‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे २० प्रेरणादायी विचार
१
तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही.
आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही.
२
तुमच्या पहिल्या यशा नंतर अजिबात थांबू नका
कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात
तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले होते हे बोलायला लोक तयारच असतात.
३
सक्रिय व्हा ! जबाबदारी घ्या !
त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे.
जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली करत आहात.
४
अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम
हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.
५
आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात,
ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात.
म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कठीण आहात.
६
तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता
आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील.
७
पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात
पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो.
समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.
८
काळा रंग हा अशुभ समजला जातो.
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उज्वल असतो.
९
जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जी खूप तीव्र देखील असते,
त्यात खूपच जास्त सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते.
१०
आत्मनिभारते मुळेच आत्मसम्मान मिळत असते याची आपल्याला जाणीव नसते.
११
यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल.
अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील.
१२
झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही.
१३
आपल्या यशाची व्याख्या जर भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.
१४
चला आपले आज आपण येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्या साठी त्याग करू.
१५
विचार हे भांडवल, उदयोग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे.
१६
आपल्या सर्वांमध्ये एकसमान प्रतिभा नसते,
पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते.
१७
आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही.
सर्व ब्रह्मांड तुमचे मित्र आहे.
पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो.
१८
यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते.
१९
यशाचे रहस्य काय?… योग्य निर्णय घेणे.
योग्य निर्णय कसे घ्यावे?… अनुभवाने.
अनुभव कसे घ्यावे ?… चुकीचे निर्णय घेऊन
२०
जर तुम्हाला सुर्या सारखे चमकायचे असेल तर प्रथम त्याचासारखे जाळावे लागेल.
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील चाहते लाभलेले डॉ. कलाम हे आपण सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार आपल्याला नवी दिशा देतात, यशाचा मार्ग दाखवतात. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे कलाम आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार मात्र आपल्या मनात सदैव जिवंत राहतील… कलामांच्या स्वप्नातील भारत घडवणे हि आपली जबाबदारी आहे.
व्हिजन २०२० हे कलामांचे स्वप्न होते. हे उद्दिष्ट सध्या करण्यात जरी आपल्याला अपयश आले असले तरी पुढील काही वर्षात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीलाही त्यासाठी प्रवृत्त करत राहिले पाहिजे.
तुम्हाला डॉ. कलाम यांचे हे प्रेरणादायी विचार कसे वाटले ते नक्की सांगा…
_______
उद्योजक मित्र
www.udyojakmitra.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
Motivational
Motivational
Superb thoughts
True guide of life