व्यवसाय कसा करायचा शिका, कोणताही व्यवसाय यशस्वी होईल.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

व्यवसाय कसा करावा हेच माहित नसणं, हेच बऱ्याचदा व्यवसाय अपयशी ठरण्याचे मुख्य कारण असते. व्यवसाय म्हणजे काय हेच जाणून न घेता त्यात उतरणे कधीही घातकच. व्यवसायात यशस्वी करायचा तर व्यवसाय कसा करायचा हे जाणून घेणे आवश्यक आहे.

यशस्वी होण्यासाठी तुम्ही व्यवसाय कोणता करता हे महत्वाचे नाही, तर तुम्ही व्यवसाय कसा करता हे महत्वाचे आहे. म्हणूनच व्यवसाय कसा करायचा हे शिकून घ्या.

खरं तर व्यवसाय सुरु कारण्याआधी त्या क्षेत्रात कुठेतरी, काहीतरी काम केलेले असणे कधीही चांगले. व्यवसाय सुरु करण्याआधी व्यवसाय कसा करतात हे शिकून घ्यायला हवे. पण हे कुणी शिकवत नाही. याचे क्लासेस नसतात. MBA केलं म्हणून तुम्हाला व्यवसाय करता येईल असेही नाही. तुम्हाला स्वतःचे कौशल्य वापरून, निरीक्षणातून हे सर्व काही शिकावे लागते. व्यवसाय म्हणजे काय, यात कशा प्रकारे काम करावे लागते, व्यवसाय कसा हाताळावा लागतो, मार्केट कसे तयार करावे लागते, सेल्स मधे काम कसे करावे लागते, आर्थिक व्यवहार कसे हाताळावे लागतात, तणाव कसे हाताळावे लागत हे सर्व शिकून घ्यावं लागत. व्यावसायिक मानसिकता तयार करावी लागते. व्यवसायाचे प्रॅक्टिकल नियम जाणून घ्यावे लागतात.

मार्केटमधे नजर फिरवल्यास कित्येक अपयशी ठरलेल्या व्यवसायांची एक ठराविक पठडी पहायला मिळेल.
बरेच व्यवसाय आर्थिक व्यवहार नीट हाताळता येत नाही म्हणून बंद पडतात. पैसे कधी किती कशा प्रकारे वापरावेत, प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करावी, उधारी कशी वसूल करावी याचे कोणतेही ज्ञान नसल्यामुळे बंद पडतात.
मार्केटिंग, विक्री चे ज्ञान नसल्यामुळे काही व्यवसाय अपयशी ठरतात. पैसा गुंतवला कि व्यवसाय सुरु होतो हा गैरसमज असणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशा लोकांना विक्रीचे कोणतेही ज्ञान नसते. साहजिकच विक्रीत अपयशी झाल्यामुळे व्यवसाय बंद पडतो.
काहींना व्यवसायातील चढउतार हाताळता येत नाहीत, थोडं काही झालं कि निराशेच्या गर्तेत जाऊन व्यवसायाकडे दुर्लक्ष होते.
काहींना व्यवसायाचं प्रेशर हाताळता येत नाही. व्यवसायाकडे लक्ष देणे, कर्मचारी हाताळणे, मार्केटकडे लक्ष देणे, आर्थिक व्यवहार हाताळणे हा सगळा ताण असहाय्य होतो म्हणून व्यवसायाकडे दुर्लक्ष होते.

हि काही ठराविक करणे आहेत व्यवसाय अपयशी होण्याची. अशा उदाहरणांचा अभ्यास करून अशी चूक आपल्याकडून होणार नाही याची नवउद्योजकांनी काळजी घ्यायला हवी. आपोआपच व्यवसायातील धोके कमी होत जातील.

यासोबतच तुमची व्यावसायिक मानसिकता महत्वाची आहे.

व्यवसाय हि मनातून येणारी ऊर्जा आहे. व्यवसाय बळजबरी होऊ शकत नाही. ठराविक उत्पन्नाची, फिक्स ग्राहकाची, यशाच्या खात्रीची अपेक्षा ठेऊन तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. इथे पदोपदी समस्यांचा सामना करावा लागतो, विरोधी विचारांचा सामना करावा लागतो, यश अपयशाला पचवावे लागते, पर्यायांवर काम करावे लागते, क्रिएटिव्हिटी लागते, नेतृत कौशल्य लागते, मंदी असो वा चांदी सगळ्या परिस्थिती शांत राहावे लागते, संयम लागतो, दूरदृष्टी लागते… या सगळ्याचा एकत्रित संच म्हणजे एक चांगला उद्योजक.

थोडक्यात, व्यवसाय कसा करायचा हे शिकून घ्या. यासाठी तुमची नजर शोधक ठेवा. मार्केटमधील प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करा. व्यावसायिक दृष्टिकोन तयार करा. यश अपयशाची उदाहरणे अभ्यासा. स्ट्रॅटेजी तसेच होणाऱ्या चुका समजून घ्या. अपयशाची शक्यता भरपूर कमी होईल.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “व्यवसाय कसा करायचा शिका, कोणताही व्यवसाय यशस्वी होईल.

  1. व्यावर कसा करावा व उधारी कासी जमा करावी
    कस्तमारला कसे बोलावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!