रॉबर्ट कियोसाकी यांचा श्रीमंतीचा मंत्र


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

रॉबर्ट कियोसाकी….

रिच डॅड, पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक असलेल्या रॉबर्ट कियोसाकी यांना आधुनिक अर्थसाक्षरतेचे जनक म्हणता येईल.
आपल्या विविध पुस्तकांतून त्यांनी आर्थिक बाबतीत प्रचलित पद्धतींना धक्का देणारे नियम जगासमोर मांडले. कियोसाकी आपल्या पुस्तकातून अतिशय सोप्या भाषेत श्रीमंतीचे नियम सांगतात.

कियोसाकी यांनी आजपर्यंत १८ पुस्तके लिहिली आणि एकूण २६ कोटी पुस्तके विकली गेली आहेत

कियोसाकी यांच्या पुस्तकांतून, उद्योजकांना उपयोगी पडतील असे, श्रीमंतीविषयक आणि व्यवसायविषयक निवडक विचार आमच्या वाचकांसाठी घेऊन येत आहोत…

१. तुमचे यश हे तुमच्या इच्छा आकांक्षांवर तसेच तुम्ही जीवनात पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांवरच नेहमी अवलंबून असते

२. आपल्याकडील मालमत्ता आणि आपली जबाबदारी या दोहोंतला फरक ज्यावेळी आपल्याला कळतो, तेव्हाच खरे शहाणपण येते. आपल्या मालमत्तेकडून आपल्याला या ना त्या प्रकारे पैसा मिळतच असतो, तर आपल्याला आपल्या जबाबदारीसाठी पैसा हा खर्च करावाच लागतो. श्रीमंत माणसाला या दोहोंतला फरक चांगल्यापैकी कळलेला असतो

३. पैशासाठी काम करू नका, तर स्वतःसाठी काम करा. आपला विकास साधा. विकासाच्या वाटेवर पैसा हा आपोआपच आपल्या मागे येत राहतो

४. तुम्ही आज जे काही करणार आहात त्यावरच तुमचा उद्या म्हणजेच तुमचे उज्ज्वल भविष्य उभे राहणार आहे.

५. आपल्याला आजवर जे सल्ले मिळाले ते पैसे वाचावा, कर्जातून मुक्त व्हा, दीर्घ गुंतवणूक करा, तसेच काही पैसे गोरगरिबांना द्या ई. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर या सर्वांकडे दुर्लक्ष करायला शिका.

६. व्यवसायातील कंपनीची स्थिती-गती, म्हणजेच कंपनीची मालमत्ता आणि नफा, या दोन गोष्टी सर्वार्थाने महत्वाच्या असतात. श्रीमंत माणूस हा एकूण मालमत्तेच्या हिशोबात बोलत असतो, तर गरीब माणूस रोजच्या नफ्यात अडकलेला असतो. एकूणच दोघांची प्रकृती, पिंड आणि स्वभाव वेगवेगळा असतो, आणि आयुष्याच्या मागण्याही.

७. पैसे मिळविण्याची प्रक्रिया तीन दिशांची असते. प्रथम तुम्हाला पैसा कसा मिळवावा हे कळायला हवे, मग तुम्हाला त्याची व्यवस्था नीट लावता यायला हवी, आणि मुख्य म्हणजे तुम्हाला त्यातील काही पैशांची बचतही करता आली पाहिजे.

८. तुमचे मन हे तुमचे मोठे भांडवल आहे, त्यात योग्य विचारांचीच भरती करा. योग्य ठिकाणी योग्य विचार तुम्हाला करता आला पाहिजे.

९. तुम्हाला ज्याची भीती वाटते किंवा ज्याविषयी तुम्ही विलक्षण साशंक आहात अशांना स्वच्छ मानाने मोकळेपणाने भेटा

१०. जे काही करायचे ते आज करा, उद्या नको. विजेते नेहमीच आज हा शब्द वापरतात आणि झटपट कृती करतात पण जे पराभूत असतात वा भीतीग्रस्त असतात ते नेहमीच उद्या या शब्दाला अपार महत्व देतात.

११. मोठी-महान स्वप्ने पाहायला विसरू नका. विचार करताना दीर्घ काळाचा विचार करा, आणि त्यासाठी पहिले पाऊल आजच उचला. पावलापावलांनी पुढे जात रहा, तुमच्या छोट्या छोट्या कृतीच तुम्हाला मोठे यश मिळवून देणार आहेत.

१२. बहुतेक लोक श्रीमंत होऊ शकत नाहीत कारण आपल्या समोर जी मोठी संधी उभी आहे, ती ओळखण्यासाठी ते पुरेसे प्रशिक्षित झालेले नसतात. श्रीमंत मात्र जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक संधीचा क्षणाचा लाभ उठवतात. इतकेच नव्हे तर ते काही क्षणात संधी निर्माण करतात.

१३. काळ बदलत असतो, आपल्या अवतीभोवतीही खूप बदल होत असतात. पण हे बदल एकतर आपल्याला दिसत नाहीत किंवा ते आपल्या मुठीत पकडता येत नाही. आपण या बदलांना प्रवाही वृत्तीने सामोरे जायला हवे. तरच प्रगती शक्य आहे.

१४. योग्य व नेमके नेतृत्व हे आज आवश्यकच नाही तर अपरिहार्य झाले आहे. कुशल नेतृत्वाअभावी काहीच शक्य नाही. अगदी रोजचे प्रोडक्शनही. आज अनेक कारखाने बंद पडले आहेत ते केवळ कुशल नेतृत्वाच्या अभावीच. असे अकुशल नेतृत्व हे आपल्या अपयशाचे खापर नेहमीच दुसऱ्याच्या डोक्यावर थापत असते.

१५. श्रीमंत आणि गरीब माणूस दोघेही वेळेचा वेगवेगळा वापर करतात. जो माणूस अत्यंत गरीब, अस्वस्थ तसेच अत्यंत दुःखही असतो तो नेहमीच उद्या या शब्दाचा वारंवार वापर करतो. कारण तो आज खऱ्या अर्थाने जगात नसतो. तो नेहमीच उद्यात जगात असतो. कारण या उद्याच्या त्याची अशा लपलेली असते.

१६. श्रीमंत होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे व्यवसायिक व्हा. व्यवसाय सुरु केल्यानंतर भक्कम कॅशफ्लो उभा राहिला कि त्यानंतर इतर मालमत्तेत गुंतवणूक सुरु करा

१७. तुम्ही पैशासाठी काम करण्याऐवजी पैसा तुमच्यासाठी काम कसा करेल, हे शिका

१८. विचार करणं हे सर्वात कठीण काम आहे, म्हणून फार थोडे लोक विचार करतात

१९. तुम्हाला तुमच्याकडची कौशल्य श्रीमंत बनवतात, पुस्तकी ज्ञान नाही

२०. आपण सारे जन्मजात विक्रेते असतो

२१. विक्री करता येणे हे धंद्यातले प्रथम क्रमांकाचे कौशल्य आहे

२२. मी नाकारलं जाण्याची जेवढी जोखीम घेईल तेवढाच मी स्वीकारला जाण्याची शक्यता जास्त असते

२३. स्थावर मालमत्ता हि विकण्यासाठी विकत घ्यायची नसते. उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता उभारण्यासाठी स्थावर मालमत्ता विकत घ्यायची असते

२४. तुम्हाला कायम उत्पन्न देत राहतील अशा संपत्ती निर्माण करा.

धन्यवाद
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


3 thoughts on “रॉबर्ट कियोसाकी यांचा श्रीमंतीचा मंत्र

    1. नेहमीच आपण व्यावसायिकांसाठी उत्तमोत्तम साहित्य उपलब्ध करुन देत आहात , त्याचा नक्कीच मोठा फायदा होत आहे , आपले हे कार्य असेच पुढे चालत राहो यासाठी भरपूर शुभेच्छा …

  1. नेहमीच आपण व्यावसायिकांसाठी उत्तमोत्तम साहित्य उपलब्ध करुन देत आहात , त्याचा नक्कीच मोठा फायदा होत आहे , आपले हे कार्य असेच पुढे चालत राहो यासाठी भरपूर शुभेच्छा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!