लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
आधी पैसा, मग यश हे गृहीतक चुकीचे आहे. खरं तर यश मिळतं म्हणून पैसा मिळतो. आधी यश, मग पैसा.
एखाद्या व्यवसायाला करोडोंचं फंडिंग मिळत म्हणून तो यशस्वी ठरत नाही, तर त्याने यश मिळविलेलं असतं म्हणून त्याला पुढच्या वाटचालीसाठी फंडिंग मिळतं.
व्यवसायातील यश म्हणजे फक्त पैसा नव्हे. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळातील यश ग्राहकांच्या संख्येवरून ठरवलं जातं. एखादी संकल्पना ग्राहकांना आवडली, ग्राहक तिच्याकडे आकर्षित झाले तर ती यशस्वी होतेच. आणि यशस्वी झाली कि पैसा यायला लागतोच. पब्लिक सुद्धा यशाकडे आकर्षित होत असते. तुमचा ब्रँड यशस्वी होत आहे हे लक्षात आल्यानंतर ग्राहकांची संख्या आपोआपच सुद्धा वाढायला लागते. संकल्पनेने आपलं यश सिद्ध केलं कि तिला पुढच्या वाटचालीसाठी, विस्तारासाठी फंडिंग मिळायला सुरुवात होते. मग ती फंडिंग गुंतवणूकदारांकडून असो किंवा वाढलेल्या ग्राहकांकडून, पण त्या संकल्पनेच्या विस्तारासाठी आपोआपच साथ मिळत जाते.
फेसबुक कडे पैसे होता म्हणून ते यशस्वी झाले नाही, तर आधी त्याने आपली उपयोगिता सिद्ध केली आणि मग त्याला मोठं होण्यासाठी साथ मिळाली.
धीरूभाईंकडे पैसा होता म्हणून रिलायन्स मोठी झाली नाही, तर आधी धीरूभाईंनी आपले कर्तृत्त्व सिद्ध केले आणि मग गुंतवणूकदारांनी त्यांच्या व्यवसायात पैसा गुंतवला
तुमच्या आसपासचे दहा वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असणारे मोठे व्यवसाय बघा, ९५% व्यवसाय शून्यातून उभे राहिलेले दिसतील. या व्यवसायांच्या मालकांना जाऊन भेट. त्यांच्याकडे पैसा होता म्हणून ते मोठे झालेले नाहीत, तर जिद्दीने चिकाटीने त्यांनी आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोचवला, लोकांना त्यांच्या व्यवसायाकडे आकर्षित केले, ग्राहक वाढवले, उपयोगिता सिद्ध केली, म्हणून ते मोठे झालेले आहेत हे लक्षात येईल. आणि या मोठं होण्याच्या प्रक्रियेत यश मिळायला लागल्यावर मग त्यांना गुंतवणूकदारांनी, बँकांनी साथ दिली ज्यामुळे त्यांचा विस्तार झाला…
आधी यश मिळवायला प्राधान्य द्या, पैसा सगळ्या मार्गांनी यायला लागतो. हे विहीर खाणण्या सारखं आहे, तीन परस जाईपर्यंत पाणीच लागत नसतं, नुसती माती आणि कोरडा खडक लागतो. पण त्या खाली एक एक पाझर मोकळा व्हायला लागतो, आणि विहरीत पाणी जमा व्हायला लागतं, जसजसं खोल जाऊ तसतसे पाझर वाढत जातात, आणि विहीर गच्च भरायला लागते. पण हे पाझर मोकळे होण्यासाठी आधी दोन तीन परस कोरडी माती खणून काढावी लागते…
आधी यश, मग पैसा… पैसा व्यवसायाला यशस्वी करत नसतो, पैसा फक्त व्यवसायाला विस्तारासाठी मदत करत असतो.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील