स्टीव्ह जॉब्ज यांचा उद्योगमंत्र


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

स्टीव्ह जॉब्स यांनी १९७६ मधे Apple या कंपनीची स्थापना केली होती. परंतु काही काळानंतर तिन्ही त्यांच्याच कंपनीतून कटकारस्थान करून काढून टाकण्यात आले. स्टीव्ह यांनी यानंतर आपली दुसरी कंपनी सुरु केली आणि तिचेही यशस्वीरीत्या व्यवस्थापन केले. मधल्या काळात Apple ची अवस्था हलाखीची झाली. विक्री मंदावली, कंपनी डबघाईला आली. आणि कंपनीने पुन्हा स्टीव्ह जॉब्ज यांना कंपनीत येण्याची विंनती केली. विंनंतील अमान देऊन स्टीव्ह पुन्हा Apple मधे रुजू झाले. आणि अल्पावधीतच कंपनीला पुन्हा सर्वोच्च स्थान मिळवून दिले. आज मार्केट कॅपिटल च्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून Apple चा नावलौकिक आहे.

स्टीव्ह जॉब्ज तरुणांमधे विशेष लोकप्रिय होते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी तरुणाई नेहमीच उत्सुक असे. अशेच त्यांचे काही निवडक विचार आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

१. मोठ्या खंबीर आत्मविश्वासाने नेतृत्व करणारा आणि केवळ अनुयायी म्हणून जगणारा यात मूलभूत फरक आहे

२. तुम्ही उत्तम दर्जाचा गुणवत्तेचा ध्यास घ्या. एक लक्षात घ्या, बहुतेक लोक दर्जेदारपणा, उत्कृष्टपणा, गुणवत्ता यांबाबतीत अनभिज्ञच असतात…

३. तुम्ही जेव्हा संपूर्णपणे नवीन उत्पादन वा संशोधनासह बहुजरात दाखल होता, तेव्हा त्यात काही त्रुटी राहून जाण्याची शक्यता असते. पण त्याविषयी आपण विलक्षण सावधान राहिलो तर त्या त्रुटी आपल्याला वेळीच दूर करता येतात

४. नव्या विकत घेतलेल्या वास्तूच्या दर्शनापेक्षा किंवा ते विकत घेतल्यानंतर मिळणाऱ्या भावनेपेक्षा त्या वस्तूची गुणवत्ता व प्रामाणिकता महत्वाची असते. यातून ती वस्तू स्वतःचे असे एक स्थान निर्माण करते.

५. सतत पुढे जाणे, नवनव्या वाटांचा शोध घेत राहणे, विकासाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्वाचे आहे.

६. आपली अंतर्बाह्य शिस्त महत्वाची असते. संपूर्णपणे नावीन्यमय, प्रयोगशील कल्पना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांना आपण अंतर्बाह्य शिस्तीची जोड दिली तर आपला प्रवास निश्चित वैभवशाली होईल यात शंका नाही

७. रोजचा दिवस संपताना मी स्वतःलाच विचारतो कि, आपण आज सर्वोत्कृष्ट निर्मिती केली आहे का ? आपण आज खऱ्या अर्थाने सृजनशील जगलो आहोत का ? जिवंतपणीच थडग्यात गेलेल्या धनाढ्य श्रीमंतांच्या यादीत आपला समावेश व्हावा असेल मला वाटत नाही.

८. सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण जे काही करत आहोत त्यावर प्रेम करणे

९. कार्यकारी अधिकारी म्हणून माझा, माझ्या कार्यावर, प्रत्येक कृतीवर प्रचंड विश्वास असतो आणि संपूर्ण चैतन्यानीशी मी त्यात उतरतो.

१०. स्वयंप्रकाशी व्हा… स्वतःच्या प्रकाशातच वाटचाल करा. आपल्या आतल्या आवाजाला महत्व द्या.

११. आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे असे समजून वर्तमानातील प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगा आणि त्यातील अर्थ व शहाणपणा टिपा.

१२. अथक आणि योग्य प्रयत्नातून आपल्या हातावर काय राहते तेच आपले असते

१३. आपल्या आयुष्याकडून काय मागण्या आहेत ते आधी तपासा. तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य हे सरबत विकण्यात घालवायचे आहे का ? जर तसे नसेल, तर तुम्हाला जग बदलण्याची एक मोठी संधी आज, आत्ता चालून आलेली आहे… उठा आणि मार्गस्थ व्हा.

१४. तुम्ही प्रत्येकवेळी ग्राहकांना त्यांची प्रत्येक गरज विचारून आपले उत्पादन बनवू शकत नाही. असे करायला गेलो तर आपले उत्पादन तयार होईपर्यंत ग्राहकांची गरज, त्यांची लहर व सौंदर्याचे मापदंड बदललेले असतील.

धन्यवाद
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!