

वॉलमार्ट ग्रुप

वॉलमार्ट या जगातील सर्वात मोठ्या रिटेल व्यवसायाचे वॉल्टन कुटुंब संस्थापक आणि ५१% शेअर होल्डर आहे.

देश – अमेरिका
क्षेत्र – रिटेल
उलाढाल – रु. ३१ लाख कोटी*
कर्मचारी संख्या – २३ लाख*
जगभरात एकूण ११,६९५ स्टोअर्स


२. पोर्शे फॅमिली

फोक्सवॅगन ग्रुप, पोर्शे ऑटोमोबाईल

फर्डिनांड पोर्शे यांनी स्थापन केलेल्या पोर्शे ऑटोमोबाईल या जगातील अग्रगण्य लग्झरी कार उत्पादकककडेच फोक्सवॅगन कंपनीची ५०% पेक्षा जास्त हिस्सेदारी आहे… जगभरातील नामांकित ब्रॅण्ड्स आज फोक्सवॅगन कडे आहेत. ऑडी, फोक्सवॅगन, लॅम्बोर्गिनी, डुकेटी, बुगेटी, बेन्टली सारखे जगातील सर्वोत्तम ब्रॅण्ड्स फोक्सवॅगन ग्रुप ची मालमत्ता आहेत.

देश – जर्मनी
क्षेत्र – ऑटोमोबाईल
उलाढाल – रु. १६ लाख कोटी*
कर्मचारी संख्या – ६.२६ लाख*


३. टोयोटा

टोयोटा ग्रुप

जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचे किचिरो टोयोटा हे संस्थापक आहेत.

देश – जपान
क्षेत्र – ऑटोमोबाईल
उलाढाल – रु. १६.४० लाख कोटी*
कर्मचारी संख्या – ३.६५ लाख*


४. ली फॅमिली

सॅमसंग ग्रुप

स्थापनेपासून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारी व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी असलेली सॅमसंग कंपनीची सुरुवात ‘ली’ कुटुंबाने केली होती.

देश – दक्षिण कोरिया
क्षेत्र – इलेक्ट्रॉनिक्स व इतर
उलाढाल – रु. ११. ३५ लाख कोटी*
कर्मचारी संख्या – ४.८९ लाख*


५. बफे फॅमिली

बर्कशायर हॅथवे

गुंतवणूक सम्राट वॉरेन बफे यांचा वरदहस्त लाभलेली जगातील आठवी मोठी कंपनी. विविध क्षेत्रात असणारी हि कंपनी १८३९ साली ‘ऑलिवर चेज’ यांनी सुरु केली होती. कंपनी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. १९६२ सालापासून कंपनीची वाढ पाहून वॉरेन बफे यांनी कंपनीमधे गुंतवणूक करायला सुरुवात केली. बफे कुटुंबाकडे आज या कंपनीची ३६% हिस्सेदारी आहे. याचसोबत बफे यांची जगभरातील शेकडो कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. इथे त्यांच्या फक्त एका कंपनीचे प्रोफाईल दिलेले आहे.

देश – अमेरिका
क्षेत्र – विविध उद्योगांचा समूह
उलाढाल – रु. १४.५० लाख कोटी*
कर्मचारी संख्या – ३.६७ लाख*


६. टाटा

टाटा सन्स

दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ भारतीय उदयोगविश्वावर आपला वरचष्मा राखून असलेले हे कुटुंब आहे. जमशेदजी टाटा यांनी टाटा ग्रुप ची पहिली कंपनी सुरु केली होती. त्यानंतर JRD टाटा व रतन टाटा यांनी टाटा ग्रुप ला मोठे यश मिळवून दिले.

देश – भारत
क्षेत्र – विविध क्षेत्रातील शंभर पेक्षा जास्त कंपन्या
उलाढाल – रु. ७.७० लाख कोटी*
कर्मचारी संख्या – ७ लाख*


७. फोर्ड फॅमिली

फोर्ड ग्रुप

फोर्ड आणि ऑटोमोबाईल क्षेत्राचे ऋणानुबंध कधीही न विसरता येणारे. वाहन क्षेत्रात क्रांती करणारे हेन्री फोर्ड यांच्या मालकीची फोर्ड मोटर्स हि कंपनी आजही जगातील सर्वोत्तम ऑटोमोबाईल कंपन्यांमधे गणली जाते. फोर्ड कुटुंब आजही कंपनीवरील आपले प्रभुत्व टिकवून आहे.

देश – अमेरिका
क्षेत्र – ऑटोमोबाईल
उलाढाल – रु. ९.८५ लाख कोटी*
कर्मचारी संख्या – २ लाख*


८. अंबानी कुटुंब

रिलायन्स इंडस्ट्रीज

धीरूभाई अंबानी यांनी सुरुवात केलेली रिलायन्स इंडस्ट्रीज हि देशातील सर्वात मोठी कंपनी. रिलायन्स इंडस्ट्रीज च्या अखत्यारीत विविध क्षेत्रातील कंपन्या आहे. मुख्य व्यवसाय पेट्रोलियम चा आहे. रिलायन्स चे चेअरमन व सर्वेसार्वा मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १३ व्य स्थानी आहेत.

देश – भारत
क्षेत्र – ऑइल, रिटेल व इतर
उलाढाल – रु. ५ लाख कोटी*
कर्मचारी संख्या – ५ लाख*


९. एग्नेल्ली (Agnelli) फॅमिली

फियाट ग्रुप, FCA, एक्झॉर

फियाट ऑटोमोबाईल चे संस्थापक एग्नेल्ली कुटुंब आहे. फियाट आणि क्रायस्लर यांच्या भफगीदारीने स्थापन झालेली FCA म्हणजे फियाट क्रायस्लर ऑटोमोबाईल हि जगातील आठवी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीची ३०% हिस्सेदारी असलेली एक्झॉर हि कंपनी सुद्धा एग्नेल्ली कुटुंबाचीच आहे. जगातील तीन मोठ्या नामांकित कंपन्यांवर आजही एग्नेल्ली कुटुंब राज्य करते.

देश – इटली
क्षेत्र – ऑटोमोबाईल
उलाढाल – रु. ८.३५ लाख कोटी*
कर्मचारी संख्या – २.२५ लाख*


१०. होंडा फॅमिली

होंडा मोटर्स

सोयीशिरो होंडा यांनी स्थापन केलेली होंडा मोटर्स आजही जगातील एक आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी आहे. कंपनी कार्स, मोटरसायकल्स, रोबोट्स, एरक्राफ्ट्स सारख्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आज होंडा कुटुंबाचे कंपनीमधील अस्तित्व नगण्य असले तरी या कुटुंबाने जगाला एक अमूल्य देणगी दिलेली आहे.

देश – जपान
क्षेत्र – ऑटोमोबाईल
उलाढाल – रु. ८.४५ लाख कोटी*
कर्मचारी संख्या – २.१२ लाख*


११. क्वान्ड (Quandt) फॅमिली

BMW ग्रुप

विमान उत्पादन क्षेत्रात असणाऱ्या या जर्मन कंपनीने पाहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांचे निर्बंध आल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले. कंपनीचे संस्थापक क्वान्ड कुटुंब आजही कंपनीमधील २९% हिस्सेदारी बाळगून आहे. BMW, MINI, Rolls Royce सारखे प्रतिष्ठित ब्रॅण्ड्स या कंपनीच्या मालकीचे आहेत.

देश – जर्मनी
क्षेत्र – ऑटोमोबाईल
उलाढाल – रु. ६.१५ लाख कोटी*
कर्मचारी संख्या – १.२४ लाख*


१२. चंग फॅमिली

ह्युंदाई ग्रुप

चंग जु-युंग यांनी स्थापन केलेली ह्युंदाई हि जगातील एका मोठ्या उद्योगसमूहापैकी एक आहे. कंपनी वाहन क्षेत्रासाठी ओळखली जात असली तरी कंपनीची सुरुवात १९४७ साली बांधकाम क्षेत्रापासून झाली होती. ह्युंदाई ग्रुप आज बांधकाम, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक सारख्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे.

देश – दक्षिण कोरिया
क्षेत्र – ऑटोमोबाईल व इतर
उलाढाल – रु. ५.२० लाख कोटी*
कर्मचारी संख्या – २.६५ लाख*


१३. मित्तल कुटुंब

मित्तल स्टील, आर्सेलर मित्तल ग्रुप

मूळ भारतीय वंशाचे असलेले लक्ष्मी मित्तल हे आर्सेलर मिटतात ग्रुप चे सर्वेसर्वा आहेत. लक्ष्मी मित्तल आज जगभरात स्टील इंडस्ट्रीचे बादशहा म्हणूनच ओळखले जातात.

देश – लक्झेम्बर्ग
क्षेत्र – स्टील व इतर
उलाढाल – रु. ३.९० लाख कोटी* (आर्सेलर मित्तल)
कर्मचारी संख्या – ५ लाख* (आर्सेलर मित्तल व मित्तल स्टील)

_______

उद्योजक मित्र
www.udyojakmitra.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!