संधी… बिल गेट्स यांनी साधलेली आणि मला शिकविलेली


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

बिल गेट्स….

या माणसाचा माझ्या आणि माझ्यासारख्याच करोडो लोकांच्या मनावर विलक्षण पगडा आहे. आज ज्यांचं वय ३० ते ५० च्या दरम्यान आहे त्यांना बिल गेट्स काय व्यक्तिमत्व आहे हे सांगण्याचीच गरज नाही. दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ हा माणूस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. आणि मागच्या १८-१९ वर्षांपासून तो टॉप ३ मधेच आहे. २००० साली माझं वय १४-१५ असेल तेव्हापासून मला बिल गेट्स कळायला लागलेत. त्यावेळी श्रीमंती म्हटलं कि बिल गेट्स हेच नाव समोर यायचं, आणि आजही तेच नाव समोर येत. अब्जावधींची संपत्ती दान देऊनही हा माणूस आजही श्रीमंतांच्या रांगेत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
व्यक्तिशः मला, श्रीमंती म्हणजे काय हे शिकवलं याच माणसाने आणि संधी कशी साधायची असते तेही शिकवलं याच माणसाने.

खूप छोटा किस्सा आहे… मला ‘नॅशनल जिओग्राफिक’ च्या एका कार्यक्रमात ऐकायला मिळाला होता आठ नऊ वर्षांपूर्वी….

बिल गेट्स यांची पहिली कंपनी पूर्णपणे तोट्यात गेली होती. त्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट सुरु केली. त्यांना त्यांच्या आईच्या संपर्काने IBM कंपनीला त्यांच्या कॉम्प्युटर साठी ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करून देण्याची ऑफर आली. त्यांनी लगेच त्याला होकार कळवला. ऑपरेटिंग सिस्टीम बनवून दिली. ती कंपनीकडून मंजूर झाली.

कंपनीने त्यांना त्यांचे OS साठीचे शुल्क विचारले. पण बिल गेट्स यांनी त्याचे एकरकमी शुल्क घ्यायला नकार दिला, आणि IBM कडून विकल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉम्प्युटर मागे रॉयल्टी मागितली. आणि कुठलेली आढेवेढे न घेता IBM मागणी मान्य केली… हीच ती संधी होती ज्यामुळे बिल गेट्स यांनी जगभरातील औद्योगिक विश्वावर राज्य केलं, निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं…

काय पाहिलं होत बिल गेट्स यांनी ? पैसा ? बिलकुल नाही… आत्ता किती मिळेल याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. त्यांनी IBM चा भविष्य पाहिलं, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा भविष्य पाहिलं, त्यांनी त्यांच्या व्यवसायातलं पोटेन्शियल पाहिलं. याच पोटेन्शियलने त्यांना एकरकमी शुल्क घेण्याऐवजी रॉयल्टी घ्यायला सांगितलं… आणि पुढचा इतिहास आपल्यासमोर आहे. बिल गेट्स त्यांच्या सॉफवेअर मुळे श्रीमंत झाले नाहीत, किंवा इतके मोठे झाले नाहीत, ते मोठे झाले त्यांनी साधलेल्या संधीमुळे…

संधी हि वर्तमानपत्र नाही, जी दररोज सकाळी दारात हजार असेल …. ती क्वचित मिळते…. बिल गेट्स यांनी तात्काळ मिळणाऱ्या पैशाच्या मागे लागून रॉयल्टीची संधी गमावली असती तर आज त्यांच्यावर चार ओळी लिहिण्याचा संबंधच येत नव्हता…

खरं तर अशा कितीतरी संधी आपण वाया घालवत असतो. कारण आपल्याला भविष्य पाहण्याची कला अवगत नाही. ज्यावेळी भविष्य पाहायला सुरुवात करू अशा कित्येक संधी आपल्याला दिसायला लागतील.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!