लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
प्रत्येक गोष्टीत बिझनेस आहे, फक्त तो शोधात आला पाहिजे.
कोणता व्यवसाय करू असा प्रश्न विचारण्यापेक्षा मार्केटमधे नजर फिरवल्यास हजारो व्यवसायाच्या संधी सापडतात. व्यवसाय शोधात आला पाहिजे, उपलब्ध स्रोतांमधे काय करता येईल हे सुचलं पाहिजे… मार्केटची गरज ओळखता अली पाहिजे… स्वतःचे कौशल्य, क्षमता, अनुभव याचा अंदाज घेऊन काय विकता येईल याचा अंदाज घेता आला पाहिजे…
मॅन्युफॅक्चअरिंग, ट्रेडिंग, रिटेल, सर्व्हिस प्रत्येक क्षेत्रात शेकडो हजारो व्यवसायाच्या संधी आहेत. तुम्ही आत्ता जिथे असाल तिथे उभा राहून स्वतःभोवती गोल फिरून ३६० अंशात नजर फिरवली तरी शंभर-एक व्यवसाय सापडतील.
प्रत्येक गोष्टीत व्यवसाय आहे. अगदी एकाच गोष्टीमधे दहा व्यवसाय दडलेले असतात.
स्वतःभोवती फेरी मारताना एखादी प्लास्टिक पाण्याची बॉटल नजरेस असेलच… त्याच बॉटल मधील व्यवसाय संधी बघा…
प्लास्टिक बॉटल बनवणे हा व्यवसाय आहे,
बॉटल चे झाकण बनवणे हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे,
प्लास्टिक बॉटल बनवणाऱ्याकडून बाल्कमधे बॉटल विकत घेऊन त्या होलसेल मध्ये विक्री करणे हाही व्यवसाय आहे,
होलसेलर कडून बॉटल घेऊन रिटेल शॉप मधून विकणे हाही व्यवसाय आहे,
बॉटल वापरून भंगार मधे गेली कि ते भंगार गोळा करून स्क्रॅप कंपनीला विकणे हाही व्यवसाय आहे,
स्क्रॅप मध्ये बॉटल घेऊन त्याचे तुकडे करून ते प्लास्टिक रिप्रोसेसिंग कंपनीला विकणे हा एक व्यवसाय आहे,
प्लास्टिक चे तुकडे घेऊन ते वितळवून त्यापासून ग्रॅन्युअल्स बनवणे हा व्यवसाय आहे,
ग्रॅन्युअल्स पासून प्लास्टिक बॉटल बनवणे हा व्यवसाय आहे…. चक्र पूर्ण झालं.
एका बॉटल मधे सात व्यवसाय आहेत. आता त्या बॉटल मध्ये भरायच्या पाण्याचा विचार केला तर?
पाण्यासाठी फिल्टर विकणे हा एक व्यवसाय आहे
फिल्टर बनवणे हा एक व्यवसाय आहे
फिल्टर चे स्पेअर पार्ट विकणे हा व्यवसाय आहे
स्पेअर पार्टस बनवणे हाही व्यवसाय
एका बॉटल शी निगडित दहापेक्षा जास्त व्यवसाय सापडू शकतात तर आपल्या आसपास किती व्यवसाय दडलेले असतील याचा विचार करा. हे सगळेच तुम्ही करू शकता असे नाही. यातला तुमच्यासाठी योग्य व्यवसाय कोणता आहे हे तुम्हाला शोधावे लागते. यासाठी स्वतःला ओळखता आले पाहिजे. स्वतःचे आकलन करता आले पाहिजे.
मार्केटमधल्या संधी शोधा… मार्केटमधील पोकळी शोधा… लोकांची गरज ओळखा…
लोकांना घरपोच काहीतरी हवंय… व्यवसायाची संधी आहे
लोकांना कमी कष्टात काहीतरी हवंय… व्यवसायाची संधी आहे.
लोकांना सुरक्षित काहीतरी हवंय… व्यवसायाची संधी आहे.
लोकांना आधीचे व्यावसायिक नकोय… व्यवसायाची संधी आहे.
लोकांना स्वस्तात काहीतरी हवंय… व्यवसायाची संधी आहे.
लोकांना सध्यापेक्षा जास्त क्वालिटी प्रोडक्ट हवंय… व्यवसायाची संधी आहे.
लोकांना त्यांचं काम करून देणारा कुणीतरी हवाय… व्यवसायाची संधी आहे.
प्रत्येक गोष्टीत व्यवसाय आहे. आपण पूर्णपणे व्यवसायाने घेरलो गेलेलो आहोत. आपल्या घरात आलेल्या ९९.९९% वस्तू व्यवसायाची देण आहेत.
आपली कामे सोपी करण्याठी व्यवसाय उभे राहत आहेत. आपल्याला नव्या सवयी लावण्यासाठी व्यवसाय उभे राहत आहेत. लावलेल्या सवयी पूर्ण करण्यासाठी व्यवसाय उभे राहत आहेत. सवयीच्या लागणाऱ्या व्यसनापासून मुक्ततेसाठी व्यवसाय आहेत.
सगळीकडे व्यावसाय आहे. त्या व्यवसायाला शोधणारी नजर हवी. आपल्यासाठी काय योग्य आहे हे शोधणारी नजर हवी. आपण काय विकू शकतो याचा शोध घेणारी नजर हवी…
काय व्यवसाय करू? असा प्रश्नच विचारू नका. तुम्ही काय विकू शकता याचा विचार करा, व्यवसायाच्या हजारो संधी सापडतील… सेवा असो अथवा प्रोडक्ट. काय विकत येईल याचा शोध घ्या. कोणता व्यवसाय करू या प्रश्नाचे उत्तर सापडेल.
व्यावसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Business intrest
Nice