राजकारणाच्या नादी लागण्यापेक्षा राजकारणातला बिझनेस शोधा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

सध्या राजकारणाचा सिझन आहे. तसा हा सिझन वर्षभर असतो पण निवडणूक म्हटलं कि आपल्या अंगातच येतं. काही जणांना तर आपल्या आयुष्यात राजकारण हा एकंच प्रश्न आहे असाच भास व्हायला लागतो. दिवस रात्र २४ तास फक्त राजकारणाच्याच गप्पा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात सोशल मीडियावर तर दिवसभर राजकीय गप्पा करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

असो… त्याला विरोध नाही. राजकारणात स्वारस्य असणं वाईट नाही, राजकारण तर बिलकुल वाईट नाही, राजकीय क्षेत्रात सुद्धा भरपूर मोठं भविष्य घडवता येऊ शकतं. राजकारणात उतरणेही चुकीचे नाही. राजकारण हे समाजाला घडवण्याचं काम करत. पण काही जणांना राजकारण हेच आपलं आयुष्य असल्यासारखं वाटायला लागलं आहे. २४ तास राजकीय गप्पांमुळे बऱ्याच ज्यांना निराशा यायला लागली आहे, फ्रस्ट्रेशन वाढत चाललं आहे, नकारात्मक दृष्टिकोन वाढायला लागला आहे. आपल्याकडील राजकारणाच्या गप्पा सकारात्मक कधीच नसतात, त्या फक्त आणि फक्त नकारात्मकच असतात. सध्या समाजामधे जी काही आक्रमक वृत्ती वाढायला लागली आहे हाही त्याचाच परिणाम आहे. सतत अशी नकारात्मक भाषा वापरून आपल्या आसपासही नकारात्मक ऊर्जा वाढायला लागते आणि याचा परिणाम आपल्या कार्यशैली वर होतो. एखादं व्यसन जडावं, किंवा एखाद्या नादाला लागावं तसला हा प्रकार आहे.

पण राजकारणाच्या नादाला लागणे आणि राजकारणात सक्रिय काम करणे यात फरक आहे. हा फरक सामान्य कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही, आणि ज्यांच्या लक्षात येतो ते कधीच भिकेला लागत नाहीत, पुढे जाऊन तेच मोठे नेते बनतात.

खरं तर राजकारणाच्या नादाला लागण्यापेक्षा राजकारणाच्या माध्यमातून चांगला व्यवसाय उभा राहू शकतो याचा आपण विचार करायला हवा.

राजकारणाच्या माध्यमातून व्यवसाय म्हणजे खंडण्या गोळा करणे आणि भ्रष्टाचार करणे नव्हे. तर राजकारणातील व्यावसायिक संधी साधणे. सर्व्हिस इंडस्ट्री, ऑटोमेशन इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री यासारखीच पॉलिटिकल इंडस्ट्री सुद्धा व्यावसायिक करिअरसाठी चांगले क्षेत्र आहे. राजकारणामागचा बिझनेस शोधण्याचा प्रयत्न केला तरच या संधी सापडतील.

दिवसेंदिवस बदलत चाललेल्या, आधुनिक होत असलेल्या राजकीय क्षेत्रामुळे नवउद्योजकांना भरपूर व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत.
राजकीय क्षेत्रात असलेल्या अशाच काही व्यावसायिक संधी पाहुयात…

१. पॉलिटिकल कन्सल्टन्सी हा या क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. लोकांशी संवाद कसा साधावा, कार्यकर्ते कसे निवडावेत, भाषण कसे द्यावे, प्रचाराचे नियोजन कसे करावे, देहबोली कशी असावी, कुठे काय बोलावे काय बोलू नये, राजकीय अभ्यास कसा असावा, नेटवर्क कसे वाढवावे अशा विविध बाबींचे सखोल ज्ञान यात देण्याचा प्रयत्न केला जातो. याचे आता स्पेशल कोर्सेस सुरु झालेले आहेत. यातील एखाद्या जरी मुद्द्यावर भर दिला तरी चांगला व्यवसाय उभा राहू शकतो.

२. राजकीय लोकांचे पक्षांचे सोशल मीडिया, डिजिटल मीडिया कॅम्पेन हे एक चांगली मागणी असलेले क्षेत्र झाले आहे. प्रमोशनल इमेज डिझाईन करणे, ते विवीध सोशल माध्यमांवर पब्लिश करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रचार करणे, नेत्यांची इमेज बिल्डिंग करणे असे विविध प्रकार यात येतात. या क्षेत्रात सध्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. अगदी एखाद्य प्रोडक्ट चे मार्केटिंग करावे अशाप्रकारचे हे काम आहे.

३. इमेज बिल्डिंग हा एक स्वतंत्र विभाग होऊ शकतो. यात वेगवेगळ्या प्रकारची भरपूर स्ट्रॅटेजिकल कामे येतात. यासाठी बऱ्यापैकी अनुभव लागतो. पण हळूहळू शिकून घेता येईल.

४. निवडणुकीच्या काळात उमेदवारी फॉर्म भरून देणे हा एक मोठा सिझनल बिझनेस आहे. एकेक फॉर्म भरण्यासाठी उमेदवार पाच दहा हजार रुपये सहज देतात. महापालिका, विधानसभा, लोकसभा सारख्या निवडणुकांत तर वीस हजारापर्यंत चार्जेस घेतले जातात. वर्षातून एक दोन जरी निवडणूक साधल्या तरी चांगले उत्पन्न मिळू शकते.

५. मतदारांचा डेटा गोळा करणे, त्यासंबंधी सॉफ्टवेअर विक्री करणे, बल्क मेसेज सर्व्हिस पुरविणे यासारखी कामे वेळोवेळी लागतात.

६. निवडणुकीचे संपूर्ण कॅम्पेन पाहणे हे एक मोठे काम आहे. यात सेट व्हायला बराच वेळ लागेल, पण रिझल्ट मिळायला लागल्यावर ग्राहकांची कमी नसेल. सुरुवात अगदी ग्रामपंचायतीपासून करावी. या कॅम्पेन मध्ये वरील सर्व गोष्टी येतात.

७. राजकीय झेंडे, फेटे, टोप्या, बिल्ले, पॅम्प्लेट, बॅनर अशा विविध साहित्याची मार्केटमधे प्रचंड मागणी आहे. विधानसभेच्या एका मतदारसंघाच्या निवडणुकीत यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. एखादा मोठा मोर्चा जरी काढला तरी त्यात लाखो रुपयांची उलाढाल या साहित्याची असते.

८. मतदारसंघांचा सर्व्हे करण्यासाठी चांगल्या संधी आहेत. यासाठी तुमच्याकडे चांगले संभाषण कौशल्य असले पाहिजे, सोबतच एक चांगली टीम असली पाहिजे. मतदारसंघाच्या सर्व्हे साठी इच्छुक उमेदवार लाखो रुपये खर्च करायला तयार असतात.

९. प्रचार, मोर्चा, सभा यासाठी माणसे उपलब्ध करून देणे हाही एक चांगला व्यवसाय आहे.

१०. सभा, मेळाव्यांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला चांगल्या संधी आहेत. आजकाल राजकीय सभा, मेळावे सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडूनच करून घेतले जातात.

११. मोठमोठ्या राजकीय लोकांसाठी स्वतंत्र ड्रेस डिझायनर असतात, हेल्थ कन्सल्टंट असतात… याचाही विचार करू शकता.

या काही व्यावसायिक संधी आहेत. राजकीय क्षेत्राचा अभ्यास असेल तर याव्यतिरिक्त इतरही काही संधी सापडतील ज्या उघडपणे सांगता येत नाही पण त्या कदाचित यापेक्षाही जास्त प्रभावी असू शकतील.

राजकारणात इंटरेस्ट असणे वाईट नाही. बिनधास्त राजकारण करा. पण आधी आपले उत्पन्नाचे जास्तीत जास्त स्रोत निर्माण करा. घराचं दिवाळं काढून राजकारण करू नका. कुणाच्या प्रचाराचे साहित्य तर बिलकुल होऊ नका. प्रचाराचे साहित्य घरात सजवून ठेवले जात नाही, निवडणूका संपल्या कि ते अडगळीत फेकले जाते.

राजकीय गप्पांत अडकून पडण्याऐवजी राजकारणातील संधींना हेरून व्यवसाय सुरु करा. आधी पैसा कमवा, त्या पैशातून हवे असल्यास खुशाल राजकारण करा. पण राजकारणाच्या गप्पांत अडकून पडू नका. त्यातून काहीच साध्य होत नाही. उलट वेळ वाया जातो, आणि नकारात्मकता वाढायला लागते. यातून तुम्हाला काहीच मिळत नाही, ज्याला मिळत त्याला तुमच्याशी देणं घेणं नसतं.

एक तर असे कार्यकर्ते व्हा जे आपलं काम सांभाळून प्रचार करतील, किंवा असे लीडर व्हा जे आपल्या अनुयायांना स्वयंपूर्ण बनवतील… मधल्या मध्ये कुठे राहू नका.

राजकारण साक्षर व्हा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


2 thoughts on “राजकारणाच्या नादी लागण्यापेक्षा राजकारणातला बिझनेस शोधा

  1. श्रीकांत सरतुमच्या सर्व सोशल app ला add आहे तुमचे लेख तुमचे पोस्ट खुप माझा व्यवसाय चालु झाल्या पासुन fallow करत आलोय मला ३ वर्ष होतील स्वताच्या व्यवसायत खुप छान अप्रतिम लेख आणि guide करता आपण माझ्या साठी एकदा बारामती मध्ये तुम्हाला मला आणायचे कार्यक्रमात मला नक्की त्यावेळी आपला टाइम द्या , – योगेश 9762 384438

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!