हिशोब टक्क्यांत करायचा असतो, पैशात नाही


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

काही दिवसांपूर्वी एक जाहिरात पहिली होती…. शेअर मार्केट कोर्स संबंधी होती.
जाहीरातीमधे एक चढता आलेख होता आणी त्यावर २५ लाख गुंतवणुकीचे एका वर्षात ३८ लाख झाल्याची माहिती होती…
भारी वाटलं ना आकडा ऐकुन? एका वर्षात १३ लाख वाढले? तुम्हालाही क्षणभर वाटले असेल आपण सुद्धा विचार करावा… पण हा शब्दछल आहे…

२५ लाखाचे ३८ लाख म्हणजे गुंतवणुकीवर ५०% परतावा होतो… पण आजची कमी काळात जास्त पैसा कमवायची मानसीकता पाहता असं टक्केवारीत सांगीतलं तर कुणी गांभीर्याने घेणार नाही… फक्त ५०% परतावा ? असा उलट प्रश्न येईल… पण याच वेळी २५ चे ३८ करा म्हटलं तर तोच व्यक्ति कान टवकारेल…

ही असते शब्दांची आणि आकड्यांची कमाल…
ईथे प्रत्येक जण २५ लाख गुंतवु शकत नाही, पण ३८ लाख परतावा हा भाग त्याच्यासाठी स्वप्नवत असतो. एक वर्षात १२ लाख कुणासाठीही मोठीच रक्कम आहे…. मग तोही काही हजार गुंतवुन वर्षभरात काही लाखांच्या उत्पन्नाचे स्वप्न पहातो.

बर… जर मी असं म्हणालो की २५ हजार गुंतवा आणि वर्षभरात ३८ हजार कमवा… म्हणजे वर्षभरात १३ हजार परतावा मिळवा… आता ही रक्कम खुपच लहान वाटेल… बरोबर ना??? पण खरं पाहता दोनीचाही अर्थ एकच होतो… तुम्ही जेवढे गुंतवाल त्याच्या ५०% रक्कम परताव्यात मिळेल…
म्हणजेच टक्क्यांत हिशोब करु त्यावेळी आकड्यांना किमत रहात नाही, वास्तवाला किंमत येते… अशावेळी तुम्ही २५ हजार गुंतवा, २५ लाख गुंतवा किंवा २५ कोटी गुंतवा… परतावा सारखाच मिळेल… ५०%…

म्हणुन हिशोब टक्क्यात करायचा असतो. किती टक्के वाढ, किती टक्के परतावा, किती टक्के नफा, किती टक्के खर्च, किती टक्के नुकसान… भाषा हि नेहमी टक्क्यांचीच असावी.

पण गंमत अशी आहे की सामान्य माणसाला आकडेवारी जास्त भावते. त्याला टक्केवारी कळत नाही. मग अशा जाहीरातीला ते सहज भुलतात..

या जाहीरातीबाबत बोलायचं तर ५०% परतावा हा थोडा नाही… पण ही जाहीरातच फसवी होती. कारण शेअर मार्केट मधए किती परतावा मिळेल हे आधी सांगणे शक्यच नाही. यात तुमचा वैयक्तिक अभ्यासच महत्वाचा ठरतो… मग काहीजण स्टँडर्ड २०% परतावा घेतील, काहीजण ५०% वा काहीजण दुप्पटही कमावतील. शिकण्याला महत्व द्यायचं असतं, पैसा आपोआप पायाशी लोळण घेतो.

असो आत्ताचा आपला विषय शेअर मार्केटचा नाही… विषय आहे हिशोब पैशात न करता टक्क्यात का करावा..
मागेही एका आर्टिकल मधे हा संदर्भ दिला होता, परंतु बऱ्याच जणांना त्याचा अर्थ लक्षात आला नव्हता. तेव्हाही कित्येकांची नफा, किंमत, स्वस्त महाग, टक्के आणि पैसे यात गल्लत झाली होती….

तुम्ही जिथे गुंतवणूक करता, तुम्ही जो काही व्यवसाय करता, जिथे कुठे खर्च करता किंवा परतावा मिळवता तिथे हिशोब टक्क्यातच करा. व्यवसायात हिशोब पैशात कधीच केला जात नाही, तो टक्क्यातच केला जातो. टाक्यांत हिशोब केला तरच पैशात वाढ होते…

पण जेव्हा तुम्ही ग्राहकांना हिशोब सांगता त्यावेळी मात्र पैशातच सांगायचा असतो. ग्राहकांना टक्क्यांची भाषा समजत नसते. त्यांना ज्या भाषेत समजेल तीच भाषा आपल्याला वापरावी लागते.

दहा हजाराच्या वस्तूवर ५०० रुपये डिस्काउंट म्हणजे फक्त ५% डिस्काउंट झाला. पण ५०० चा आकडा लोकांना नक्कीच आकर्षित करतो. याचवेळी जर तुम्ही १०० रुपये किमतीच्या वस्तूवर ५ रुपये डिस्काउंट दिला तरी तो आकडाच आकर्षक नसल्यामुळे ग्राहक त्या डिस्काउंट ला जास्त गांभीर्याने घेणार नाहीत, भलेही ती वस्तू त्यांना नेहमीच लागणारी असो. त्यामुळे ग्राहकांशी व्यवहार करताना गरजेनुसार टक्क्यांच्या किंवा पैशांच्या भाषेत बोला पण स्वतःच्या बाबतीत मात्र फक्त टक्क्यांचीच भाषा वापरा

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!